स्विगीकडून अन्नाची नासाडी आणि भूक या समस्यांसाठी ‘स्विगी सर्व्हज’चे अनावरण; पहिले भागीदार म्हणून रॉबीन हूड आर्मीची घोषणा

Admin

स्विगी Swiggy

२०३० पर्यंत गरीबांना ५० दशलक्ष आहार वितरित करण्यासाठी वचनबद्ध

स्विगी , या भारतातील आघाडीच्या ऑन डिमांड सुलभता प्लॅटफॉर्मने आज “स्विगी सर्व्हज” या आपल्या विशेष उपक्रमाची घोषणा केली असून त्याचे उद्दिष्ट आपल्या मूल्यसाखळीतील अन्नाची नासाडी कमी करून भुकेल्यांना ते देण्याचे आहे. या मोहिमेचा भाग म्हणून स्विगीने रॉबीन हूड आर्मी (आरएचए) या स्वयंसेवी संघटनेसोबत भागीदारीची घोषणा केली आहे.

स्विगी आणि आरएचए एकत्रितरित्या स्विगीच्या रेस्टॉरंट भागीदारांकडून उर्वरित अन्न वंचित समाजाला वाटून एक चांगला प्रभाव साध्य करणार आहेत. या सहयोगाच्या माध्यमातून या दोन्ही संस्थांनी अन्न पुनर्वितरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून २०३० पर्यंत ५० दशलक्ष आहार देण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय समोर ठेवले आहे.

स्विगी सर्व्हज- आरएचए भागीदारीच्या पहिल्या टप्प्यातून प्रोत्साहक निकाल आले आहेत. जवळपास ३३ शहरांमधून २००० पेक्षा जास्त जेवणए पुनर्वितरित करण्यात आली असून १२६ पेक्षा अधिक रेस्टॉरंट भागीदार याचा हिस्सा झाले आहेत. हा उपक्रम स्विगीच्या अन्नाची नासाडी कमी करून भुकेशी सामना करण्यासाठी अतिरिक्त अनाचा स्त्रोत म्हणून वापरण्याच्या ध्येयाशी निगडीत आहे.

बिक्कगने बिर्यानी, बिर्यानी बाय किलो, दाना चोगा, वर्धाज, चारकोल ईट्स- बिर्यानी अँड बियॉन्ड, डब्बा गरम, हाऊस ऑफ बिर्यानी, बी. टेक मोमोजवाला, समोसा सिंग, बाबाई टिफिन्स, डोसा अण्णा, अर्बन तंदूर अशा ब्रँड्सनी स्विगी सर्व्हज- आरएचए उपक्रमाचा भाग होण्यासाठी साइन केले आहे.

रॉबीन हूड आर्मी (आरएचए) ही एक स्वयंसेवी, शून्य निधी संस्था असून यात हजारो तरूण व्यावसायिक, निवृत्त नागरिक, गृहिणी, महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक आहेत. या स्वयंसेवकांना रॉबीन असे म्हटले जाते आणि ते रेस्टॉरंट्स/ लग्न/ कार्यक्रमातून अतिरिक्त अन्न गोळा करून गरीबांमध्ये त्याचे वाटप करतात. मागील दहा वर्षांत आरएचएने जगभरातील ४०६ शहरांमध्ये १५३ दशलक्षपेक्षा जास्त जेवणे वितरित केली आहेत. सध्या १३ शहरांमध्ये २६०,००० पेक्षा अधिक नोंदणीकृत रॉबीन्स शून्य निधी या तत्वावर शून्य भूक ही संकल्पना साध्य करण्यासाठी कार्यरत आहेत.

या अनावरणाबाबत बोलताना स्विगी फूड मार्केटप्लेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर म्हणाले की, “स्विगीमध्ये आम्ही कायम लॉजिस्टिक्स आणि ग्राहकानुभव यांचे तज्ञ म्हणून काम केले आहे. आता ‘स्विगी सर्व्हज’ च्या माध्यमातून आम्ही आमच्या शक्ती आणि क्षमतेचा वापर करून व्यापक सामाजिक गरजेवर तसेच अन्नाची नासाडी आणि भूक अशा समस्यांवर उपाय काढण्यासाठी काम करत आहोत.

आम्हाला आमच्या रेस्टॉरंट भागीदारांकडील अतिरिक्त अन्नाचे गरजू लोकांना पुनर्वितरण करण्यासाठी आरएचएसोबत भागीदारी करताना खूप आनंद होत आहे. सध्या आम्ही ३३ शहरांमध्ये कार्यरत आहोत आणि जास्तीत जास्त शहरांमध्ये हा उपक्रम नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून फक्त कचरा कमी होणार नाही तर अर्थपूर्ण प्रभाव पडेल आणि एकही जेवण वाया जाणार नाही.”

रॉबीन हूड आर्मीचे सहसंस्थापक नील घोस यांनी स्विगीसोबतच्या भागीदारीबाबत बोलताना सांगितले की,“भूक कमी करण्याच्या एकत्रित मोहिमेसाठी रॉबीन हूड आर्मीला स्विगीसोबत काम काम करताना खूप आनंद होत आहे. स्विगीसारखी उद्योगातील आघाडीची कंपनी सामाजिक चळवळीसाठी एकत्र येते तेव्हा त्याचा प्रभाव वाढतो आणि भुकेविरूद्ध लढण्यासाठी इतरांना सोबत येण्याची प्रेरणा मिळते. आम्ही आता एकत्र येऊन एकही ताट रिकामे राहणार नाही यासाठी एक मजबूत, एकत्रित आघाडी तयार करत आहोत.”

रेस्टॉरंट भागीदार स्विगी ओनर अॅपवरील एक अर्ज भरून अतिरिक्त किंवा ताजे अन्न दान करण्याची आपली इच्छा वर्तवू शकतात व स्विगी सर्व्हजचा भाग होऊ शकतात. नावनोंदणी झाल्यानंतर आरएचए या सहजसंवाद आणि समन्वयासाठी या रेस्टॉरंट भागीदारांना संबंधित व्हॉट्सएप ग्रुपमध्ये सहबागी करेल. या भागीदारांकडून अतिरिक्त अन्न नेण्याची आणि गरजू लोकांमध्ये त्याचे वितरण करण्याची जबाबदारी आरएचए स्वयंसेवकांची असेल.

संयुक्त राष्ट्रांच्या मते भारतात सुमारे १९५ दशलक्ष कुपोषित लोक असून ही जगातील कुपोषित लोकसंख्येच्या एक चतुर्थांश संख्या आहे. २०२४ मध्ये भारताचा जागतिक भूक निर्देशांक (जीएचआय) २७.३ होता. त्यातून भूक ही गंभीर समस्या असल्याचे स्पष्ट झाले. २०२४ च्या जीएचआयमध्ये भारताचा १२७ देशांमध्ये १०५ वा क्रमांक आला. संयुक्त राष्ट्रांच्या मते भारतात दर वर्षी दरडोई ५५ किलो अन्न वाया जाते.

Leave a Comment