ॲमवेइंडिया ग्राहकांच्या कल्याणाच्या बाबतीत संरक्षक उपाययोजना राबविण्यासाठी आणि आपल्या वितरकांना आधार देण्यासाठी भरभक्कम प्रयत्न करत आहे

Admin

Amway ॲमवेइंडिया

ॲमवे इंडिया ही आरोग्य आणि कल्याण यांना समर्थन देणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे आणि ग्राहक व वितरक यांचे हित आणि कल्याण या दोन्हींच्या बाबतीत संरक्षक उपाययोजना राबविण्यासाठी आपली अढळ बांधिलकी दर्शवित आहे. तिने आपल्या उत्पादनांच्या अनधिकृत विक्रीबद्दल भागधारकांना शिकविण्यासाठी एक मजबूत जागरूकता मोहीम सुरू केली आहे.

सर्वसमावेशक धोरणात भागधारकांना जोखमींविरूद्ध शिकविणे, पुरवठा साखळीवर देखरेख वाढविणे, गुन्हेगारांविरूद्ध कठोर उपाययोजना करणे आणि अधिकृत वितरकांसाठी लक्ष्यित समर्थन सत्रे आणि संसाधने यांचा समावेश आहे. हे पाऊल ॲमवेच्या ग्राहक संरक्षणासाठीच्या समर्पणाला पुष्टी देते आणि ॲमवे वितरक किंवा अधिकृत ॲमवे वेबसाइटद्वारे खरेदी केल्यास त्यांना अस्सल ॲमवे उत्पादने आणि संबंधित फायदे मिळतील याची खात्री करून साध्य केले जात आहे.

अनधिकृत विक्री फक्त थेट विक्रीपुरती मर्यादित नाही. बऱ्याचदा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म किंवा तृतीय-पक्ष विक्रेत्यांसारख्या अनधिकृत माध्यमांद्वारे उत्पादनांचे वितरण केले जात असते आणि बऱ्याच कंपन्या या समस्येशी झगडत आहेत. हे उत्पादनाचा अस्सलपणा आणि ग्राहकांची सुरक्षितता यांना धोक्यात आणते.

ॲमवे इंडियाने ग्राहकांची सुरक्षा आणि उत्पादनांचा अस्सलपणा यांसाठी बांधिलकी स्वीकारलेली असून ती संभाव्य नकली आणि हानिकारक उत्पादनांपासून आपल्या ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी अनधिकृत विक्रीविरूद्ध सक्रिय लढा देत आहे. ॲमवे इंडिया कठोर गुणवत्ता नियंत्रण उपाययोजना राबवते आणि ग्राहकांपर्यंत पोहोचणारे प्रत्येक उत्पादन सर्वोच्च मानकांची पूर्तता करत आहे, याची खात्री करते.

परंतु अनधिकृत विक्रेते बऱ्याचदा हे कठोर गुणवत्ता नियंत्रण उपाय डावलून लावतात. हे ग्राहकांना तर धोक्यात आणतेच पण त्यासोबतच समर्पित ॲमवे वितरकांचा विश्वास आणि कठोर परिश्रम यांना सुद्धा कमकुवत करते. कंपनी अनधिकृत विक्रीविरूद्ध शून्य सहिष्णुता धोरणाचे अनुसरण करते, ज्यात अनधिकृत विक्रीत गुंतलेल्या वितरकांना निलंबित करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी अगदी स्पष्ट मार्गदर्शक तत्वांचा आणि कृतींचा समावेश आहे आणि हे सुनिश्चित करते की अस्सल ॲमवे उत्पादने केवळ ॲमवेने अधिकृत केलेल्या माध्यमांद्वारे उपलब्ध केली जात आहेत.

ॲमवे इंडिया तडजोड न केलेली गुणवत्ता आणि प्रामाणिकता सुनिश्चित करते आणि हे फक्त ॲमवे वितरक आणि तिची अधिकृत वेबसाइट (www.amway.in) या अधिकृत माध्यमांद्वारे खास पद्धतीने आपली उत्पादने वितरित करून साध्य करत आहे. दुकाने, सुपरमार्केट्स, ब्रोकर्स, डीलर्स किंवा इतर कोणत्याही तृतीय-पक्ष ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स यांच्यामाध्यमातून विक्री करण्यास कंपनीची सक्त मनाई आहे आणि कंपनी या स्त्रोतांकडून उत्पादनांच्या अस्सलपणाची किंवा गुणवत्तेची हमी देत नाही.

भारतातील ॲमवेच्या सर्व उत्पादनांच्या अस्सलपणाची आणि गुणवत्तेची पुष्टी करण्यासाठी त्यांना ‘ॲमवे डायरेक्ट सेलिंग पार्टनर्स तर्फे विकले जात आहे‘ असे लेबल लावले जाते. अधिकृत स्त्रोतांकडून खरेदी करून, ग्राहकांना कोणत्याही समस्येसाठी मनी-बॅक गॅरंटीद्वारे समर्थित जागतिक दर्जाच्या उत्पादनाच्या गुणवत्तेची आणि अधिकृत वितरकांनी प्रदान केलेल्या गरजेवर आधारित शिफारसींचा लाभ मिळण्याची खात्री दिली जाते.

ॲमवेने पारदर्शकता राखण्याची बांधिलकी स्वीकारल्याने ग्राहकांना कच्च्या मालापासून तयार मालापर्यंत उत्पादन प्रवास उपलब्ध असतो. यामुळे सुरक्षितता आणि एकूणच कल्याणासाठी ब्रँडच्या समर्पणास बळकटी लाभते. वितरकांनी ग्राहकांच्या प्रश्नांचे निराकरण करताना त्यांना समर्थन देण्यासाठी, ॲमवे सर्वसमावेशक संसाधने प्रदान करून अचूक माहितीची देवाणघेवाण सुनिश्चित करते. कंपनीची कम्प्लायन्स टीम आपल्या वितरकांसाठी विशेष सत्रांचे आयोजन करते.

या सत्रांव्यतिरिक्त कंपनी सोशल मीडिया मोहिमा, वर्तमानपत्रांमधील कायदेशीर सूचना आणि वेबसाइटवरील चेतावणी संदेश यांच्या माध्यमातून आपल्या वितरकांना आणि त्यांच्या ग्राहकांना अनधिकृत विक्री जोखमीबद्दल माहिती देत असते. याउप्पर, ॲमवे इंडिया आपली उत्पादने जलदगतीने उपलब्ध व्हावीत म्हणून सतत प्रयत्न करत असते आणि असे करताना तिने आपले वितरण नेटवर्क भक्कम केलेले आहे.

आता 17000+ पिन कोड्स पर्यंत तिचा विस्तार झालेला असून ॲमवेने 1.6 दिवसांचा सरासरी वितरण वेळ साध्य करण्यात यश मिळवले आहे. मेट्रो शहरांमधील 87% ऑर्डर आता फक्त 24 तासांच्या आत ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. शेवटच्या महत्वपूर्ण टप्प्यावर वितरणावर लक्ष केंद्रित केल्याने ग्राहकांचे समाधान तर वाढतेच, शिवाय अनधिकृत विक्रीचे आवाहन सुद्धा प्रभावीपणे कमकुवत केलेले आहे.

Leave a Comment