टीव्हीएस मोटर कंपनीतर्फे भारतीतल पहिली, ब्लुटुथ कनेक्टेड, इलेक्ट्रिक थ्री व्हीलर – TVS King EV MAX लाँच

Admin

TVS King EV MAX

टीव्हीएस मोटर कंपनी या आघाडीच्या आणि दुचाकी व तीन चाकी वाहन उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीने आज आपली कनेक्टेड पॅसेंजर इलेक्ट्रिक थ्री व्हीलर – TVS King EV MAX लाँच केल्याचे जाहीर केले आहे. या वाहनामध्ये सर्वोत्तम वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत व त्यात टीव्हीएस स्मार्टकनेक्टद्वारे ब्लुटुथ कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे.

TVS King EV MAX मध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा पर्यावरणपूरक सुविधांशी मेळ घालत त्याद्वारे शाश्वत शहरी वाहतुकीच्या पर्यायाची मागणी पूर्ण केली जाणार आहे.

लाँचप्रसंगी टीव्हीएस मोटर कंपनीच्या कमर्शियल मोबिलिटी विभागाचे बिझनेस हेड श्री. रजत गुप्ता म्हणाले, ‘TVS King EV MAX चे लाँच लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या बांधिलकीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

शहरीकरण वाढत असल्यामुळे हरित वाहतुकीच्या पर्यायांची गरजही खूप वाढली आहे. TVS King EV MAX मध्ये आधुनिक इलेक्ट्रिक प्रोपल्शनचा दर्जेदार आरामदायीपणा व कनेक्टिव्हिटीशी मेळ घालण्यात आला आहे. लांब पल्ल्याचे, प्रभावी अक्सलरेशन, वेगवान चार्जिंग यांमुळे जास्त प्रवास शक्य होतो व पर्यायाने ग्राहक तसेच फ्लीट ऑपरेटर्सना जास्त चांगले उत्पन्न कमावता येते. ही गाडी युपी, बिहार, जम्मू- काश्मीर, दिल्ली आणि पश्चिम बंगाल येथे लाँच करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत ती देशभरात उपलब्ध केली जाईल.’

Text Box: सर्वोत्तम वैशिष्ट्ये:
•	सर्वोत्तम पिक अप/ अक्सलरेशन – 
	0-30 km/h ३.७ सेकंदांत
•	60 kmph चा सर्वोत्त वेग
•	वॉरंटी ६ वर्ष / १.५ लाख किमी
•	ग्रेडिबिलिटी – 31%
•	500 mm चे वॉटर वेडिंग
•	चार्जिंगचा वेळ – ३ तास ३० मिनिटे
फर्स्ट क्लास वैशिष्ट्ये
•	एलईडी हेडलॅम्प आणि टेल लॅम्प
•	ब्लुटुथ अनेबल्ड टीव्हीएस स्मार्टकनेक्टसह कनेक्टेड वैशिष्ट्ये 

fleet management solution


•	Certified Range (179KM)
•	Pick-up / Acceleration
•	Top-speed of 60+ kmph
•	Warranty 6 years / 1.5 Lac Kms
•	Free maintenance for 3 years
•	Gradability – 31%
•	Water wading	 of 500 mm
•	Charging time of 3 hours & 25 min

First-in Class Features

•	LED Headlamp & Tail lamp
•	Connected features with telematics & BT
•	Customisable fleet management solution


एकाच चार्जमध्ये १७९ किमी जाण्याची क्षमता, ० ते ८० टक्के चार्जसाठी केवळ २ तास १५ मिनिटांत होणारे जलद चार्जिंग आणि १०० टक्के चार्जिंगसाठी ३.५ तासांचा कालावधी, टीव्हीएस स्मार्टकनेक्टसारखी स्मार्ट वैशिष्ट्ये यांसह युजर्सना त्यांच्या स्मार्टफोनद्वारे रियल- टाइम नॅव्हिगेशन, अलर्ट्स आणि व्हिईकल डायग्नॉस्टिक्ससचा वापर TVS King EV MAX मध्ये करता येतो. या गाडीमध्ये दमदार कामगिरी, आरामदायीपणा, कनेक्टिव्हिटी यांचे योग्य समीकरण साधण्यात आल्यामुळे आधुनिक शहरी वाहतुकीसाठी ही गाडी सर्वात चांगला पर्याय आहे.

TVS King EV MAX मध्ये 51.2V लिथियम- आयन एलएफपी बॅटरी देण्यात आल्यामुळे शहरातील प्रवासासाठी ती योग्य आहे. 60 km/h चा सर्वोच्च वेग (इको मोड: 40 kmph; सिटी: 50 kmph; पॉवर : 60 kmph) आणि प्रशस्त कॅबिन व सुयोग्य सीटिंग डिझाइन यांसह ही गाडी प्रवासात सर्वाधिक आराम देते.

The TVS King EV MAX युपी, बिहार, जम्मू- काश्मीर, दिल्ली आणि पश्चिम बंगाल येथील निवडक वितरकांकडे रू.२,९५,००० (एक्स शोरूम दिल्ली) किंमतीते उपलब्ध आहे. या गाडीवर ६ वर्ष किंवा १५०,००० किमीची वॉरंटी (जे आधी असेल त्याप्रमाणे), पहिली तीन वर्ष 24/7 रोड- साइड असिस्टन्स देण्यात येणार आहे.

Leave a Comment