वी महाराष्ट्रामध्ये ४जी डाउनलोड स्पीड, गेम्स आणि व्हॉइस ऍप अनुभव देणारी टॉप कंपनी, ओपनसिग्नल रिपोर्ट

Admin

Vi वी
  • तब्ब्ल ६५०० हुन जास्त साईट्समध्ये L900 MHz, L1800 MHz, L2100 MHz, आणि L2500 MHz स्पेक्ट्रमवर नेटवर्क अपग्रेडमुळे युजर्सचा नेटवर्क अनुभव वृद्धिंगत झाला आहे.

देशातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर, वोडाफोन आयडियाने आज घोषणा केली की, ४जी युजर्सच्या ४जी अनुभवाचे परीक्षण करणाऱ्या, ओपनसिग्नलच्या ४जी नेटवर्क एक्स्पीरियंस रिपोर्ट नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांची विशेष दखल घेण्यात आली आहे. या अहवालानुसार, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त डाउनलोड स्पीड्स, व्हॉइस ऍप आणि गेमिंगच्या ग्राहक अनुभवाच्या निकषांमध्ये वीचा पहिला क्रमांक आहे.

प्रदेशात सर्वत्र नेटवर्कची कामगिरी वाढवण्यासाठी वी कडून सातत्याने केल्या जात असलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे. या वर्षीच्या एप्रिल महिन्यात वी ने FPOमार्फत १८००० कोटी रुपये उभारले, संपूर्ण देशभरात ४जी नेटवर्क वाढवण्यासाठी वी वचनबद्ध आहे.

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून वी ने या क्षेत्रातील जवळपास ६५०० ४जी लोकेशन्स अपग्रेड केली आहेत. ४१०० पेक्षा जास्त लोकेशन्सना L900 MHz आणि 2100 MHz स्पेक्ट्रम बँड्सवर अतिरिक्त लेयर्स तैनात करून कनेक्टिविटीमध्ये सुधारणा घडवून आणली आहे.

त्यामुळे इनडोअर कव्हरेज उत्तम मिळत आहे आणि डेटा स्पीड देखील सुधारला आहे. याखेरीज वी ने २००० पेक्षा जास्त लोकेशन्सना 2100 MHz स्पेक्ट्रम बँडवर 10 MHz ते 15 MHz नेटवर्क बँडविड्थचा विस्तार करण्यात आला आहे. या सुधारणांमुळे एकंदरीत नेटवर्क क्षमता १२% नी वाढली आहे.

वोडाफोन आयडियाचे महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे क्लस्टर बिझनेस हेड श्री रोहित टंडन यांनी सांगितले, महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये लक्षणीय कामगिरीसाठी आमची विशेष दखल घेण्यात आली आहे आणि ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. आमचे नेटवर्क मजबूत करण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांसाठी अखंडित कनेक्टिविटी सुनिश्चित करण्यासाठी आम्ही करत असलेल्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीचे हे फळ आहे. कनेक्टिविटीमध्ये उत्कृष्टता साध्य करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवासुविधांमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि सर्वोत्तम डिजिटल अनुभव पुरवण्यासाठी वी सतत प्रयत्नशील आहे. नेटवर्क अपग्रेड्स, सुधारित सेवा गुणवत्ता आणि खास तयार करण्यात आलेली सोल्युशन्स यासारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून वी आपल्या ग्राहकांच्या नवनवीन गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यांच्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या काही सेवासुविधा अशाप्रकारे आहेत –

  • वी सुपरहिरो रिचार्जेस: दररोज रात्री १२ ते दुपारी १२ वाजेपर्यंत, अर्धा दिवस वी ग्राहकांना अनलिमिटेड डेटाचा आनंद घेता येतो, याशिवाय वीकएंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाईट असे लाभ देखील मिळतात. वी सुपरहिरो पॅकच्या किमती ३६५ रुपयांपासून सुरु आहेत. युजर्सना मिळणाऱ्या लाभांमध्ये यांचा समावेश आहे:
  • अनलिमिटेड हाय स्पीड डेटा अर्धा दिवस, दररोज, रात्री १२ ते दुपारी १२ वाजेपर्यंत.
  • वीकएंड डेटा रोलओव्हर: वीकडेमध्ये न वापरलेला डेटा कॅरी फॉरवर्ड करून वीकएंडला वापरता येतो.
  • डेटा डिलाईट: दैनंदिन डेटा कोटाव्यतिरिक्त, दर महिन्याला २ जीबीपर्यंत अतिरिक्त डेटा, कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता.
  • वी गॅरंटी प्रोग्राम: ५जी आणि नवीन ४जी स्मार्टफोन युजर्ससाठी डिझाईन करण्यात आलेल्या या प्रोग्राममध्ये १३० जीबी गॅरंटीड एक्स्ट्रा डेटा एक वर्षभरात मिळतो, सलग १३ सायकल्समध्ये दर २८ दिवसांनी १० जीबी क्रेडिट केला जातो. २९९ रुपये आणि त्यापेक्षा जास्त किमतीच्या रिचार्ज पॅकसह असलेल्या प्रीपेड ग्राहकांना हे लाभ मिळू शकतात.
  • वी मॅक्स पोस्टपेड – चुस युअर बेनेफिट्स: वी चे ‘चुस युअर बेनेफिट्स’ हा या उद्योगक्षेत्रातील अशाप्रकारचा एकमेव प्रस्ताव आहे. यामध्ये ग्राहकांना त्यांना अनुकूल आणि अनुरूप असलेले विशेष लाइफस्टाइल लाभ निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते. मनोरंजन, फूड, प्रवास आणि मोबाईल सुरक्षा यासारख्या विविध विभागातील अनेक वेगवेगळे लाभ युजर्स त्यांच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार निवडू शकतील.
    • पात्र प्लॅन्समध्ये रुपये ४५१, रुपये ५५१ आणि रुपये ७५१ चे इंडिविज्युअल पोस्टपेड प्लॅन्स तसेच रुपये ७०१, रुपये १०५१, रुपये १२०१ आणि रुपये १४०१ चे फॅमिली पोस्टपेड प्लॅन्स आहेत.

Leave a Comment