प्लास्टिकमुक्त पर्यावरणासाठी ड्युराशाईन® कलर-कोटेड स्टील शीट्सच्या प्लास्टिक गार्ड फिल्म्स परत जमा करणाऱ्या फॅब्रिकेटर्सना मिळणार अधिक उत्पन्न
कलर कोटेड स्टील शीट्स आणि बांधकामामध्ये वापरली जाणारी उत्पादने बनवणारी, भारतातील एक आघाडीची कंपनी टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने राजस्थानामध्ये प्लास्टिकमुक्त पर्यावरणासाठी उपक्रम सुरु केला आहे. टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचा प्रमुख रिटेल ब्रँड ड्युराशाईन® सोबत येणारी प्लास्टिक गार्ड फिल्म जमा करून या प्लास्टिक कचऱ्याचे पुनर्वापर करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
ड्युराशाईन® हे एक प्रीमियम कलर कोटेड स्टील स्टील रुफिंग असून घरे, कमर्शियल बिल्डींग्ज आणि कारखान्यांसाठी वापरले जाणारे, अतिशय टिकाऊ व दिसायला सुंदर असे उत्पादन आहे.
ड्यूराशाईन® शीट्सच्या सुरक्षेसाठी त्यांच्यावर एक प्लास्टिक गार्ड फिल्म लावली जाते, त्यामुळे शीट्सची वाहतूक व साठवून ठेवलेले असताना शीट्सचे गंजण्यापासून व ओरखडयांपासून संरक्षण होते. शीट्स इंस्टॉल करेपर्यंत कोटिंग आणि पेंट फिनिश कायम राहते. टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने शीट्स इन्स्टॉल केल्यावर ही गार्ड फिल्म लगेचच काढण्याची सूचना केली आहे, जेणेकरून त्याचा पुनर्वापर योग्य प्रकारे होऊ शकेल.
टाटा ब्ल्यूस्कोप स्टील आपल्या प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
या उपक्रमामध्ये फॅब्रिकेटर्समार्फत प्लास्टिक गार्ड फिल्म्स एकत्र गोळा करून प्लास्टिकचा पुनर्वापर केला जातो.
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचा हा दृष्टिकोन उद्योगक्षेत्रामध्ये पर्यावरणानुकूल पद्धतींना प्रोत्साहन देतो, इतकेच नव्हे तर, फॅब्रिकेटर्ससाठी अधिक उत्पन्नाचा स्रोत देखील उपलब्ध करवून देतो. जिथे या प्रोजेक्टची सुरुवात झाली होती, त्या राजस्थानातील पाली, उदयपूर आणि डेगानामध्ये ठरवून दिलेल्या डिलर्सकडे गार्ड फिल्म्स जमा करून फॅब्रिकेटर्स अधिक उत्पन्न देखील कमवू शकतात.
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचे व्हाईस प्रेसिडेंट (बिल्डिंग प्रॉडक्ट्स – इन्फ्रा, सेफ्टी, सस्टेनेबिलिटी आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन) श्री अजय रतन यांनी सांगितले, “टाटा ब्ल्यूस्कोप स्टील आपल्या सर्व कामांमध्ये पर्यावरणपूरकतेला प्रोत्साहन देण्यासाठी बांधील आहे.
स्थानिक फॅब्रिकेटर्स आणि सरकारने मान्यता दिलेल्या पुनर्वापर करणाऱ्या कंपनींसोबत सहयोग करून आम्ही प्लास्टिक गार्ड फिल्म्सचा योग्य पुनर्वापर करतांना समाज कल्याणाला देखील पाठिंबा देत आहोत. या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. समाज आणि पर्यावरणाचे संवर्धन व्हावे याची पुरेपूर काळजी घेणाऱ्या व्यावसायिक पद्धतींबाबतची आमची बांधिलकी या उपक्रमात दर्शवली गेली आहे.”
ही संपूर्ण प्रक्रिया सहजपणे पार पडावी यासाठी कंपनीने सरकारने मान्यता दिलेल्या पुनर्वापर करणाऱ्या कंपनींसोबत सहयोग केला आहे. कंपनीने ड्यूराशाईन® शीट्स सुरक्षित हाताळल्या जाव्यात यासाठी फॅब्रिकेटर्सची कौशल्ये वाढवण्यासाठी आपल्या ‘सक्षम’ उपक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम देखील सुरु केले आहेत.
गार्ड फिल्म्स गोळा करून, त्या परत करण्यासाठी फॅब्रिकेटर्सना प्रोत्साहनपर लाभ देखील दिले जात आहेत. हा उपक्रम पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने तसेच यामध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक आहे.