- शाही स्नान, आखाडा मिरवणुका आणि गंगा आरती यांच्यासह संपूर्ण लाईव्ह कव्हरेज वी युजर्स पाहू शकणार, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावरून थेट तुमच्या मोबाईलवर वी मूव्हीज अँड टीव्ही ऍपवर किंवा वी ऍपवर, ही सेवा शेमारूच्या सहयोगाने उपलब्ध करवून दिली जात आहे.
१२ वर्षातून एकदा येणारा, आध्यात्मिक सोहळा, १५६ किमी लांबी, २२ पोंटून पुलांचा समावेश असलेला महाकुंभ मेळा १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित केला जात आहे. या भव्य कार्यक्रमाला यावर्षी ४० कोटी यात्रेकरूंची उपस्थिती अपेक्षित आहे, ज्यामुळे हा सर्वात मोठ्या मानवी मेळाव्यांपैकी एक म्हणून गणला जाईल.
महाकुंभ मेळ्याचा लाभ सर्वांना घेता यावा यासाठी देशातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर वी ने शेमारूच्या सहयोगाने वी मूव्हीज अँड टीव्ही ऍपवर त्याचे थेट प्रक्षेपण करण्याचे ठरवले आहे.
१४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी, २९ जानेवारी रोजी मौनी अमावास्येला आणि २६ फेब्रुवारी रोजी महा शिवरात्रीला पवित्र पाण्यामध्ये संत आणि भाविकांच्या शाही स्नानाचा सोहळा घरबसल्या अनुभवता येईल. एक्सक्लुसिव्ह रेकॉर्डेड कन्टेन्ट, आखाड्यांच्या विशेष टूर, लोकसंगीत, भक्तिगीते, सांस्कृतिक सादरीकरणे यांचा आनंद घेता येईल. कोट्यावधी यात्रेकरूंसाठी उभारण्यात आलेल्या प्रचंड मोठ्या सुविधांची अचंबित करणारी माहिती मिळवता येईल. संत आणि आध्यात्मिक गुरूंच्या विशेष मुलाखती, कल्पवासींवरील खास कार्यक्रम आणि पहिल्यांदाच महाकुंभ मेळ्याला भेट देणाऱ्यांचे हृदयस्पर्शी अनुभव देखील पाहता, ऐकता येतील.
तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना एकमेकांशी, अनुभवांशी जोडण्याप्रती वी ची वचनबद्धता या उपक्रमातून रेखांकित झाली आहे. ओटीटीच्या दर्शकांमध्ये होत असलेल्या वाढीमध्ये ६०% योगदान द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांचे आहे, स्थानिक व आध्यात्मिक कन्टेन्टची मागणी वाढत आहे. या बाबी ध्यानात घेऊन वी ने महाकुंभ मेळ्याचा अनुभव सर्वांना घेता येईल अशी सुविधा उपलब्ध करवून दिली आहे. वी मूव्हीज अँड टीव्ही टॅबमध्ये वी ऍपवर किंवा वी मूव्हीज अँड टीव्ही ऍपवर हा कन्टेन्ट थेट प्रक्षेपित केला जाणार आहे, कधीही, कुठूनही तुम्ही तो पाहू शकाल. ही सुविधा शेमारूच्या सहयोगाने उपलब्ध करवून दिली जात आहे.
आपल्या युजर्सना अतुलनीय अनुभव प्रदान करण्यासाठी वी ने आपले ४जी नेटवर्क संपूर्ण भारतभर वाढवले आहे, यामध्ये ४६००० नवीन साईट्स समाविष्ट करण्यात आल्या आहेत, ५८००० पेक्षा जास्त साईट्सची क्षमता वाढवण्यात आली आहे, परिणामी संपूर्ण देशभरात सर्वोत्तम कनेक्टिविटीचा अनुभव घेता येत आहे. ओपनसिग्नलच्या नोव्हेंबर २०२४ च्या अहवालानुसार, ४जी लाईव्ह व्हिडिओ अनुभव, ४जी डाउनलोड आणि अपलोड स्पीड्स आणि गेमिंग परफॉर्मन्स या चार प्रमुख विभागांमध्ये संपूर्ण देशभरात वी चे ४जी नेटवर्क सर्वात आघाडीवर आहे.