वोडाफोन आयडिया नोकिया नेटगार्ड एन्डपॉईंट डिटेक्शन अँड रिस्पॉन्ससोबत आपल्या भारतातील नेटवर्कची सुरक्षा मजबूत करत आहे

Admin

Vodafone वोडाफोन
  • वोडाफोन आयडिया ऑपरेटरच्या कोर नेटवर्कमध्ये नेटगार्ड एन्डपॉईंट डिटेक्शन अँड रिस्पॉन्स लागू करेल, त्यामध्ये भारतातील वोडाफोन आयडियाच्या सर्व ग्राहक एंटरप्राइज सबस्क्रायबर्सना सहभागी करून घेतले जाईल.
  • नोकियाने वोडाफोन आयडियासोबत आपल्या संबंधांचा विस्तार केला, वोडाफोन आयडिया आधीपासून नोकिया उत्पादनांचा वापर करत आहे, यामध्ये विविध कोर सोल्युशन्स आणि ४जी आरएएन यांचा समावेश आहे.

वोडाफोन आयडिया या भारतातील एका सर्वात मोठ्या टेल्को ऑपरेटर कंपनीने सायबर धोके आणि असुरक्षितता वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या ग्राहक व एंटरप्राइज ग्राहकांसाठी नेटवर्क सुरक्षा मजबूत करण्यासाठी नोकिया नेटगार्ड एन्डपॉईंट डिटेक्शन अँड रिस्पॉन्स चा वापर करण्याचे ठरवले आहे.

नेटगार्ड ईडीआर हा टेल्को कंपन्यांसाठी तयार करण्यात आलेला डिटेक्शन सूट वोडाफोन आयडियाला वास्तविक वेळी, स्वयंचलित निगराणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देईल, त्यामुळे वोडाफोन आयडियाला एन्डपॉईंटशी संबंधित असुरक्षितता तातडीने ओळखता येतील आणि दूर करता येतील. यामुळे सुरक्षिततेतील कमतरता कमीत कमी होतील, विस्तारपूर्वक तपासणी करण्याची गरज कमी होईल आणि संचालनासाठी येणाऱ्या खर्चात बचत होईल, त्याचवेळी सेवा सातत्याने उपलब्ध होत राहतील, संपूर्ण ऑपरेशनल टेक्नॉलॉजी (ओटी) नेटवर्कमध्ये संरक्षित एन्डपॉईंट्सची कामगिरी सतत व्यवस्थित होत राहील.

नेटगार्ड ईडीआरच्या व्हेंडर-एग्नोस्टिक क्षमता वोडाफोन आयडियाची सध्याची सुरक्षा उपकरणे आणि प्रक्रियांसोबत सहजपणे एकरूप होतात, ऑपरेटरची नेटवर्क सुरक्षा मजबूत करतात. यामुळे वोडाफोन आयडियाच्या अत्याधुनिक सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर उभारण्याच्या कामाला चालना मिळेल.  

सुरुवातीला यामध्ये वोडाफोन आयडियाचे ४जी नेटवर्क आणि नंतर ५जी नेटवर्क समाविष्ट केले जाईल.

वोडाफोन आयडियाचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (सीटीओ) श्री जगबीर सिंग म्हणाले, “आपल्या प्रगत उपाययोजनांमार्फत अतुलनीय कनेक्टिव्हिटी व सुरक्षा प्रदान केली जावी व नेटवर्क विकासाच्या पुढील टप्प्याला चालना दिली जावी यासाठी वोडाफोन आयडिया बांधील आहे. नोकियासोबत ही वाटचाल करत असताना आम्ही अशी नेटवर्क उभारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे जी लवचिक आहेत आणि सुरक्षा जोखीम वाढल्यामुळे, डिजिटल परिवर्तनामुळे सातत्याने वाढत असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सक्षम आहेत.”

वोडाफोन आयडियाचे चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर (सीआयएसओ) आणि डेटा प्रायव्हसी ऑफिसर श्री माथन बाबू काशीलिंगम यांनी सांगितले, “सर्वात महत्त्वाच्या पायाभूत सेवासुविधांवर सायबर धोक्यांचे प्रमाण वाढले आहे, वोडाफोन आयडियाने आपल्या कोर सबस्क्रायबर आणि आयडेन्टिटी मॅनेजमेंट सिस्टिम्ससाठी टेलिकॉमसाठी खास तयार करण्यात आलेल्या सुरक्षा सुविधांना प्राधान्य दिले आहे. नोकिया नेटगार्ड ईडीआर आमच्या क्षमता वाढविण्याला आणि आमच्या सर्व सबस्क्रायबर्सची सुरक्षा करण्याला एक महत्त्वाची दिशा प्राप्त करून देईल.”

नोकियाचे इंडिया मार्केट लीडर – क्लाऊड आणि नेटवर्क सेवा, श्री अरविंद खुराना म्हणाले, “नेटगार्ड ईडीआर वोडाफोन आयडियाला धोके ओळखण्याच्या आणि त्यावर प्रतिक्रिया देण्याच्या प्रगत क्षमता प्रदान करेल, सातत्याने वाढत असलेल्या आणि अधिक सोफिस्टिकेटेड झालेल्या सायबर धोक्याच्या विरोधात त्यांना स्वतःहून सुरक्षा देता येईल. सहजपणे, संपूर्णपणे एकीकृत होण्याच्या आणि वास्तविक वेळी निगराणी करण्याच्या क्षमतेसह नेटगार्ड ईडीआर ऑपरेटरची महत्त्वपूर्ण टेलिकॉम नेटवर्क्स सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सेवांचे सातत्य कायम राखण्यासाठी त्यांचं ओटी इन्फ्रास्ट्रक्चर देखील मजबूत करेल.”

Leave a Comment