पूर्वा होम फेस्ट २०२४ नवरात्रीपासून मुंबई आणि पुण्यात सुरू झाला!

Admin

पूर्वा होम फेस्ट

भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या पूर्वांकरा. मुंबई आणि पुणे येथे पूर्वा होम फेस्ट 2024 ची घोषणा करत आहे. महिनाभर चालणारा हा कार्यक्रम 3 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत दोन प्रमुख शहरांमधील प्रकल्पांना कव्हर करेल. सणासुदीच्या या हंगामात प्रीमियम आणि मिड-सेगमेंट हाउसिंगमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गृहखरेदीदारांना आकर्षक फायद्यांची ऑफर मिळेल.

फेस्टमध्ये सर्वाधिक मागणी असलेले सात निवासी प्रकल्प प्रदर्शित केले जातील : चेंबूरमधील पूर्वा क्लेरमॉन्ट. शिळफाटा येथील प्रॉव्हिडंट पाम विस्टा. पुण्यात बावधन येथील पूर्वा अस्पायर. पुण्यातील कोंढवा येथील प्रॉव्हिडंट केनविस्टा आणि मुंढवा येथील पूर्वा सिल्व्हरसँड्स, पूर्वा एमराल्ड बे, पूर्वा कोडनेम; हॅलो नेचर हे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचे स्थानिक फायदे आणि मूलभूत सुविधा यामुळे गृहखरेदीदारांमध्ये वाढती मागणी आहे.

रिअल इस्टेट मार्केटमध्ये, विशेषत: पश्चिम भारतात वाढ होत असताना, प्रीमियम आणि परवडणाऱ्या घरांची वाढती भूक भागविण्याचे पूर्वांकराचे उद्दिष्ट आहे. अलीकडील बाजाराच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत महाराष्ट्राच्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीत मुंबई आणि पुणे यांचा एकत्रितपणे 45% वाटा होता. नोंदणी आणि मालमत्तेच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाल्याने, हे प्रदेश रिअल इस्टेट गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनले आहेत.

पूर्वा होम फेस्ट 2024 दरम्यान, गृहखरेदीदारांना शून्य मुद्रांक शुल्क, शून्य मजला वाढ आणि सोन्याच्या नाण्यांसह सर्वोत्तम ऑफरचा आनंद मिळेल. ज्यामुळे खरेदीवर भरीव बचत होईल. अतिरिक्त फायद्यांमध्ये स्पॉट बुकिंग केल्यास – iPads किंवा iPhone सारख्या भेटवस्तू, पूर्वा स्ट्रिक्स (इंटिरिअर्स) व्हाउचर आणि घर खरेदीचा अनुभव वाढविण्यासाठी होम फर्निशिंग पॅकेज यांचा समावेश आहे.

त्यावर बोलताना श्री.  रजत रस्तोगी (सीईओ – पश्चिम आणि व्यावसायिक मालमत्ता, पॅन इंडिया) म्हणाले, “भारतातील सर्वात वेगवान रिअल इस्टेट मार्केटपैकी असलेल्या मुंबई आणि पुणे येथे पूर्वा होम फेस्ट 2024 लाँच करण्यास आम्ही उत्सुक आहोत. या शहरांमधील रहिवासी विभागामध्ये वर्ष-दर-वर्ष 12% वाढ झाली आहे.

जी दर्जेदार घरांच्या सततच्या मागणीला अधोरेखित करते. आमचे काळजीपूर्वक तयार केलेले प्रकल्प, विशेष सणाच्या ऑफरद्वारे सादर करत आहोत. जे आजच्या गृहखरेदीदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. योग्य स्थान, सुविधा आणि स्पर्धात्मक किमतीसह आम्हाला खात्री आहे की, ही मोहीम लोकांना आकर्षित करेल.”

पूर्वांकरा मुंबईच्या बाजारपेठेत आपली उपस्थिती वाढवत आहे. अलीकडेच, अंधेरी लोखंडवाला, ब्रीच कँडी आणि पाली हिलमधील अनेक प्रशस्त पुनर्विकास प्रकल्प, तसेच ठाण्यातील एक नवीन प्रकल्प सणासुदीच्या काळात सुरू करण्याची घोषणा केली आहे. जी गुणवत्ता, पारदर्शकता व ग्राहकांच्या समाधानासाठी आपली वचनबद्धता दर्शविते. पूर्वा होम फेस्ट 2024 हे या शुभ सणाच्या काळात घरमालकीला अधिक सुलभ आणि फायद्याचे बनविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.

Leave a Comment