नाविन्यपूर्ण आर्किटेक्चरल डिझाईनच्या माध्यमातून लक्झरी जीवनशैलीचा नवा अर्थ मांडणाऱ्या मार्व्हल रिअल्टर्सची ओळख पुण्यातील लक्झरी रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रणी म्हणून आहे. पुण्याच्या विकसित होत असलेल्या बाजारपेठेसाठी कंपनीने महत्त्वाकांक्षी योजना आखली असून पुढील तीन ते चार वर्षांत १,८०० पेक्षा अधिक युनिट्स वितरित करण्याची मार्व्हल रिअल्टर्सचे नियोजन आहे.
उत्कृष्टतेची आपली परंपरा पुढे चालू ठेवत मार्व्हल रिअल्टर्स कोरेगाव पार्क, बोट क्लब रोड, विमान नगर, खराडी, हडपसर, मगरपट्टा, बावधन आणि वाघोली येथे प्रीमियम निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांची मालिका सुरू करण्यास सज्ज झाली आहे. या प्रकल्पांमुळे उच्च दर्जाच्या राहणीमानात नवीन मापदंड स्थापित होणार असून भव्य लेआउटसह घरे, पूर्णपणे सुसज्ज लक्झरी अपार्टमेंट आणि उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमध्ये त्यांचे नेतृत्व आणखी मजबूत होईल.
बाजारपेठेतील वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने पूर्णपणे सुसज्ज स्टुडिओ अपार्टमेंट्स आणि प्रीमियम टचसह रेडी-टू-मूव्ह-इन युनिट्स सादर करण्याची मार्व्हल रिअल्टर्सची योजना आहे. यामध्ये इन-हाऊस स्पा, सलून, गॉरमेट शेफ आणि वॉलेट सेवांसह अन्य विशेष सेवाही असतील. त्यामुळे लक्झरी आणि सोयींचा अनोखा मिलाफ होणार आहे.
आपले ध्येय अधोरेखित करताना मार्व्हल रिअल्टर्सचे व्यवस्थापकीय संचालक. विश्वजीत झवर म्हणाले, मानवी अनुभव समृद्ध करणाऱ्या राहण्याच्या जागा तयार करणे हे आमचे नेहमीच ध्येय राहिले आहे. डिझाईनमधील नाविन्यपूर्णता, शाश्वतता आणि स्मार्ट लिव्हिंग सोल्यूशन्स यांना एकत्र आणून अतुलनीय गुणवत्ता प्रदान करण्यासाठी आणि शहरी जीवनशैलीला नवा अर्थ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
कंपनीने आतापर्यंत ५० हून अधिक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. यामध्ये ४५० हून अधिक इमारती आणि ९,००० अपार्टमेंटचा समावेश असून २७ दशलक्ष चौरस फूट विकसित जमिनीचा समावेश आहे. डिझाईनमधील उत्कृष्टता, नावीन्य आणि शाश्वततेसाठी अखंड समर्पणाने मार्व्हल रिअल्टर्स आधुनिक जीवनशैलीच्या कक्षा रूंदावत आहे.
मार्व्हल रिअल्टर्सने सातत्याने पुण्यातील काही प्रमुख ठिकाणी अत्यंत प्रतिष्ठेचे लक्झरी प्रकल्प पूर्ण केले आहेत. कंपनीने वाघोली येथील मार्व्हल फ्रिया आणि विमाननगर येथील मार्व्हल पियाझा यांसारखे प्रकल्प अलीकडेच पूर्ण केले आहेत. गुणवत्ता, सुविधा आणि लँडस्केपिंगमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त कामगिरी करण्यासाठी कंपनीची कटिबद्धता त्यातून व्यक्त झाली आहे. बोट क्लब रोडवरील मार्व्हल रिबेरा, मगरपट्टा येथील मार्व्हल बाउंटी, एनआयबीएम रोडवरील मार्व्हल आयसोला आणि खराडी येथील मार्व्हल अॅक्वानस यासारखे उच्च दर्जाचे प्रकल्प पुढील तीन ते सहा महिन्यांत पूर्ण होणार आहेत.
रिअल इस्टेट क्षेत्रात प्रगत नवकल्पना आणणारी अग्रणी कंपनी म्हणून मार्व्हल रिअल्टर्सने होम ऑटोमेशन, डबल-हाईट बाल्कनी, आयात केलेले संगमरवरी फ्लोअरिंग, वैयक्तिक स्टीम शॉवर आणि खाजगी पूल यासारख्या वैशिष्ट्यांसह नवीन मापदंड स्थापित केले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या वैशिष्ट्यांचा वापर करून आधुनिक राहणीमानाच्या अनुभवांमध्ये क्रांती घडवून आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
शाश्वततेवर कंपनीने लक्ष केंद्रित केल्यामुळे ऊर्जा-कार्यक्षम इमारती, व्यापक हिरवे लँडस्केपिंग आणि अक्षय ऊर्जा एकत्रीकरणावर कंपनीने भर दिला आहे. मार्व्हल रिअल्टर्सने प्लॅटिनम-ग्रीन प्रमाणपत्रासाठी पाठपुरावा केलेला असून पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार विकासावरील त्यांची निष्ठा त्यातून अधोरेखित होते.
नवोन्मेष आणि शाश्वततेवर लक्ष केंद्रित करून मार्व्हल रिअल्टर्सने चोखंदळ घरमालकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारे कालातीत, डिझाइन-चालित प्रकल्प सादर केले आहेत. त्यामुळेच रिअल इस्टेट क्षेत्रात ती आघाडीवर आहे.
मार्व्हल रिअल्टर्स केवळ घरे बांधत नाहीयेत तर पुण्यातील लक्झरी राहणीमानाचे भविष्य घडवत आहेत. उत्कृष्ट इतिहास, दर्जाशी कोणतीही तडजोड न कऱणे आणि दूरदर्शी दृष्टिकोन यामुळे कंपनी रिअल इस्टेट उद्योगात आघाडीवर आहे. आपल्या वाढीच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करत असताना, परिवर्तनकारी अनुभव, अपवादात्मक गुणवत्ता आणि ग्राहक-केंद्रित उपाय प्रदान करण्यावर मार्व्हल रिअल्टर्स लक्ष केंद्रित करत आहे.