टाटा कॅपिटलतफे मध्यमवर्गीयांच्‍या शिक्षणाचे स्वप्न होणार साकार

Admin

Tata Capital टाटा कॅपिटल

शैक्षणिक कर्ज योजनेत ‘टाटा कॅपिटल’, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, मुंबई, पुणे आणि अहमदाबादमध्ये मागणी

सर्वसामान्यांसह गरीब विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न आता नक्कीच साकार होणार आहे. कारण टाटा समूहाची प्रमुख आर्थिक सेवा कंपनी असलेल्या  ‘टाटा कॅपिटल लिमिटेड’ने  (टीसीएल) शैक्षणिक कर्ज योजना आणली आहे. शिक्षणाची जिद्द असलेले होतकरू विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊन नक्कीच यशाची शिखरे पादाक्रांत करू शकतील. शिक्षणाचे हब म्हटल्या जाणाऱ्या हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, मुंबई, पुणे आणि अहमदाबादमध्ये  या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय.

शैक्षणिक कर्ज योजनांबाबत सांगताना टाटा कॅपिटल लिमिटेड ​​रिटेल फायनान्सचे सीओओ विवेक चोपडा म्हणाले, विद्यार्थी हिताच्या दृष्टीने डिजिटल प्रक्रियेद्वारे टाटा कॅपिटलमध्ये आम्ही  जलद कर्ज देतो. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा जाणून त्या पूर्ण करण्यासाठी तत्पर असल्याचे चोपडा यांनी सांगितले.

व्यवस्थापन प्रवेश परीक्षा (CAT, XAT, SNAP), परदेशातील उच्च शिक्षणासाठी प्रमाणित चाचण्या (GRE, SAT, GMAT) आणि इंग्रजी भाषा प्रावीण्य चाचण्या (IELTS, TOEFL) यासारख्या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांच्या निकालांच्या घोषणेसोबतच देशभरात विविध परीक्षा जाहीर झाल्या आहेत. वाढत्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमाचे नियोजन करत आहेत. प्रवेशाची अंतिम मुदत जवळ येत असताना, देशभरातील विद्यार्थी महाविद्यालयीन प्रवेशाच्या महत्त्वाच्या टप्प्यातून जात आहेत. उच्च शिक्षण घेण्यासाठीच्या आर्थिक गरजा समजून घेऊन ‘टाटा कॅपिटल’द्वारे तातडीने कर्ज मंजूर करून दिले जाते. ज्यामुळे विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतात.

विशेष म्हणजे टाटा कॅपिटलद्वारे ८५ लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मंजूर केले जाते. हा तारणमुक्त पर्याय असून, शिक्षणाचा एकूण खर्च भागवण्यासाठी २ कोटी रुपयांपर्यंतचे सुरक्षित कर्ज दिले जाते. यातून विद्यार्थी त्यांच्या देशांतर्गत आणि परदेशी शिक्षणाच्या गरजा पूर्ण करू शकतात. यातून त्यांना शिक्षण शुल्क, राहण्याचा खर्च, अभ्यास साहित्य आणि विविध खर्च यासह विस्तृत खर्च सहज करता येतो. 

कंपनीच्या आकडेवारीनुसार, हैदराबाद, विशाखापट्टणम, बंगळुरू, चेन्नई, मुंबई, पुणे, दिल्ली, वडोदरा, अहमदाबाद, सुरत, म्हैसूर आणि कोइम्बतूर यांसारख्या शहरांमधील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्जाचा पर्याय निवडला. भविष्यातील बाजारपेठेत व्यवस्थापन, अभियांत्रिकी, विमानचालन, वैद्यकीय, तंत्रज्ञान, कौशल्य विकास कार्यक्रम यांसारख्या क्षेत्रातील उदयोन्मुख अभ्यासक्रम निवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण गरजा पूर्ण करण्यावर भर असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया ही आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी अव्वल स्थाने म्हणून उदयास आली आहेत. अर्ज करणाऱ्यांमध्ये एकूण विद्यार्थ्यांपैकी या ठिकाणी शिक्षणाला जाण्यासाठी इच्छूक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दोन तृतीयांश आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झालेल्या ‘टाटा कॅपिटल एज्युकेशन लोन’साठी आतापर्यंत सहा हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. वाढता प्रसार-प्रचार आणि गुणवत्तापूर्ण कामामुळे कंपनीप्रती विश्वासार्हता अधिकाधिक वाढत आहे. देशभरात ९०० हून अधिक शाखांच्या विस्तृत नेटवर्कसह टाटा कॅपिटल  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सदैव सज्ज असल्याचे कंपनीच्या वतीने सांगितले जाते.

Leave a Comment