सह्याद्रि हॉस्पिटल्स मध्ये दुर्मिळ स्पाइनल ट्युबरक्युलॉसिस झालेल्या १३ वर्षीय मुलीवर यशस्वी उपचार

Admin

सह्याद्रि हॉस्पिटल्स

     गंभीर पॅराप्लेजियावरील शस्त्रक्रियेनंतर अवघ्या १५ दिवसांतच रुग्णाच्या हालचाली पूर्ववत

मणक्याच्या क्षयरोगाचा एक दुर्मिळ व गंभीर प्रकार असलेला ‘मणक्याचा टी.बी.’हा आजार एका १३ वर्षांच्या मुलीला झाला होता. या मुलीवर डेक्कन जिमखाना येथील ‘सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये नुकतेच यशस्वीपणे उपचार करण्यात आले. ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’चे स्पाइन सर्जन डॉ. राजेश पारसनीस यांनी हे उपचार कुशलतेने हाताळले. त्यांच्या त्वरित निदान आणि अचूक शस्त्रक्रियेमुळे या मुलीच्या प्रकृतीत केवळ तीन दिवसांत बऱ्यापैकी सुधारणा झाली.

रुग्ण मुलीला सुरुवातीला दोन महिने पाठीच्या वरच्या भागात तीव्र वेदना होत होत्या. पुण्यातील सरकारी रुग्णालयात तिने सुरुवातीला उपचार घेतले. तिला ‘मणक्याचा टी.बी’ हा आजार झाल्याचे निदान तिथे आले. तिला टी.बी. प्रतिबंधात्मक औषधे (AKT) सुरू करून संपूर्ण विश्रांती देण्यात आली. तथापि तिची प्रकृती खालावली. पुढील दोन महिन्यांत तिच्या पाठदुखीची तीव्रता आणखी वाढली आणि अखेरीस तिला ‘पॅराप्लेजिया’ झाला. या अजारामध्ये रुग्णाला अर्धांगवायू होतो, ज्यामुळे कमरेखालील शारीरिक क्षमता कमी होऊन पायांच्या हालचालींवर मर्यादा येतात.

या रुग्णाला डेक्कन जिमखाना येथील ‘सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये आणल्यावर डॉ. पारसनीस आणि त्यांच्या टीमने तपासले. क्लिनिकल तपासण्या, ‘एमआरआय’चे निष्कर्ष आणि शस्त्रक्रियेदरम्यान केलेली ‘ओपन बायोप्सी’ यांच्या आधारे मुलीच्या आजाराचे निदान स्पष्ट झाले. निदान अधिक अचूक व्हावे म्हणून डॉक्टरांनी ‘जिनएक्पर्ट एमटीबी’ (GeneXpert MTB) ही चाचणी देखील केली. या चाचणी दरम्यान शस्त्रक्रियेच्या जागेवरून अत्यंत संवेदनशील आणि विशिष्ट पद्धतीने ‘ट्यूबरकल बॅसिली’ (टी.बी. होण्यास कारणीभूत असलेला) या माणसामधील क्षय रोगास कारणीभूत ठरणारा जीवाणूचा शोध घेतला जातो. त्यावर ‘सह्याद्रि’चे वैद्यकीय पथक व रूग्ण यांच्यात व्यवस्थित समन्वय साधून या आव्हानांवर मात केली.

मणक्याचा टी.बी.ला स्पाइनल ट्यूबरक्युलोसिस असे शास्त्रीय नाव आहे. फुफ्फुसाच्या क्षयरोगाचा हा तुलनेने कमी प्रमाणात आढळणारा एक प्रकार आहे. फुफ्फुसाचा क्षयरोग झाल्यानंतर दुय्यम संसर्ग म्हणून काही व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. शहरी भागात मणक्याच्या टीबीचे प्रमाण जास्त आहे. शहरांत १ लाख लोकसंख्येमध्ये १.४३ प्रकरणे इतके प्रमाण आहे, तर ग्रामीण भागात १ लाख लोकसंख्येमध्ये ०.७६ प्रकरणे इतके प्रमाण आहे. त्वरीत उपचार न केल्यास या आजाराचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या रुग्णाच्या प्रकरणातही मज्जारज्जूंवरील दाबामुळे तिला पॅराप्लेजिया झाल्याचे निष्पन्न झाले.

रूग्ण क्लिनिकमध्ये दाखल झाल्यावर परिस्थितीची निकड समजून घेऊन, डॉ. पारसनीस यांनी ताबडतोब (‘डी१ – डी६ डोर्सल डीकंप्रेशन’ (D1-D6 Dorsal Decompression) आणि ‘पेडिकल स्क्रू फिक्सेशन’) रुग्णावर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून नसांवरील दबाव दूर करून, मणक्याला स्क्रूने नोड देऊन जंतुसंसर्ग झालेली जागा निर्जंतुक करून रुग्णाचा त्रास दूर होईल. अचूक स्क्रू बसवण्याकरिता ‘ओ-आर्म नेव्हिगेशन’ आणि ‘इंट्रा-ऑपरेटिव्ह न्यूरो-मॉनिटरिंग’ अशा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्या सर्जिकल टीमने केला. या तंत्रज्ञानामध्ये पाठीच्या कण्याच्या कार्याचे मूल्यांकन अचूक वेळेत केले जाते ज्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान अचूकता व सुरक्षिततेची खात्री राहते.

रुग्णाची परिस्थिती पाहता तातडीने शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक होते,” असे डॉ. पारसनीस यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले. ते पुढे म्हणाले, आणखी कमरेखाली नसांवर दुष्परिणाम होऊ नये, म्हणून तेथील दबाव कमी करणे आणि मणक्याला स्थिर करणे हे या शस्त्रक्रियेचे प्राथमिक उद्दिष्ट होते. रूग्णाला सर्वोत्तम परिणाम मिळावेत, यासाठी प्रगत शस्त्रक्रिया तंत्रांचा वापर करण्यात आला.”

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात आले. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर तिला पाठीच्या कण्याला आधार मिळावा याकरता देण्यात येणारा पट्टा (‘टेलर्स ब्रेस’ – थोराको-लंबर ऑर्थोसिस) देण्यात आला आणि तिच्यावर फिजिओथेरपीचे उपचार सुरू करण्यात आले. फिजिओथेरपीच्या टीमने रूग्णाच्या कमरेखालच्या शरीराला बळकटी आणण्यावर तसेच तिचे श्वसन कार्य सुधारण्यावर प्रथमत: लक्ष केंद्रित केले. त्यासाठी दीर्घश्वसन व्यायाम आणि ‘इन्सेन्टिव्ह स्पायरोमेट्री’ या उपकरणांची मदत घेतली. या सर्वंकष उपचारमुळे शस्त्रक्रियेनंतरच्या पाचव्या दिवशी रुग्ण उभी राहून काही पावले उचलण्यास सक्षम झाली होती. इतकेच नाही तर शस्त्रक्रियेनंतरच्या पंधराव्या दिवशी तिचे टाके काढण्यात आले. त्यावेळी ती कोणत्याही आधाराशिवाय स्वतंत्रपणे चालू शकत होती.

एका महिन्याच्या फॉलो-अप भेटीत रुग्ण पूर्ण बरी झाली असल्याचे दिसून आले. पाठदुखी, पायाचे दुखणे किंवा अशक्तपणा अशी कोणतीही तक्रार तिने नोंदवली नाही. कमरेखालील नसांचे कार्य देखील पूर्णपणे पूर्ववत झाले होते.

मज्जारज्जूंवर दबाब आल्यामुळे पॅराप्लेजिया (अर्धांगवायू) उद्भवतो, अशा वेळी त्वरीत शस्त्रक्रिया करण्याला महत्त्व असते, असे डॉ. पारसनीस यांनी म्हटले आहे. “न्यूरोलॉजिकल रचनेमध्ये कायमस्वरुपी बिघाड होण्याआधी शस्त्रक्रिया करण्याचा आम्ही वेळेवर घेतलेला निर्णय हा या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरला. अँटीबायोटिक थेरपी सुरू ठेवून शस्त्रक्रिया करायची आणि परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत राहायचे, असे धोरण आम्ही ठरवले, आणि ते यशस्वी झाले,” असे ते म्हणाले.

मणक्याच्या गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करण्यासाठी सहयोगी दृष्टीकोन आणि प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान या गोष्टी किती फलदायी ठरतात, ते ‘सह्याद्रि हॉस्पिटल’मधील या प्रकरणातून दिसून येते.

Leave a Comment