रसायनमुक्त उत्पादनांतून अब्जावधी डॉलरच्या व्यवसायाचे लक्ष्य; राजगंगा समूहाचे राजेराम घवाटे यांचे मुख्य धोरणतज्ज्ञ राजेश शुक्ला यांच्यासह यश…

Admin

रसायनमुक्त उत्पादनांतून अब्जावधी डॉलरच्या व्यवसायाचे लक्ष्य राजगंगा समूहाचे राजेराम घवाटे यांचे मुख्य धोरणतज्ज्ञ राजेश शुक्ला यांच्यासह यश

निरोगी आणि रसायनमुक्त उत्पादनाची खात्री देऊन नाशिकचा राजगंगा समूह जगभरातील सेंद्रिय अन्नाची वाढती मागणी पूर्ण आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर न केलेले खाद्यपदार्थ निर्यात करून राजगंगा समूहाने गेल्या चार वर्षांत अंदाजे १३८ कोटी रूपयांचे साध्य केले आहे.

आता कंपनी पुढील पाच वर्षांत १० अब्ज अमेरिकी डॉलरचे मूल्यांकन गाठण्याचे धाडसी कॉर्पोरेट लक्ष्य बाळगून आहे. या दिशेने पावले टाकत राजगंगा ग्रुपला जागतिक पातळीवर नेण्याच्या उद्देशाने राज्यात नुकतीच पुणे, शिरूर आणि नाशिक येथे कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात आली होती.

रसायन

व्हेंचर स्टुडिओ कॅपिटल टीम आणि जागो नारी यांनी या कार्यक्रमाला पाठिंबा दिला होता. नवीन रणनीतींवर चर्चा, नवीन उत्पादनांची सुरूवात आणि त्यानंतर संपूर्ण तज्ज्ञांच्या टीमकडून कॉलेज आणि शाळेच्या प्रकल्पांची पाहणी तसेच विठेवाडी (लोहोणेर), ता. देवळा, जि. नाशिक येथील वसंतरावदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला भेट असे या कार्यक्रमांचे स्वरूप होते. कंपनीला जागतिक स्वरूप देणे आणि तिला भारतातील सर्वोत्तम कंपनी बनवणे हा या संपूर्ण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

राजगंगा फर्टिलायझर्स अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे, सीईओ प्रसाद घावटे, संचालक हृषिकेश बत्ते, संचालिका अमृता घावटे, कार्यकारी संचालक तेजस चौधरी व मार्केटिंग संचालक नानासाहेब शेळके तसेच जागो नारी फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त सीएस मधु त्यागी,

पंचशील दूध केंद्राचे व्यवस्थापकीय भागीदार दीपक त्यागी आणि जागो नारी, पढयेगा भारत, गुड की चाय, ई-टेक, प्राणवायू ,हेल्थकेअर, प्रोटॉन कॅन्सर, आयसीयू आणि ओटी) यांचे मुख्य रणनीतीकार राजेश शुक्ला यांच्यासह नॅशनल इंटेलेक्चुअल अॅडव्हायजरीची स्ट्रॅटेजी टीम यांनी या कार्यक्रमाचे नेतृत्व केले.

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास देशमुख, नॅशनल इंटेलेक्चुअल अॅडव्हायजरीचे मुख्य रणनीतीकार राजेश शुक्ला, माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष अमर साबळे, माणिकचंद ग्रुपचे सीएमडी प्रकाशशेट धारिवाल, भोसरीचे आमदार महेश लांडगे, सहकार आयुक्त डॉ. दीपक तावरे, व्हेंचर स्टुडिओ कॅपिटलचे व्यवस्थापकीय भागीदार प्रिन्स त्यागी, एमपीएससीचे निवृत्त अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड आणि पुण्याचे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायवडी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी गुणवत्तेवर आणि ग्राहकांच्या समाधानावर राजगंगा समूहाचे लक्ष केंद्रित असल्याबद्दल कंपनीचे कौतुक केले. तसेच डॉ. राजेराम घावटे यांच्यासोबतच्या दीर्घकालीन मैत्रीच्या त्यांनी आठवणी जाग्या केल्या. या कार्यक्रमाचा तरुणांवर सकारात्मक प्रभाव होत असल्याचे सांगून त्यांनी समूहाच्या उपक्रमांचे भविष्य आशादायक असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना मुख्य रणनीतीकार राजेश शुक्ला म्हणाले, “नियोजित तारीख आणि वेळेपूर्वी काम पूर्ण करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. गुणवत्ता ही यशाची गुरुकिल्ली असते आणि ग्राहक हा देवा सारखा असतो. ग्राहकांचे समाधान सर्वोपरी असते. व्यवसाय आणि कौटुंबिक गरजांसाठी जेवढे आवश्यक असते त्यापेक्षा जास्त जे काही आपण कमावतो ते आपण समाजाला परत केले पाहिजे.

अशा दृष्टिकोनामुळे संपूर्ण परिसंस्थेचा एकत्रित विकास होण्याची हमी मिळते. त्यामुळे शाश्वत वाढ होते आणि प्रत्येकाला लाभ होतो.” संसाधनांचा कमाल वापर, दीर्घकालीन नियोजन आणि ब्रँडिंग यांच्यासाठी त्यांचे मार्गदर्शन आणि व्हेंचर स्टुडिओ कॅपिटल आणि फिनरिस्क कन्सल्टन्सी यांचा सहयोग खूप महत्त्वपूर्ण ठरले आहेत.

Leave a Comment