त्वचेसाठी ‘क्वेंच’ या कोरियन स्किनकेअर ब्रँडने नवीन कल्पक उत्पादने बाजारात केली दाखल

Admin

Quench क्वेंच

विशेषतः भारतीयांच्या त्वचेसाठी कोरियामध्ये निर्मिती केलेल्या ‘क्वेंच’ या कोरियन स्किनकेअर ब्रँडने नवीन कल्पक उत्पादने बाजारात दाखल केली आहेत.

‘९६ टक्के स्नेल म्युसिन कोलेजन बूस्ट सीरम’ आणि ‘९२ टक्के स्नेल म्युसिन कोलेजन बूस्ट मॉइश्चरायझर’ अशी ही दोन उत्पादने असून, ती ९६ टक्के अस्सल स्नेल म्युसिन (गोगलगायीपासून बाहेर पडणारा चिकट पदार्थ अर्थात श्लेष्मा) आणि शक्तिशाली घटकापासून तयार केली आहेत. ज्यामुळे चेहऱ्यावर ७२ तास टिकणारी चमक प्राप्त होते.

नियासिनामाइड आणि हायलुरोनिक ऍसिड यासारख्या शक्तिशाली सक्रिय घटकांसह, अधिभरण (सुपरचार्ज) केलेले सूत्र चेहऱ्यावरील गडद डाग कमी करते, जळजळ दूर करते आणि त्वचा नितळ आणि स्वच्छ बनवते.

अनोख्या आणि अतिहलक्या सूत्रांसह तुमच्या त्वचेची काळजी घ्या, जे वैविध्यपूर्ण भारतीय हवामानाशी जुळवून घेण्यासाठी खास डिझाइन केले आहेत.

तसेच ते कोणतेही स्निग्ध किंवा चिकट भाग न सोडता चेहऱ्यावर तत्काळ शोषून घेते. प्रत्येकासाठी दृश्यमान परिणाम आणि दीर्घकालीन फायदे वितरीत करून, भारतीयांच्या त्वचेसाठी कोरियन स्किनकेअर तंत्रज्ञानाचे मिश्रण याद्वारे उपलब्ध झाले आहे.

स्नेल म्युसिन कोलेजन बूस्ट मॉइश्चरायझर आणि कोलेजन बूस्ट सीरम आता क्वेंचच्या अधिकृत संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहेत. नियासीनामाइड आणि हायलुरोनिक ऍसिडसह क्वेंच ९६ टक्के स्नेल म्युसिन कोलेजन बूस्ट सीरम – ३० मिलीसाठी रुपये ५४९ आणि नियासीनामाइड आणि हायलुरोनिक ऍसिडसह क्वेंच ९२ टक्के स्नेल म्यूसिन कोलेजन बूस्ट मॉइश्चरायझर – ५० मिलीसाठी रुपये ६९९

Leave a Comment