मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स करिअर विकासचा उपक्रम
- भारतात १०,००० महिलांना आरोग्य विमा सल्लागार म्हणून नियुक्त करून विमा क्षेत्रात महिलांची भागीदारी वाढविण्याचे कंपनीचे लक्ष्य
- महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये या करिअर विकास उपक्रमाची अंमलबजावणी होणार
भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्वतंत्र आरोग्य विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सने आज “नई शुरुआत, एक्सपर्ट के साथ” या आपल्या नवीनच सुरू केलेल्या करियर विकास उपक्रमाचे पुण्यात आयोजन केले. महिलांना यशस्वी आरोग्य विमा सल्लागार बनविण्याचे या उपक्रमाचे लक्ष्य आहे.
मराठी चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्री अदिती विनायक द्रविड आणि बहुमुखी कलावंत, अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शक आणि लेखिका मधुरा टापरे आगरकर या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होत्या.
संपूर्ण देशात १०,००० महिलांना सल्लागार बनविण्याचे मणिपालसिग्नाचे ध्येय असून “नई शुरुआत, एक्सपर्ट के साथ”हा त्याचा एक भाग आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पश्चिम क्षेत्रातील १,००० महिलांना आधार देऊन समर्थ बनविण्याचे कंपनीचे ध्येय आहे.
महिलांना प्रशिक्षण व आधार देऊन, त्यांना आवश्यक ती कौशल्ये आणि ज्ञान देण्यासाठी या महिलांच्या करिअर विकास उपक्रमाची रचना करण्यात आली आहे, जेणेकरून आरोग्य विमा सल्लागार म्हणून त्या कार्यक्षम होतील. आरोग्य विमा विषयातील विविध पैलूंचा या प्रशिक्षणात समावेश आहे. यात उत्पादनाची माहिती, कार्यक्षम विक्री धोरण, ग्राहक सेवा कौशल्य आणि त्या अत्यावश्यक संवादाचे तंत्रे यांचा समावेश आहे.
मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर सपना देसाई म्हणाल्या, “करिअरचा विकास आणि उद्यमशीलता यांच्यासाठी आरोग्य विभाग क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत. हा उपक्रम म्हणजे केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नाही, तर आरोग्य विमा उद्योगात प्रतिभावंत महिलांसह समावेशक आणि समर्थ कर्मचारी वर्ग निर्माण करण्याची ती एक संधी आहे.
महिलांना कौशल्य देऊन आणि त्यांना आवश्यक असलेल्या संधी देऊन आम्ही केवळ महिलांच्या करिअरचा विकास करत नाही, तर समाजात त्या पार पाडत असलेल्या विविध भूमिकांसाठी त्यांना बळ देत आहोत. आम्ही ज्यांची सेवा करत आहोत त्या समुदायांएवढाच वैविध्यपूर्ण कर्मचारी वर्ग घडविणे, जेणेकरून प्रत्येकाला यशाची समान संधी मिळावी याची हमी मिळावी, हे आमचे ध्येय आहे.”
मणिपालसिग्नाच्या “नई शुरुआत, एक्सपर्ट के साथ”या कार्यक्रमाला आरोग्य विमा क्षेत्रात पुन्हा आपले करिअर निर्माण करण्याची इच्छा असलेल्या १०० पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या. सपना देसाई यांच्या बीजभाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रशिक्षण व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी “विमेन ऑफ वंडर हा विशेष संवादात्मक कार्यक्रम झाला.
यात मणिपालसिग्नामधील आघाडीच्या महिला सल्लागारांचा समावेश असलेली पॅनल चर्चा झाली. त्यांनी कंपनीतील आपल्या वाटचालीचा पट मांडला. अदिती विनायक द्रविड आणि मधुरा टापरे आगरकर यांनी उपस्थितांशी संवाद साधत आपल्या समोरची आव्हाने आणि आपापल्या क्षेत्रात मिळविलेले यश यांची प्रेरणादायक माहिती दिली. विशेष कामगिरी करणाऱ्या महिला सल्लागारांच्या योगदानाला दाद देत त्यांच्या सत्काराने कार्यक्रमाची सांगता झाली. भावी सल्लागारांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली.
करिअरच्या नवीन संधी शोधू पाहणाऱ्या तसेच मणिपालसिग्नाच्या आरोग्य विमा सल्लागारांच्या नेटवर्कचा भाग होऊ इच्छिणाऱ्या महिला आमच्या वेबसाईटवरून नोंदणी करू शकतात किंवा युनिट दुसरा मजला, सुभद्रा भवन, १२४० ए, आपटे रोड, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र ४११००४ येथील आमच्या पुणे शाखा कार्यालयात संपर्क करू शकतात.
विमा क्षेत्रात अधिक समावेशी आणि प्रातिनिधिक कर्मचारी वर्ग निर्माण करण्याच्या मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सच्या प्रयत्नांमधील हा उपक्रम एक मैलाचा दगड होता. भारतातील १०,००० महिलांची भरती करण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षी ध्येयासह कंपनी या उद्योगात भरीव योगदान करण्यासाठी सज्ज आहे. तसेच व्यावसायिक यश आणि वाढ साध्य करण्यासाठी महिलांना समर्थ करत आहे.
मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सच्या उपलब्ध उत्पादन पोर्टफोलिओबद्दल अधिक माहिती साठी कृपया https://www.manipalcigna.com/health-insurance या वेबसाईटला भेट द्या.