भारतातील नंबर १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड सोनालिका ट्रॅक्टर्सने नुकत्याच संपलेल्या सर्वात मोठ्या सणासुदीच्या हंगामात शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त आनंदाची निश्चित केली आहे.
कंपनीने ऑक्टोबर महिन्यात २०,०५६ ट्रॅक्टरच्या मासिक एकंदर विक्रीच्या विक्रमाचे नवीन शिखर गाठले आहे. सोनालिका ट्रॅक्टर्सच्या इतिहासातील ही सर्वात मोठी मासिक कामगिरी कस्टमाईज्ड ट्रॅक्टरचा मालक होणे आणि शाश्वत शेतीच्या समृद्धीचा स्वीकार करणे, हे शेतकऱ्यांसाठी सोपे करण्याच्या त्यांच्या ध्येयाशी सुसंगत आहे.
सोनालिका ट्रॅक्टर्स विश्वासार्ह ब्रँड म्हणून कायम असून तो शेतकऱ्यांमध्ये परिवर्तन घडवून आणत आहे तसेच सर्वात शक्तिशाली हेवी-ड्युटी ट्रॅक्टर्ससह कृषी क्षेत्राला उन्नत करत आहे. कंपनीच्या वार्षिक ‘हेवी ड्युटी धमाका’ ऑफरमुळे शेतकऱ्यांना सर्वात मोठ्या सणासुदीच्या काळात वाजवी किमतीत प्रगत तंत्रज्ञानावर चालणारे ट्रॅक्टर मिळण्याची हमी मिळाली आहे.
तसेच, शेतकऱ्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी आधाराची महत्त्वपूर्ण यंत्रणा लाभली आहे. देशातील विस्तीर्ण डीलरशिप नेटवर्कमुळे कंपनीने शेतकऱ्यांच्या प्रादेशिक गरजेनुसार कस्टमाईज्ड योग्य उत्पादन मिळण्याची निश्चिती झाली आहे. तसेच, असामान्य कामगिरी देण्यासाठी प्रत्येक ट्रॅक्टरसह गुणवत्तेप्रति आपली वचनबद्धता पूर्ण केली.
या अभूतपूर्व यशाबद्दल आपले विचार मांडताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, ”असामान्य अशा २०,०५६ ट्रॅक्टर विक्रीसह मागील सर्व मासिक विक्रमांना मागे टाकल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. आमच्या शेतकरी समुदायासोबत सामाईक केलेला हा एक अभिमानास्पद क्षण आहे.
प्रत्येक शेतकऱ्याला विश्वासार्ह, सानुकूलित आणि त्यांच्या गरजेनुसार अद्वितीय असा शाश्वत समृद्धीकडे त्यांच्या प्रवासाला आधार देणारा योग्य ट्रॅक्टर उपलब्ध व्हावा, ही आमची सर्वात मोठी प्रेरणा आहे . वर्षातील ही मैलाचा दगड ठरणारी कामगिरी आम्ही साजरी करत असताना, प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी तयार केलेल्या इंटेलिजंट, हेवी-ड्युटी ट्रॅक्टरच्या पुढील पिढीला प्रगत करण्याच्या आमच्या कटिबद्धतेची पुनरावृत्ती होत आहे.”