गोदरेज फूड्स लि.चा रेडी-टू-कूक ब्रॅण्ड यम्मीझने भारताचा फ्रोझन स्नॅक रिपोर्ट प्रकाशित केला असून त्यातून भारतीयांच्या स्नॅक्स खाण्याच्या सवयींचे मर्म उलगडून दाखवले आहे. पहिल्या अहवालातील सुरक्षितता (Safety), तंत्रज्ञान (Technology), चव (Taste), सुलभता (Ease) आणि मूड चांगला करण्याची क्षमता (mood uplifter) अशा पाच आधारस्तंभांवर उभा राहिलेला STTEM 2.0 हा अहवाल आजघडीला भारतामध्ये फ्रोझन स्नॅक्सच्या जगाला आधार देत असलेल्या दृष्टिकोनांचा, मिथकांचा आणि वास्तवांचा खोलात जाऊन वेध घेतो.
फूड ब्लॉगर्स असोसिएशन ऑफ इंडिया (FBA) द्वारे गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या व नुकत्याच पार पडलेल्या इंडिया फूड अँड बेव्हरेजेस अवॉर्ड 2024 या पुरस्कार सोहळ्यामध्ये, पाककलेच्या जगातील उत्तमोत्तम व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीत या अहवालाचे अनावरण झाले.
५७ टक्के भारतीयांना आता फ्रोझन फूड खाण्यासाठी सुरक्षित वाटते YouGov द्वारे हाती घेण्यात आलेल्या ताज्या संशोधनाने उघड केले आहे व या निष्कर्षाला आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या विपुल माहितीचा आधार मिळाला आहे. २,००४ सहभागींच्या ऑनलाइन सर्वेक्षणाच्या आधारे केल्या गेलेल्या या अभ्यासपहाणीमध्ये कोट्यानुसार नमुने गोळा करण्याची पद्धत वापरत लिंग, वयोगट, वैवाहिक स्थिती आणि सामाजिक-आर्थिक वर्ग अशा वेगवेगळ्या प्रवर्गांमध्ये सर्व प्रकारच्या लोकांचे संतुलित प्रतिनिधीत्व असेल याची खबरदारी घेतली गेली. नियमनांस पात्र असलेल्या उत्पादकांद्वारे जपल्या जाणाऱ्या सुरक्षा मापदंडांना अधोरेखित करत STTEM 2.0 हा अहवाल फ्रोझन स्नॅक्सना आधुनिक जीवनशैलीला साजेसा एक सुरक्षित व सोयीचा पर्याय म्हणून या पदार्थांची बाजू उचलून धरतो.
या अहवालाच्या प्रकाशनाविषयी बोलताना गोदरेज फूड्स लि.चे सीईओ अभय पारनेरकर म्हणाले, “भारतामध्ये फ्रोझन स्नॅक्सच्या श्रेणीमध्ये सातत्याने वाढ होत असताना STTEM 2.0 अहवाल ग्राहकांचा प्राधान्यक्रम व दृष्टिकोन यांच्याविषयीची आपली जाण अधिक सखोल करण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावणारा आहे. ग्राहकांना काय वाटते आणि आमच्या उत्पादनांविषयी त्यांना किती ज्ञान आहे याबद्दलचे मर्म जाणून घेऊन, आम्ही आमच्याद्वारे पुरविल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये सातत्याने सुधारणा करू शकतो.
हा अहवाल आम्हाला आमच्या ग्राहकांच्या गरजा व अपेक्षांशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेण्यास मदत करतो, दृष्टिकोनातील बदलास चालना देऊ शकतो, ज्याचा फायदा उद्योगक्षेत्राला तर होईलच, पण त्यामुळे गोदरेज फूड्सचे बाजारपेठेतील स्थान अधिक भक्कम होईल, ज्यातून अधिक विश्वासार्हता जपली जाईल आणि आमच्या फ्रोझन स्नॅक उत्पादनांसाठीची मागणी वाढेल.”
फ्रोझन स्नॅक्सच्या वाढत्या स्वीकारावर बदलत्या जीवनशैलीचा आणि सणवारांचा प्रभाव
या अभ्यासामधून भारतीय घरांमध्ये फ्रोझन स्नॅक्समध्ये असणारे वैविध्यही समोर आले. दोन जेवणांच्या मधला झटपट तोंडात टाकायचा पदार्थ इथपासून ते संपूर्ण जेवणासाठीचाच पर्याय म्हणून ५३ टक्क्यांहून अधिक भारतीय फ्रोझन स्नॅक्सना आपल्या दैनंदित आहारात समाविष्ट करून घेतात. या वाढता कल भारतातील स्नॅकिंगच्या प्रसंगांतील वैविध्याकडे निर्देश करतो, कारण ग्राहक त्यांच्या व्यग्र जीवनशैलीला साजेशा सुलभ व चवदार पर्यायांच्या शोधात असतात.
प्रत्येक प्रसंगासाठी एक स्नॅक आहे आणि प्रत्येक स्नॅकसाठी एक प्रसंग; दिवाळी आणि ईदच्या भव्य सोहळ्यांपासून ते घरच्या आरामशीर वातावरणात एकट्याने बसून शांतपणे बिंज-वॉचिंग करण्यापर्यंत स्नॅक खाण्याचे निमित्त ठरणारे विविध प्रकारचे प्रसंग STEMM 2.0 मधून सर्वांसमोर मांडण्यात आले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकसंख्यागटांमध्ये काही विशिष्ट प्रसंगांमुळे फ्रोझन स्नॅक्सचा भारताच्या पाककला क्षेत्रामध्ये वाढत्या प्रमाणात स्वीकार केला जाण्यास, त्यांना आहाराचा भाग बनविला जाण्यास चालना मिळत आहे हे या माहितीमधून एकत्रितपणे उघड झाले आहे.
पाच आधारस्तंभांनुसार (STTEM) ने ग्राहकांच्या प्रतिसादांतील काही प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे:
- आपण दिवसभर मिनी-मील्स म्हणून फ्रोझन फूडचा आनंद घेतो असा दावा पुण्यातील ४५ टक्के लोकांनी केला आहे.
- आपली स्नॅकिंग करण्याची वारंवारता वाढली असल्याचे पुण्यातील ५१ टक्के लोक मान्य करतात.
- कोणत्याही प्रकारच्या पार्टीमध्ये फ्रोझन स्नॅक्स असलेच पाहिजेत असे ६० टक्के पुणेकरांना वाटते.
- पुणेकरांची चव बदलत आहे. ५८ टक्के लोकांकडून आता फ्रोझन स्नॅक्समधील आंतरराष्ट्रीय फ्लेवर्सना पसंती दिली जाते.
- पुणेकरांचे फ्राइड चिकनवर प्रेम आहे! ६५ टक्के लोक हे आपले आवडीचे नॉन-व्हेज फ्रोझन स्नॅक असल्याचा दावा करतात.
- ७९ टक्के पुणेकर छोट्या भुकेसाठी, चटकन भूक भागविण्यासाठी फ्रोझन स्नॅक्सचा आस्वाद घेतात.
STTEM – सुरक्षितता (Safety), तंत्रज्ञान (Technology), चव (Taste), सुलभता (Ease) आणि मूड चांगला करण्याची क्षमता (mood uplifter) – गोदरेज यम्मीझच्या इंडियाज फ्रोझन स्नॅक्स रिपोर्टने मुंबई, दिल्ली एनसीआर, पुणे, अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बेंगळुरूसारख्या १६ शहरांतील २००० हून अधिक लोकांचे सर्वेक्षण केले.