स्‍कोडा ऑटो इंडियाकडून ऑल-न्‍यू स्‍लाव्हिया मॉण्‍टे कार्लो लाँच

Admin

स्‍कोडा

पहिल्‍या ५,००० बुकिंग्‍ज करणाऱ्या ग्राहकांसाठी ३०,००० रूपयांच्‍या फायद्यांची घोषणा

स्‍कोडा ऑटो इंडियाने भारतात ऑल-न्‍यू स्‍लाव्हिया मॉण्‍टे कार्लो लाँच केली आहे. स्‍पोर्ट थीमला अधिक पुढे घेऊन जात कंपनीने कुशक व स्‍लाव्हिया लाइन अपमध्‍ये ऑल-न्‍यू स्‍पोर्टलाइन श्रेणी देखील सादर केली आणि या कार्ससाठी उल्‍लेखनीय ऑफरची घोषणा केली, ज्‍यामुळे भारतातील ग्राहकांसाठी मूल्‍य व पर्याय दर्जा वाढला आहे.

या नवीन सादरीकरणांबाबत मत व्‍यक्‍त करत स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक श्री. पीटर जनेबा म्‍हणाले, ”मॉण्‍टे कार्लो बॅजचे ग्राहकांसोबत प्रबळ नाते आहे, ज्‍यामधून स्‍पोर्ट व यशाचा उत्‍साह दिसून येतो. मला सांगताना आनंद होत आहे की, आम्‍ही आज स्‍लाव्हिया मॉण्‍टे कार्लो लाँच केली आहे. हे लाँच युरोपबाहेर आमच्‍यासाठी मोठी बाजारपेठ असलेल्‍या भारतात स्‍कोडा ब्रँड विकसित करण्‍याच्‍या आमच्‍या धोरणाचा भाग आहे.

ही विशेष कार अद्वितीय, लक्षवेधक व स्‍पोर्टी आकर्षकतेचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल, ज्‍यामधून स्‍टाइलचा अद्वितीय अनुभव मिळेल. ही कार रॅली मॉण्‍टे कार्लोमध्‍ये आमची ११२ वर्षे, १२९ वर्षांचा संपन्‍न वारसा आणि भारतातील २४ वर्षांच्‍या कार्यसंचालनाप्रती मानवंदना आहे.

आम्‍ही दोन नवीन ट्रिम्‍स ‘स्‍लाव्हिया स्‍पोर्टलाइन’ आणि ‘कुशक स्‍पोर्टलाइन’ देखील सादर केल्या आहेत, ज्‍यामधून श्रेणी विकसित व समकालीन ठेवण्‍यासोबत ग्राहकांना उत्तम पर्याय व मूल्‍य देण्‍याप्रती आमचा मनसुबा दिसून येतो. स्‍पोर्टलाइन आकर्षक दरामध्‍ये मॉण्‍टे कार्लोच्‍या स्‍पोर्टी आकर्षकतेचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांसाठी परिपूर्ण आहे. नवीन मॉण्‍टे कार्लो आणि स्‍पोर्टलाइन ऑफरिंग्‍जसह आम्‍ही भारतात शाश्‍वतपणे स्‍कोडा फॅमिली वाढवण्‍यास उत्‍सुक आहोत.”

अॅनिव्‍हर्सरी ऑफर

हे ऑल-न्‍यू श्रेणीचे लाँच रॅली मॉण्‍टे कार्लो येथे कंपनीच्‍या पदार्पणाच्‍या ११२व्‍या वर्धापन दिनाला साजरे करत असताना स्‍कोडा ऑटो इंडिया कुशक व स्‍लाव्हियाच्‍या स्‍पोर्ट-प्रेरित मॉण्‍टे कार्लो आणि स्‍पोर्टलाइन श्रेणीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अद्वितीय फायदे देणार आहे. या चार कार्सपैकी कोणत्‍याही कारची बुकिंग करणाऱ्या पहिल्‍या ५,००० ग्राहकांना ३०,००० रूपयांचे फायदे मिळतील. ही ऑफर त्‍वरित सुरू होईल आणि ६ सप्‍टेंबर २०२४ पर्यंत वैध असेल.  

मेटलमध्‍ये मॉण्‍टे कार्लो

या कारची खासियत म्‍हणजे प्रमाणित व चाचणी केलेले १.० आणि १.५ टीएसआय इंजिन्‍स. १.० टीएसआय इंजिन सिक्‍स-स्‍पीड मॅन्‍युअल व ऑटोमॅटिकसह उपलब्‍ध आहे. १.५ टीएसआय इंजिन सेव्‍हन-स्‍पीड डीएसजीच्‍या माध्‍यमातून फ्रण्‍ट व्‍हील्‍सना शक्‍ती देते. या कार्स टोर्नेडो रेड आणि कँडी व्‍हाइट रंगांमध्‍ये येतात. या दोन्‍ही पर्यायांमध्‍ये प्रमाणित म्‍हणून कॉन्‍ट्रॅस्टिंग डीप ब्‍लॅक रूफ आहे. विंडो गार्निशमध्‍ये ओआरव्‍हीएमप्रमाणे ऑल-ब्‍लॅक थीम आहे. रॅडिएटर ग्रिल सराऊंडच्‍या भोवती ब्‍लॅक थीम, फॉग लॅम्‍पच्‍या भोवती गार्निश आणि ब्‍लॅक आर१६ अलॉई व्‍हील्‍स कायम ठेवण्‍यात आले आहेत.

आकर्षकता कायम ठेवत फ्रण्‍ट फेण्‍डर्सवर मॉण्‍टे कार्लो बॅजिंग आणि डार्कन टेललाइट्स आहेत. स्‍पोर्टी, ब्‍लॅक स्‍पॉइलर्स कारच्‍या पुढील बाजूला अधिक आकर्षक करतात आणि मागील बाजूस एैसपैस बूट स्‍पेस आहे. तसेच, मागील बाजूमध्‍ये ब्‍लॅक स्‍पोर्टी रिअर डिफ्यूजर आणि ब्‍लॅक बम्‍पर गार्निश आहे. मॉण्‍टे कार्लोला अधिक आकर्षक करत डार्क क्रोममध्‍ये फिनिश केलेले सर्वोत्तम व क्‍लासी डोअर हँडल्‍स आहेत आणि स्‍लाव्हिया मॉण्‍टे कार्लोच्‍या एक्‍स्‍टीरिअर्समधील सर्व लेटरिंग ब्‍लॅकमध्‍ये आहेत.  

मॉण्‍टे कार्लोचे इंटीरिअर

आतील बाजूस, कारच्‍या ऑल-ब्‍लॅक स्‍पोर्टी केबिनमध्‍ये मॉण्‍टे कार्लो रेड थीम इंटीरिअर आहे. डेकॉर फ्रेम, एअर व्‍हेण्‍ट्स ब्‍लॅक रंगामध्‍ये आहेत. तसेच लोअर डॅशबोर्ड, सेंटर कन्‍सोल डेकॉर आणि हँडब्रेक पुश बटन देखील ब्‍लॅक रंगामध्‍ये आहेत. स्‍टीअरिंग व्‍हील आणि गिअर नॉबमधील क्रोम इन्‍सर्ट्स ब्‍लॅक रंगासह बदलण्‍यात आले आहेत. डार्क, स्‍पोर्टी थीम स्‍कोडा ऑटोच्‍या रॅली वारसानुसार आहे, जेथे इंटीरिअर आणि हँडल्‍सना गडद रंग देण्‍यात आला आहे. 

ब्‍लॅक इंटीरिअर्समधून स्‍पोर्टी गतीशीलता दिसून येण्‍यासाठी इंटीरिअर्समध्‍ये लाल रंगाचे स्‍लॅशेस् आहेत. डॅशबोर्डच्‍या मध्‍यभागी व्‍हेण्‍ट्सपासून आलेले सिंगल रेड एलीमेंट आहे. ब्‍लॅक रंगामधील मॉण्‍टे कार्लो लेदरेट सीट्सना लाल रंगातील एलीमेंट्सची कडा आहे.

टू-स्‍पोक स्‍टीअरिंग व्‍हीलला देखील लाल रंगाची स्टिचिंग करण्‍यात आली आहे आणि ब्‍लॅक व रेड मॉण्‍टे कार्लो थीम इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम व ड्रायव्‍हरच्‍या व्‍हर्च्‍युअल कॉकपीटपर्यंत वाढवण्‍यात आली आहे. पण, या स्‍पोर्टी केबिनमध्‍ये प्रवेश करण्‍यापूर्वी पुढील दरवाज्‍यांमधून स्‍कफ प्‍लेट्समधील मॉण्‍टे कार्लो लोगो दिसून येतो. ड्रायव्‍हरला फूटवेल क्षेत्रात स्‍पोर्टी अलू पेडल्‍स त्‍वरित दिसून येतील, जे या रेड व ब्‍लॅक मॉण्‍टे कार्लो थीम डेकॉरमध्‍ये लक्ष वेधून घेतील.

स्‍पोर्टलाइन

स्‍कोडा ऑटो इंडियान दोन सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्‍कोडा कार्समध्‍ये स्‍पोर्टलाइनचे पदार्पण करत कुशक आणि स्‍लाव्हिया श्रेणी देखील विस्‍तारित केली. ग्राहक अभिप्रायाला प्राधान्‍य देत स्‍कोडा ऑटो इंडियाने आता स्‍पोर्टलाइन सादर केली आहे, जी कुशल व स्‍लाव्हियाच्‍या विद्यमान क्‍लासिक, सिग्‍नेचर, मॉण्‍टे कार्लो आणि प्रेस्टिज व्‍हेरिएट्समध्‍ये नवीन भर आहे, ज्‍यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय व मूल्‍य मिळाले आहे.

सुधारणा

कुशक व स्‍लाव्हियाच्‍या स्‍पोर्टलाइन ट्रिममध्‍ये मॉण्‍टे कार्लोमधील ब्‍लॅक-आऊट डिझाइन एलीमेंट्सची भर करण्‍यात आली आहे जसे टेललाइट्स, ऐरो किट आणि इतर सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये; स्‍लाव्हिया स्‍पोर्टलाइनमध्‍ये आर१६ ब्‍लॅक अलॉई व्‍हील्‍स आहेत आणि कुशकमध्‍ये आर१७ ब्‍लॅक अलॉईज आहेत. तसेच कुशक व स्‍लाव्हियाच्‍या स्‍पोर्टलाइनमध्‍ये एलईडी हेडलॅम्‍प्‍स आणि डीआरएल देखील आहेत.

अंतर्गत वैशिष्‍ट्ये

कुशक व स्‍लाव्हिया लाइन-अपच्‍या इतर व्‍हेरिएण्‍ट्सप्रमाणे स्‍पोर्टलाइनमध्‍ये देखील प्रमाणित म्‍हणून सहा एअरबॅग्‍ज येतात. तसेच, या स्‍पोर्टी ट्रिममध्‍ये इलेक्ट्रिक सनरूफ, अलॉई फूट पेडल्‍स, कनेक्टिंग डॉंगल, रेन-सेन्सिंग वायपर्स आणि ऑटो-डिमिंग इंटर्नल रिअर-व्‍ह्यू मिररसह इतर विविध वैशिष्‍ट्ये आहेत. 

सुधारित पर्याय आणि सुरक्षितता

स्‍पोर्टलाइनच्‍या भरसह कुशक व स्‍लाव्हिया श्रेणी क्‍लासिक, सिग्‍नेचर, स्‍पोर्टलाइन, मॉण्‍टे कार्लो आणि प्रेस्टिज व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या दोन्‍ही कार्ससह अधिक विस्‍तारित झाली आहे. प्रत्‍येक स्‍कोडामध्‍ये प्रमाणित म्‍हणून किमान सहा एअरबॅग्‍ज आहेत.

तसेच, कुशक व स्‍लाव्हियाला ग्‍लोबल एनसीएपी अंतर्गत प्रौढ व्‍यक्‍ती व मुलांच्‍या सुरक्षिततेसाठी संपूर्ण ५-स्‍टार रेटिंग मिळाले आहे. सुपर्ब व कोडियकला युरो एनसीएपी अंतर्गत समान रेटिंग मिळाले आहे. कुशक व स्‍लाव्हियामध्‍ये स्‍लाव्हिया मॉण्‍टे कार्लो आणि स्‍पोर्टलाइन ट्रिमच्‍या भरसह स्‍कोडा ऑटो इंडियाने ५-स्‍टार सुरक्षित कार्सचा आपला ताफा अधिक विस्‍तारित केला आहे.

Leave a Comment