महाराष्ट्रातील वी युजर्सना L900 आणि L2100 विस्तारासह अधिक चांगले इनडोअर कव्हरेज आणि अधिक वेगवान डेटा स्पीड अनुभवता येईल

Admin

वी Vi
  • अधिक चांगले इनडोअर कव्हरेज पुरवण्यासाठी L900 तंत्रज्ञानाचा विस्तार आणि L2100 तंत्रज्ञानामुळे अधिक वेगवान डेटा स्पीड मिळणार
  • महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमध्ये ४२०० हुन अधिक साईट्स या उपक्रमामध्ये समाविष्ट केल्या जात आहेत

वी या आघाडीच्या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने L900 आणि L2100 तंत्रज्ञानाचा विस्तार केल्याची घोषणा आज केली. महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, अहमदनगर, ठाणे यांच्यासह ३५ जिल्ह्यांमध्ये ४२०० साईट्सना याचा लाभ मिळणार आहे. फॉलो-अप पब्लिक ऑफरिंगमध्ये यशस्वीपणे फंड्स उभारल्यानंतर नेटवर्क सेवासुविधा अपग्रेड आणि प्रगत करून सर्वोत्तम नेटवर्क पुरवण्याच्या वी च्या विशाल धोरणाचा हा एक भाग आहे.

या तंत्रज्ञानांच्या विस्तारामुळे भरपूर इमारती असलेल्या आणि उपनगरीय भागांमध्ये वी युजर्सचा इनडोअर नेटवर्क अनुभव लक्षणीय प्रमाणात सुधारेल, आवाजाचा दर्जा सर्वोत्तम असेल आणि डेटा स्पीड देखील आधीपेक्षा जास्त असेल. वी गिगानेट या वी च्या आजवरच्या सर्वोत्तम नेटवर्कवर हे शक्य होईल.

या सर्व नवीन घडामोडींविषयी वोडाफोन आयडियाचे महाराष्ट्र आणि गोव्याचे क्लस्टर बिझनेस हेड श्री रोहित टंडन यांनी सांगितले, “आम्ही नेटवर्क कव्हरेज आणि क्षमता वाढवून आमच्या वापरकर्त्यांना उत्कृष्ट नेटवर्क अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहोत. L900 आणि L2100 ची तैनाती हे वी चे ४जी नेटवर्क महाराष्ट्र वर्तुळात वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही आमच्या नेटवर्कचा विस्तार करत राहू तसेच आमच्या ग्राहकांना आनंद देण्यासाठी संबंधित सेवा आणि ऑफर आणत राहू.”

ग्राहकांसाठी आपले प्लॅन आणि उत्पादनांमध्ये प्रगती घडवून आणण्यासाठी वी अथक प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील युजर्ससाठी नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या काही ऑफर्स पुढीलप्रमाणे आहेत –

● आपल्या प्रीपेड युजर्सना चिंतामुक्त डेटा अनुभव प्रदान करण्यासाठी वीच्या हिरो अनलिमिटेड ऑफरमध्ये रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत अनलिमिटेड हाय स्पीड डेटा, वीकएन्ड डेटा रोलओव्हर आणि कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता दैनंदिन डेटा कोटा व्यतिरिक्त दर महिन्याला २ जीबीपर्यंत अतिरिक्त डेटा पुरवणारे डेटा डिलाईट यांचा समावेश आहे. हा रिचार्ज पॅक युजर्सना ३४९ रुपयांपासून पुढील किमतींना उपलब्ध आहे.
● वी गॅरंटी प्रोग्राम, यामध्ये वी युजर्सना एक वर्षभर १३० जीबी गॅरंटीड अतिरिक्त डेटा मिळेल, सलग १३ सायकल्समध्ये दर २८ व्या दिवशी १० जीबी डेटा आपोआप क्रेडिट केला जाईल. ही ऑफर ५जी स्मार्टफोन असलेल्या किंवा नुकतेच नवीन ४जी स्मार्टफोनला अपग्रेड केलेल्या वी ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे.
● ओटीटी प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता आणि अधिकाधिक मनोरंजन किफायतशीर किमतीला उपलब्ध करवून देण्याची ग्राहकांची वाढती मागणी पाहता, वी मुव्हीज अँड टीव्ही ऍपमध्ये आता १७ ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि ३५० लाईव्ह टीव्ही चॅनेल्स एकाच सबस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहेत. आता दोन नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन्स देखील सुरु करण्यात आले आहेत – वी मुव्हीज अँड टीव्ही प्लस किंमत दर महिन्याला २४८ रुपये आणि वी मुव्हीज अँड टीव्ही लाईट किंमत दर महिन्याला १५४ रुपये.

Leave a Comment