लिमिटेड ऑफर: पहिल्या ३३,३३३ ग्राहकांना कॉम्प्लीमेण्टरी ३-वर्ष स्टॅण्डर्ड मेन्टेनन्स पॅकेज (एसएमपी) मिळणार
उत्तम प्रतिसाद: कायलॅक हँड-रेझर्स व क्लायलॅक क्लब सदस्यांकडून १६०,००० हून अधिक एक्स्प्रेशन्स
- कायलॅकमध्ये हाय-परफॉर्मन्स, कार्यक्षम व विश्वसनीय १.० टीएसआय इंजिनची शक्ती आहे, तसेच सिक्स-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमधून निवड करण्याची सुविधा, चार व्हेरिएण्ट्स आणि सात कलर पर्याय आहेत
- आधुनिक, आकर्षक व शक्तिशाली कायलॅक भारतीय रस्त्यांवर युरोपियन तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करेल
- कायलॅकच्या सर्व व्हेरिएण्ट्समध्ये २५ हून अधिक प्रमाणित सुरक्षितता वैशिष्ट्यांसोबत सहा एअरबॅग्ज आणि विविध अॅक्टिव्ह व पॅसिव्ह सेफ्टी वैशिष्ट्यांसह केबिनमध्ये सर्वोत्तम सुरक्षिततेची खात्री
- आज सायंकाळी ४ वाजता बुकिंग्जना सुरूवात होत असून डिलिव्हरीजना २७ जानेवारी २०२५ रोजी सुरूवात होईल
- पहिल्या ३३,३३३ ग्राहकांसाठी ५ वर्षांकरिता प्रतिकिमी ०.२४ रूपयांच्या सर्वात कमी मेन्टेनन्स खर्चाची खात्री
- सखोल चाचणी: ८००,००० किमीहून अधिक अंतरापर्यंत चाचणी, जे चंद्रावर जाऊन परत येण्याच्या अंतरापेक्षा जास्त आहे
स्कोडा ऑटो इंडियाची सब-४ मीटर एसयूव्ही विभागातील पहिली वेईकल कायलॅक आता व्हेरिएण्ट्स व किमतींच्या संपूर्ण श्रेणीसह लाँच करण्यात आली आहे. कायलॅक आता क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर+ आणि प्रेस्टिज या चार व्हेरिएण्ट पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. एसयूव्हीची सुरूवातीची किंमत कायलॅक क्लासिक ट्रिमसाठी ७.८९ लाख रूपये आहे. टॉप-ऑफ-द-लाइन कायलॅक प्रेस्टिज एटीची विक्री १४,४०,००० रूपयांमध्ये करण्यात येईल.
तसेच, पहिल्या ३३,३३३ ग्राहकांना कॉम्प्लीमेण्टरी ३-वर्ष स्टॅण्डर्ड मेन्टेनन्स पॅकेज (एसएमपी) मिळेल. कायलॅकसाठी बुकिंग आज सायंकाळी ४ वाजल्यापासून सुरू होत असून डिलिव्हरीजना २७ जानेवारी २०२५ रोजी सुरूवात होईल. कायलॅकला आधीच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, जेथे कायलॅक हँड-रेझर्स, कायलॅक क्लब सदस्यांकडून १६०,००० हून अधिक एक्स्प्रेशन्स आणि डिलर चौकशी मिळाल्या आहेत.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्हणाले, ”नवीन कायलॅक भारतातील स्कोडा ब्रँडसाठी न्यू एराच्या आगमनाला सादर करते. स्कोडा कायलॅक आमच्यासह विभागासाठी देखील गेम-चेंजर ठरेल आणि ग्राहक अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासोबत भारतीय रस्त्यांवर युरोपियन तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करेल. आम्ही पहिल्या ३३,३३३ ग्राहकांसाठी बेस्ट-इन-सेगमेंट मालकीहक्क अनुभवाची घोषणा केली आहे.
कायलॅकने संपूर्ण २०२४ दरम्यान मोठा उत्साह आणि चर्चा निर्माण केली आहे, जी नोव्हेंबरमधील वर्ल्ड प्रीमियरसह अधिक वाढली. या एसयूव्हीमध्ये जागतिक डिझाइन पैलू, अद्वितीय ड्रायव्हिंग गतीशीलता, तडजोड न करणारी सुरक्षितता, अनेक वैशिष्ट्ये, एैसपैस व कार्यक्षम इंटीरिअर आहे, ज्याला पूरक श्रेणीमधील किंमत आहे. आम्हाला विश्वास आहे की कायलॅक नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याच्या, नवीन ग्राहकांना स्कोडा कुटुंबामध्ये आणण्याच्या आणि भारतातील आमची ब्रँड उपस्थिती प्रबळ करण्याच्या ध्येयाला अधिक दृढ करेल.”
भरपूर पर्याय
कायलॅक लाँचप्रसंगी दोन ट्रान्समिशन्स, चार व्हेरिएण्ट्स आणि सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये हाय-परफॉर्मन्स, कार्यक्षम व विश्वसनीय १.० टीएसआय इंजिनची शक्ती आहे, जे ८५ केडब्ल्यू शक्ती आणि १७८ एनएम टॉर्कची निर्मिती करते. तसेच सिक्स-स्पीड मॅन्युअल किंवा सिक्स-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक पर्याय देखील आहे. ग्राहक चार व्हेरिएण्ट्समधून निवड करू शकतात – क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर+ आणि टॉप-ऑफ-द-लाइन प्रेस्टिज. कार सात रंगांमध्ये येते – टोर्नेडो रेड, ब्रिलियण्ट सिल्व्हर, कँडी व्हाइट, कार्बन स्टील लावा ब्ल्यू, डीप ब्लॅक आणि कायलॅक एक्सक्लुसिव्ह ऑलिव्ह गोल्ड.
क्लासिक मूल्य
कायलॅक व स्कोडा फॅमिलीमध्ये प्रवेश करणाऱ्या क्लासिक व्हेरिएण्टसह देखील ग्राहकांना सहा एअरबॅग्ज आणि प्रमाणित म्हणून २५ हून अधिक अॅक्टिव्ह व पॅसिव्ह सुरक्षितता वैशिष्ट्ये मिळतात. अॅण्टी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, सहा एअरबॅग्ज, स्टीअरिंग व्हीलसाठी टिल्ट व रीच अॅडजस्टमेंट, पाचही सीट्ससाठी हेड रेस्ट्रेण्ट्स व थ्री-पॉइण्ट सीट बेल्ट्स, इलेक्ट्रिक मिरर्स, रिअर पार्क डिस्टन्स कंट्रोल, ड्रायव्हर्स डेड पेडल, ऑटोमॅटिक स्पीड सेन्सिटिव्ह सेंट्रल लॉकिंग आणि फुल एलईडी लायटिंग यांसारखी सुरक्षितता वैशिष्ट्ये इतर वैशिष्ट्यांमध्ये प्रमाणित आहेत.
सिग्नेचरची सविस्तर माहिती
क्लासिक सुरक्षितता व सोयीसुविधेसह सुसज्ज असताना कायलॅकच्या सिग्नचेर व्हेरिएण्ट्मध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग, क्रूझ कंट्रोल, आर१६ अलॉईज, वायर्ड अँड्रॉईड ऑटो व अॅप्पल कारप्ले, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, यूएसबी-सी सॉकेट्स, १७.७ सेमी (७-इंच) स्कोडा टच इन्फोटेन्मेंट सिस्टम, मल्टीफंक्शनल स्टीअरिंग व्हील, अॅडजस्टेबल रिअर एसी व्हेण्ट्स अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत.
सिग्नेचर+ मूल्यामध्ये अधिक भर करते
सिग्नेचर+ टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएण्टमधून तुमच्या अपेक्षित गरजांची पूर्तता करते, तसेच मिड-व्हेरिएण्टचे मूल्य देते. लोकप्रिय वायरलेस अँड्रॉईड ऑटो व अॅप्पल कारप्ले या व्हेरिएण्टमध्ये उपलब्ध आहे, तसेच २५.६ सेमी (१०.१-इंच) स्कोडा टच इन्फोटेन्मेंट सिस्टम आहे. या ट्रिममध्ये ड्रायव्हरसाठी २०.३२ सेमी (८-इंच) व्हर्च्युअल कॉकपीट आहे. तसेच रिअर-व्ह्यू कॅमेरा, क्लायमेट्रॉनिक क्लायमेट कंट्रोल सिस्टम, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, हिल-होल्ड कंट्रोल, टिकाऊ बांबू-फायबरने बनवलेले डॅशबोर्ड पॅड, इलेक्ट्रिकली फोल्डिंग एक्स्टीरिअर मिररसह कार-लॉक अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत.
प्रेस्टिज अव्वलस्थानी
टॉप-ऑफ-द-लाइन प्रेस्टिज एसयूव्हीमध्ये प्रत्येक वैशिष्ट्य असण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी कायलॅक आहे. कायलॅकच्या या लक्ष वेधून घेणाऱ्या व्हेरिएण्टमध्ये इलेक्ट्रिक सनरूफसह अॅण्टी-पिच तंत्रज्ञान, आर१७ ड्युअल टोन अलॉई व्हील्स, ऑटो हेडलॅम्प्स व वायपर्स, एलईउी फॉगलॅम्म्प्ससह कॉर्नरिंग फंक्शन, स्कोडा क्रिस्टलाइन एलईडी प्रोजेकटर हेडलॅम्प्स, अॅम्बियण्ट इंटीरिअर लायटिंग, फर्स्ट-इन-सेगमेंट सिक्व-वे इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह सीट व्हेण्टिलेशन अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. तसेच, सिग्नेचरमधील सर्व व्हेरिएण्ट्समध्ये सिक्स-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकचा पर्याय असला तरी प्रेस्टिजमध्ये त्वरित मॅन्युअल गिअरशिफ्ट्ससाठी स्टीअरिंग-माऊंटेड पॅडल-शिफ्टर्स आहे.
सेगमेंट-बेस्ट मालकीहक्क
सुरक्षिततेबाबत तडजोड न करता मूल्य व तंत्रज्ञानाचे संतुलन देणाऱ्या या व्हेरिएण्ट्सच्या व्यापक श्रेणी व्यतिरिक्त कायलॅक बुक करणाऱ्या पहिल्या ३३,३३३ ग्राहकांना कॉम्प्लीमेण्टरी ३-वर्ष स्टॅण्डर्ड मेन्टेनन्स पॅकेज मिळेल. हे पॅकेज कायलॅकचा मेन्टेनन्स खर्च प्रति किलोमीटर ०.२४ रूपयांपर्यंत कमी करते, ज्यामुळे ही कार तिच्या विभागातील सर्वात कमी मेन्टेनन्स खर्च देणारी वेईकल आहे.
तसेच, कायलॅक ३-वर्ष / १००,००० किमी प्रमाणित वॉरंटी देते, जे अगोदर येईल ते. याव्यतिरिक्त,कायलॅक श्रेणीमध्ये प्रमाणित म्हणून सहा वर्षांची अॅण्टी-कोरशन वॉरंटी देते. कुशल व स्लाव्हिया प्रमाणे ही एसयूव्ही एमक्यूबी-एओ-इन प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. कमी मेन्टेनन्स खर्चांवर लक्ष ठेवत, तसेच स्कोडाचे पारंपारिक गतीशीलता व सुरक्षिता वैशिष्ट्ये कायम राखत भारत आणि झेक रिपब्लिक येथील टीम्सनी संयुक्तपणे ही कार डिझाइन केली आहे.
कायलॅक | किंमत रूपयांमध्ये (एक्स-शोरूम) | |
१.० टीएसआय एमटी | १.० टीएसआय एमटी | |
क्लासिक | ₹ 7,89,000 | – |
सिग्नेचर | ₹ 9,59,000 | ₹ 10,59,000 |
सिग्नेचर+ | ₹ 11,40,000 | ₹ 12,40,000 |
प्रेस्टिज | ₹ 13,35,000 | ₹ 14,40,000 |
**सर्व किमती एक्स-शोरूम इंडिया
****तात्पुरती माहिती – कार समरूप केल्यानंतर कार्यक्षमता, शक्ती आणि मापनांवरील अंतिम डेटा प्रकाशित करण्यात येईल.