~ 2027 पर्यंत भारतातील EV चार्ज पॉईंट्स दुप्पट पेक्षा जास्त वाढवणार
~आपल्या खुल्या सहयोग (ओपन कोलॅबरेशन) फ्रेमवर्क मार्फत 30,000+ सार्वजनिक फास्ट चार्जर्स सक्षम करणार
~TATA.ev मेगा चार्जर नेटवर्क लॉन्च करून सुपरफास्ट आणि विश्वासार्ह चार्जिंग आणणार
~चार्जिंगची चिंता कमी करण्यासाठी TATA.ev सत्यापित चार्जर्स आणि चार्जिंग हेल्पलाइन दाखल केली
2019 पासून भारतात EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याच्या बाबतीत TATA.ev आघाडीवर आहे. आधी सुरळीत खाजगी / घरगुती चार्जिंग सोल्यूशन्स दाखल करण्यासाठी टाटा समूहाच्या कंपन्यांशी भागीदारी करून आणि नंतर EV चा झटपट स्वीकार करणाऱ्या शहरात आणि शहराच्या आजूबाजूस सार्वजनिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुरू करून त्यांनी सुरुवातीच्या काळातच EVs चा स्वीकार करणाऱ्यांना महत्त्वाचा आधार आणि प्रोत्साहन प्रदान केले आहे.
विकासाच्या नव्या टप्प्याला चालना देण्यासाठी TATA.ev ने आपले ‘खुल्या सहयोगा’चे फ्रेमवर्क 2023 मध्ये लॉन्च केले आणि चार्ज पॉइंट ऑपरेटर्स (CPO) तसेच ऑइल मार्केटिंग कंपन्यांशी (OMCs) धोरणात्मक भागीदारी दृढ केली. या सहयोगाचा फोकस प्रामुख्याने लांबचे प्रवास सुरळीत होण्याची खातरजमा करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी आणि विशेषतः महामार्गांवर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर विस्तारित करण्यावर होता. परिणामी, अवघ्या 15 महिन्यांत भारतातील चार्जिंग पॉईंट्सची संख्या दुप्पटपेक्षा जास्त झाली आणि 18000 चार्जर्सच्या वर गेली. TATA.ev च्या एकत्रित प्रभावामुळे 200 पेक्षा जास्त शहरांत 1.5 लाखापेक्षा जास्त खाजगी / घरगुती चार्जर्स, 2500 समुदाय चार्जर्स आणि TATA डीलरशिप्सच्या ठिकाणी 750 चार्जर्स बसवण्यात आले.
आणि आता, भारतातील EVs च्या वाढत्या क्षमतेला पूर्णपणे उन्मुक्त करण्यासाठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर खूप झपाट्याने वाढणे गरजेचे आहे. देशभरात 5 बिलियन किलोमीटर पेक्षा जास्त फिरल्यानंतर आता TATA.ev ला EV यूझर्सच्या गरजा अचूक समजल्या आहेत आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर नक्की कुठे आवश्यक आहे, हे देखील त्यांनी नेमके ओळखले आहे.
‘ओपन कोलॅबरेशन 2.0’ मार्फत TATA.ev भारताच्या EV चार्जिंग ईकोसिस्टमला वेग देत आहे. त्यांचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे: येत्या दोन वर्षांमध्ये चार्जिंग पॉईंट्सची संख्या दुप्पटपेक्षा जास्त वाढवून 400,000 वर पोहोचवणे.
हे साध्य करण्यासाठी, 30,000 नवीन सार्वजनिक चार्जिंग पॉईंट्स स्थापित करण्याच्या उद्देशाने TATA.ev प्रमुख चार्जिंग पॉइंट ऑपरेटर्स (CPOs) सोबत आपला सहयोग अधिक दृढ करत आहे. ही चार्जिंग स्टेशन्स सर्व EV मेक्स आणि ब्रॅंड्सना समर्थन देतील. ज्यामुळे व्यापक उपलब्धता, सोय आणि सर्व EV यूझर्स, चार्ज पॉइंट ऑपरेटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्लानर्ससाठी परस्परांना लाभदायक अशा ईकोसिस्टमची खातरजमा होईल.सार्वजनिक, सामुदायिक आणि खाजगी / घरगुती चार्जर्सचे हे व्यापक आणि निर्बाध नेटवर्क उत्सर्जन-मुक्त गतीशीलतेची वाढती मागणी पूर्ण करेल, EV च्या अंगिकारास प्रोत्साहन देईल आणि हरित, शाश्वत भविष्याकडे वळण्याच्या भारताच्या प्रयत्नांना गती देईल.
‘ओपन कोलॅबरेशन 2.0’ च्या लॉन्चविषयी बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मॅनिजिंग डायरेक्टर श्री. शैलेश चंद्रा म्हणाले, “TATA.ev पहिल्यापासून भारताच्या EV क्रांतीच्या आघाडीवर आहे. त्यांनी केवळ जागतिक दर्जाची इलेक्ट्रिक वाहने आणली नाहीत, तर देशभरात एक मजबूत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर देखील स्थापन केले. भारतात EVs ची जबरदस्त वृद्धी सक्षम करण्यासाठी आम्ही ‘ओपन कोलॅबरेशन 2.0’ लॉन्च केले आहे. आणि आघाडीच्या CPOs सोबत भागीदारी करून येत्या दोन वर्षांत चार्जिंग नेटवर्क 400,000 पॉईंट्सपर्यंत विस्तारित करण्याचे आमचे ध्येय आहे.
या उपक्रमामुळे गती, विश्वासार्हता वाढेल, यूझर्सचा चार्जिंगचा अनुभव सुधारेल आणि दुसरीकडे CPOs ची व्यवहार्यता देखील सुधारून त्यांची वाढ होण्यास मदत होईल. चार्जिंगचा अनुभव सुधारण्यासाठी, आम्ही भागीदारींच्या माध्यमातून मुख्य शहरांत आणि महामार्गांवर TATA.ev मेगा चार्जर्स दाखल करण्याबरोबरच दर्जेदार इन्फ्रास्ट्रक्चरची हमी देणारे TATA.ev सत्यापित चार्जर्स सुरू करत आहोत. शिवाय, ग्राहकांच्या चिंता आणि समस्या यांचे निराकरण करण्यासाठी तसेच EV चा अंगिकार वाढत असल्याने चार्जिंग ईकोसिस्टम सहजप्राप्य आणि विश्वसनीय बनवण्यासाठी एक एकीकृत हेल्पलाइन आणि निर्बाध पेमेंट सोल्यूशन देखील दाखल करत आहोत.”
‘ओपन कोलॅबरेशन 2.0’ अंतर्गत एक मुख्य उपक्रम म्हणून, TATA.ev मेगा चार्जर नेटवर्क उभे करण्यासाठी TATA.ev आघाडीच्या CPOs सोबत भागीदारी करेल, जे सुपरफास्ट चार्जिंग आणि बेजोड विश्वसनीयता प्रदान करेल. पहिल्या टप्प्यात, दोन वर्षांत 500 TATA.ev मेगा चार्जर्सचे संचालन सुरू करण्यासाठी TATA.ev ने टाटा पॉवर, चार्जझोन, स्टॅटिक आणि झीऑन सोबत सामंजस्य करार (MoU) केले आहेत. हे चार्जर्स मुख्य शहरांत आणि महत्त्वाच्या महामार्गांवर स्थापित करण्यात येतील.
TATA.ev मेगा चार्जर्स सर्व EVs साठी खुली असतील पण TATA.ev च्या ग्राहकांना तेथे प्रवेश आणि दराच्या बाबतीत प्राधान्य मिळेल.
भागीदार CPOs द्वारा संचालित होणारी मेगा चार्जर्स सोयिस्कररित्या ट्रॅक करता येतील आणि IRA.ev अॅपच्या माध्यमातून सेवांचे पेमेंट एकाच वेळी करता येऊ शकेल ज्यामुळे विविध चार्जिंग अॅप डाउनलोड करण्याची गरज असणार नाही.
घरगुती आणि सामुदायिक चार्जिंगची सुरुवात करण्यापासून ते मोबाइल चार्जिंग व्हॅन दाखल करून खुल्या सहभागाला प्रोत्साहन देण्यापर्यंत TATA.evभारताच्या EV ईकोसिस्टमच्या उभारणीत पहिल्यापासून आघाडीवर आणि इनोव्हेटर राहिली आहे. देशात इलेक्ट्रिफिकेशनला चालना देण्याच्या अढळ वचनबद्धतेसह TATA.ev भारताच्या शाश्वत आणि इलेक्ट्रिफाईड भविष्याच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रवासात EVs चा प्रचार करण्याबाबत आणि सर्व भागीदारांना सोबत घेऊन पुढे जाण्याबाबत निष्ठावान आहे.