पुण्यामध्ये ‘एज्युकेशन इन आयर्लंड’ रोड शो यशस्वीपणे संपन्न

Admin

एज्युकेशन इन आयर्लंड Education in Ireland

आयरिश उच्च शिक्षण संस्थांचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या “एजुकेशन इन आयर्लंड” या राष्ट्रीय ब्रँडने पुण्यात २०२४ चा प्रमुख ‘शिक्षण रोड शो’ प्रारंभ केला. शेरेटन ग्रँड पुणे बंड गार्डन हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या या वार्षिक मेळाव्यात १८ प्रमुख आयरिश उच्च शिक्षण संस्थांची प्रदर्शनी ठेवण्यात आली.

३५० हून अधिक भारतीय विद्यार्थी आणि पालक आयर्लंडच्या उच्च शिक्षण संस्थांच्या वरिष्ठ प्रतिनिधीं आणि शैक्षणिक तज्ञांशी संवाद साधण्यात मग्न होते, त्यांनी आयर्लंडच्या शैक्षणिक वातावरण, अभ्यासक्रमांची माहिती आणि शिक्षणानंतरच्या कामाच्या संधींचा आढावा घेतला.

एजुकेशन इन आयर्लंड चे भारत आणि दक्षिण आशियाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. बॅरी ओ’ड्रिस्कॉल म्हणाले, आयर्लंडच्या जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणात भारतीय विद्यार्थ्यांची वाढती आवड पाहून आम्हाला आनंद झाला आहे. पुण्यात आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्ही इतर चार शहरांमध्ये संभाव्य विद्यार्थ्यांना भेटण्यास उत्सुक आहोत.

गेल्या वर्षी ८,००० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी आयर्लंडची निवड केली, त्यामुळे आम्ही भारतभरातील प्रतिभावान विद्यार्थ्यांचे आमच्या संस्थांमध्ये स्वागत करण्यासाठी आतुर आहोत.

हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला, ज्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी आयर्लंडची एक प्रमुख अध्ययन स्थळ म्हणून निवड करण्यात मोठी उत्सुकता दर्शविली. रोडशोमध्ये आयरिश व्हिसा ऑफिसच्या तर्फे विद्यार्थ्यांच्या व्हिसा प्रक्रियेवर एक सेमिनार आयोजित केला गेला, तसेच विदेशात अध्ययनासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना निवास आणि आर्थिक सल्ला देणारे तज्ञ उपस्थित होते.

याशिवाय, द फ्युचर ऑफ इंजिनिअरिंग: इमर्जींग ट्रेंड्स या शीर्षकाखाली एक आकर्षक पॅनेल चर्चा झाली, ज्यात आयरिश शैक्षणिक तज्ञ मि. जेम्स कॉलिन्स – टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ऑफ द शॅनन (टीयुएस) मधील व्यवसाय आणि वित्तीय सेवा विभागाचे प्रमुख, मिस डिअर्ब्हल ओ’रेली – ट्रिनिटी कॉलेज डब्लिन (टीसीडी) मधील ई ३ वरिष्ठ व्यवसाय विकास आणि संवाद व्यवस्थापक, आणि डॉ. रजत नाग – युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिन (युसीडी) मधील अभियांत्रिकी व आर्किटेक्चर कॉलेज, बायोसिस्टम्स आणि फूड इंजिनियरिंग शाळेतील सहाय्यक प्राध्यापक उपस्थित होते.

ओ’ड्रिस्कॉल पुढे म्हणाले, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी एजुकेशन इन आयर्लंड काय काय प्रदान करू शकते ते दर्शविण्याची आमची इच्छा आहे—उदाहरणार्थ, स्वागतार्ह वातावरण, मित्रवत लोक आणि उद्योगाभिमुख कार्यक्रमांसह जागतिक दर्जाची संस्था, ज्यांना प्रतिष्ठित अध्यापक शिकवतात.

हा मेळावा विद्यार्थ्यांना विद्यापीठांच्या प्रतिनिधीं आणि शैक्षणिक तज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी प्रदान करतो, ज्यामुळे त्यांना अभ्यासक्रम, व्हिसा आवश्यकता आणि करिअर संधींबाबत सखोल प्रश्न विचारता येतात. संस्थांसोबत आणि इतर तज्ञांबरोबर थेट संवादामुळे विदेशात अध्ययनाबाबतच्या चिंतांचे स्पष्टीकरण मिळते आणि आयर्लंडची भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक आवडते ठिकाण म्हणून असणारी ख्याती आणखी मजबूत होते.

Leave a Comment