- एनएफओ ४-१२-२०२४ रोजी खुला होणार आणि १८-१२-२०२४ रोजी बंद होणार
- इक्विटी, सोने आणि डेट/अर्बिट्रेज मध्ये रोटेट करणारा अनोखा फंड
सॅमको असेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आज मल्टी असेट अलोकेशन फंडाची (एमएएएफ) न्यू फंड ऑफर जाहीर केली असून, हा फंड ४ डिसेंबर रोजी खुला होणार असून, १८ डिसेंबर २०२४ रोजी बंद होणार आहे. हा फंड धोरणात्मक पद्धतीने इक्विटी, सोने आणि डेट/अर्बिट्रेजमध्ये रोटेट होणार असून, त्यामुळे परतावे वाढतील व जोखीम कमी होईल. या योजनेची किमान अर्ज रक्कम ५,००० रुपये आहे.
प्रमुख आर.ओ.टी.ए.टी.ई. धोरणासह या फंडामध्ये प्रामुख्याने इक्विटी तेजीत असताना, प्रामुख्याने इक्विटी मोडमध्ये रोटेट करण्याची क्षमता या फंडामध्ये आहे, तर इक्विटी मंदावल्यानंतर सोने उत्कृष्ट कामगिरी करत असल्यास तो सोन्यात रोटेट करतो. इक्विटी आणि सोने दोन्ही घसरत असल्यास डेट/अर्बिट्रेज मोडमध्ये रोटेट करून गुंतवणुकदाराच्या पैशांचे संरक्षण करतो.
असेट विभाजनामध्ये चांगल्या प्रतीची लवचिकता देणारा हा फंड खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या विभागांमध्ये गुंतवणूक करणारा असून, २० ते ८० टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये, १०-७० टक्के गुंतवणूक डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये आणि १० ते ७० टक्के गुंतवणूक सोने व चांदी ईटीएफमध्ये करतो. पारंपरिक गुंतवणूक फंड्स प्रामुख्याने सोने आणि इतर कमॉडिटीजसाठी इंडस्ट्री स्टॅटिक एक्स्पोजर देणारे असून, ते १० ते २० टक्क्यांमध्ये असतात. सॅमकोचा मल्टी असेट अलोकेशन फंड तेजीच्या काळात सोन्यामध्ये ७० टक्क्यांपर्यंतचे लक्षणीय विभाजन शक्य करतो.
या लाँचविषयी सॅम्को असेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विराज गांधी म्हणाले, ‘सॅम्कोमध्ये आम्ही डायनॅमिक गुंतवणुकीवर विश्वास ठेवतो. आमचा फंड अनोख्या आर.ओ.टी.ए.टी.ई धोरणावर आधारित असून, मार्केटमधील परिस्थितीनुसार त्यात बदल करण्याची क्षमता आहे, जे पारंपरिक स्टॅटिक विभाजन पद्धतीत शक्य होत नाही. मार्केट ट्रेंड व अस्थिरतेनुसार असेट क्लासमध्ये रिअलोकेट करून आम्ही सातत्यपूर्ण कामगिरीचे ध्येय ठेवले आहे. तेजी असताना संधी वाढविण्यावर आणि मंदी असताना गुंतवणूकदारांचे हित जपण्यावर आमचा भर असतो. ही लवचिकता आजच्या सातत्याने बदलत असलेल्या बाजारपेठेत मार्ग काढण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. ’
या फंडाचे गुंतवणूक व्यावसायिकांच्या तज्ज्ञ टीमद्वारे व्यवस्थापन केले जात असून, त्यात सौ.निराली भन्साळी, श्री.उमेशकुमार मेहता आणि श्री.धवल घनश्याम धनानी यांचा समावेश आहे. त्यांचे एकत्रित ज्ञान आणि धोरणात्मक दृष्टिकोन फंडाचे नावीन्यपूर्ण आर.ओ.टी.ए.टी.ई. धोरण अंमलात आणण्यासाठी व प्रतिसादात्मक गुंतवणूक धोरण राबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
सॅम्को असेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख इन्व्हेस्टमेंट अधिकारी (सीआयओ) श्री.उमेशकुमार मेहता म्हणाले, ‘बाजारपेठेतील चक्राला मॅक्रोइकॉनॉमिक घटक आणि बदलत्या धोरणांमुळे चालना मिळत असते. सॅम्को एमएएएफ विभागणीमध्ये बदल करून जोखीम कमी करते व पर्यायाने संपत्ती निर्मितीचा अनुभव जास्त सफाईदार होतो. हे धोरण गुंतवणूकदारांसाठी, विशेषतः बाजारपेठेतील तेजी आणि मंदीच्या काळात भावनिक शिस्त राखणं आव्हानात्मक वाटणाऱ्यांसाठी जास्त लाभदायक आहे.’
या फंडाद्वारे बेंचमार्क इंडेक्स ट्रॅक केला जाणार असून, त्यात ६५ टक्के निफ्टी ५० टीआरआय, २० टक्के क्रिसिल शॉर्ट टर्म बाँड फंड इंडेक्स, १० टक्के सोन्याच्या देशांतर्गत किमती, ५ टक्के देशांतर्गत चांदीच्या किमती यांचा समावेश असेल. सॅम्को मल्टी असेट अलोकेशन फंड आणि एनएफओविषयी अधिक माहितीसाठी https://www.samcomf.com/mutual-funds/samco-multi-asset-allocation-fund-direct-growth/madgg