- वी बिझनेस कॉर्पोरेट पोस्ट–पेड सबस्क्रायबर्सना त्यांच्या वैयक्तिक गरजा, जसे की, इंटरनॅशनल रोमिंग आणि ओटीटी इत्यादींसाठी सेवा निवडून खरेदी करता येणार.
- वी ऍपवर सेवा खरेदी करता येणार.
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाचा एंटरप्राइज विभाग, वी बिझनेसने आज कॉर्पोरेट पोस्ट-पेड प्लॅन्समध्ये ईझी+ हा एक नाविन्यपूर्ण प्रस्ताव लॉन्च केला आहे.
त्यामुळे सबस्क्रायबर्सना त्यांच्या सध्याच्या कॉर्पोरेट प्लॅन्समध्ये स्वतःच्या वैयक्तिक गरजा, जसे की, इंटरनॅशनल रोमिंग आणि ओटीटी इत्यादींसाठी सेवा निवडून खरेदी करता येणार आहेत. वी ऍप डाउनलोड करून या सेवेचा लाभ घेता येईल.
हा अशाप्रकारचा पहिलाच प्रस्ताव असून यामध्ये अतिशय सहजसोपा दृष्टिकोन प्रस्तुत करण्यात आला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या कॉर्पोरेट पोस्ट-पेड प्लॅन्समध्ये त्यांना हव्या त्या सेवा खरेदी करता येतील. यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या एकंदरीत अनुभवात लक्षणीय वाढ होईल.
एंटरप्राइज मोबिलिटी बिझनेस अँड मार्केटिंगचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट रोएरीच कौशल यांनी सांगितले, “ईझी+ सादर करून वी बिझनेस कॉर्पोरेट पोस्टपेड प्लॅनमधून मिळणाऱ्या अनुभवात लक्षणीय परिवर्तन घडवून आणत आहे, कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक गरजांसाठी सेवा निवडून, खरेदी करण्याची लवचिकता देत आहे.
सध्याच्या कनेक्टेड जगामध्ये कर्मचाऱ्यांना सहजसोपा अनुभव हवा असतो, जेणेकरून त्यांना इंटरनॅशनल रोमिंग, ओटीटी सबस्क्रिप्शन्स, डेटा पॅक आणि इतर अनेक सेवांसाठी निवडीला अजून जास्त वाव मिळेल, त्यासाठी मंजुरी मिळवत बसण्याची किंवा वेगवेगळे मोबाईल नंबर सांभाळत राहण्याची गरज उरणार नाही.”
त्यांनी पुढे सांगितले, “या प्रस्तावामुळे सुविधा मिळतील, इतकेच नव्हे तर, आधुनिक कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांबरहुकूम सेवा सादर करण्याची आमची वचनबद्धता देखील यामधून दिसून येते. आगामी सुट्ट्यांच्या हंगामात आमचे युजर्स ईझी+ चा वापर करून इंटरनॅशनल रोमिंग पॅक्सचा लाभ घेऊ शकतील, त्यांच्या कॉर्पोरेट पोस्ट-पेड प्लॅन्सवरील सुविधांचा आनंद मिळवू शकतील.”
वी बिझनेसच्या ईझी+ ऑफर्समध्ये यांचा समावेश आहे:
- इंटरनॅशनल रोमिंग: ग्राहक तब्बल २९ देशांमध्ये वैयक्तिक प्रवासासाठी इंटरनॅशनल रोमिंग पॅक सहज खरेदी करू शकतील. यामध्ये २४ तास, १० दिवस आणि १४ दिवसांच्या वैधतेचे पॅक उपलब्ध आहेत, यांच्या किमती ७४९ रुपयांपासून ४९९९ रुपयांपर्यंत आहेत.
- *ओटीटी सबस्क्रिप्शन्स: मनोरंजनासाठी सोनी लिव, झी५ आणि इतर ओटीटी सबस्क्रिप्शन्सचा आनंद घेता येईल.
- गिफ्टिंग: यामध्ये कॉर्पोरेट युजर्स ओटीटी सबस्क्रिप्शन पॅक इतरांना भेट म्हणून देऊ शकतील, यासाठी ते थेट त्यांच्या कॉर्पोरेट नंबरचा वापर करू शकतील, मनोरंजन शेयर करण्याचा हा एक अतिशय चांगला पर्याय आहे.
- वी ऍपवर ईझी+ चा सहज लाभ घेता येईल. डाउनलोड लिंक – https://vi.app.link/viappisnt