तंत्रज्ञानाच्या मदतीने ५७ वर्षीय महिलेच्या मेंदूतील दुर्मिळ मेनिन्जिओमा गाठीवर उपचार
तीव्र डोकेदुखीमुळे आणि चालण्यामुळे देखील असह्य वेदनेने त्रस्त असलेल्या ५७ वर्षीय महिलेवर पुण्यातील हडपसर येथील सह्याद्रि सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करुन तिला जीवनदान दिले. या महिलेला अतिशय दुर्मिळ मेनिन्जिओमा ही मेंदूच्या गाठीचा आजार झाला होता.
सततच्या जीवघेण्या वेदनेने ही महिला पुरती कंटाळली होती. तिने अनेक रुग्णालयात उपचार घेतले होते परंतु महिलेच्या वेदना कमी झाल्या नव्हत्या. मेंदूच्या मागील भागांत आणि पाठीच्या कण्यात दोनपेक्षा अधिक गाठ निर्माण झाल्याने ही महिला असह्य यातना भोगत होती. अशी केस मेंदूची गाठ असलेल्या केवळ १ ते १० टक्के रुग्णांमध्ये आढळते.
हडपसर येथील सह्याद्रि सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे ज्येष्ठ न्यूरोसर्जन डॉ. सिराज बसाडे यांनी शस्त्रक्रियेच्या मदतीने या महिलेच्या मेंदूतील दुर्मिळ मेनिन्जिओमा गाठ यशस्वीरित्या बाहेर काढली. ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक होती. शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी यासाठी डॉक्टरांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली.
शारिरीक वेदना असह्य झाल्याने या महिला रुग्णाला तिच्या कुटुंबीयांनी सह्याद्रि सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तीव्र डोकेदुखी तसेच अशक्तपणा आणि पायांमध्ये कडकपणा आल्याने ही महिला त्रासलेली होती. रुग्णाची शारिरीक अवस्था पाहून डॉक्टरांनी तातडीने तिची वैद्यकीय तपासणी केली.
एमआरआय अहवालात असे आढळून आले की गाठीमुळे रुग्णाला, मेंदूच्या मागच्या बाजूला, लहान मेंदूला आणि मज्जारज्जूला भरपूर दाब होता तसेच त्या गाठीमुळे मेंदूतील प्रवाह सुरळीत होत नव्हता. परिणामी तिला असह्य डोकेदुखी जाणवत होती.
डॉक्टरांनी तातडीने रुग्णावर वॅन्ट्रीकुलोपॅरिटोनिअल प्रक्रिया सुरु केली. या उपचारांत महिलेच्या मेंदूतील अतिरिक्त स्त्राव काढला केला. त्यानंतर रुग्णाची डोकेदुखी नियंत्रणात आली. काही दिवसांनी महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर डॉक्टरांनी मेंदूतील गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी मेंदूची कवटी मागच्या बाजूने उघडून गाठ काढण्याचे ठरले. या शस्त्रक्रियेला पॉस्टेरिअर फॉस्सा क्रॅनिओटोमी असे संबोधले जाते. ही शस्त्रक्रिया अतिशय जटील आणि गुंतागुंतीची असते. शस्त्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नये म्हणून डॉक्टरांनी मॉनिटरींग मशीनची मदत घेतली. अखेरिस मेंदूतील गाठ यशस्वीspरित्या काढण्यात वैद्यकीय पथकास यश आले.
याबद्दल अधिक माहिती देताना ज्येष्ठ न्यूरोसर्जन डॉ सिराज बसाडे यांनी सांगितले की, “ही केस दुर्मिळ होती कारण या महिलेच्या मेंदूतील ज्या भागात गाठ होती तशी गाठ मेंदूत गाठ निर्माण झालेल्या एक लाख रुग्णांपैकी एकामध्ये आढळून येते. त्यामुळे आम्हांला या गुंतागुंतीच्या शास्त्रक्रियेदरम्यान येणाऱ्या संभाव्य धोकयांची कल्पना होती.
म्हणूनच आम्ही शस्त्रक्रिया अचूक होण्यासाठी इंट्रा-ऑपरेटीव्ह मॉनिटरींग मशीन आणि अल्ट्रासाऊण्डची मदत घेतली गेली. आणि या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही मेंदूतील गाठ कोणत्याही अडथळ्याविना यशस्वीरित्या बाहेर काढू शकलो.”
शस्त्रक्रिया सुखरुप पार पाडल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत प्रचंड सुधारणा दिसून आल्या. फिजिओथेअरपीच्या मदतीने तिच्या स्नायूंना बळकटीकरण मिळाले आणि काही दिवसातच ही महिला सामान्य माणसांप्रमाणे चालू लागली.
रुग्ण आणि तिच्या कुटुंबियांनी सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील वैद्यकीय पथकाचे त्यांना मिळालेल्या उत्कृष्ट उपचाराबद्दल आभार व्यक्त केले. “आम्ही पुण्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये भेट दिली होती, परंतु सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये मिळत असलेल्या उपचारांमुळे आम्हाला आशा वाटली. आमच्या आप्ताचे आयुष्य परत मिळवून दिल्याबद्दल डॉ. बसाडे आणि सह्याद्रिचे आम्ही कायमचे आभारी असू,” असे रुग्णाच्या कुटुंबाने म्हटले.
रुग्णांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी आणि त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे केला जाऊ शकतो हे या केसमध्ये अधोरेखित होते. सह्याद्रि हॉस्पिटल्सची रुग्णसेवेप्रति असलेली तत्परता आणि अचूक शस्त्रक्रियेसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या केसमधून दिसून येतो.