किरकोळ कर्ज व्यवसाय वाढवण्याच्या आपल्या व्यापक धोरणाचा भाग म्हणून पिरामल फायनान्स गृह आणि व्यवसाय कर्ज विभागात देखील आपला विस्तार करणार आहेत. गृहकर्ज आणि इतर आर्थिक उत्पादनांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी विशेषत: मेट्रो-लगतच्या भागात आणि टियर 2 आणि टियर 3 मार्केटमध्ये कंपनी शाखा नेटवर्क वेगाने वाढवत आहे.
पिरामल फायनान्सच्या व्यवस्थापनाखालील किरकोळ मालमत्ता (AUM) 50,000 कोटींच्या पुढे गेली आहे, ज्यामध्ये गृहकर्ज हे पोर्टफोलिओच्या सुमारे 45% आणि मालमत्तेवरील कर्ज (LAP) 25% योगदान देते. इतर किरकोळ कर्ज उत्पादनांमध्ये विविधता आणताना कंपनीने गृहनिर्माण कर्ज विभागावर आपले मजबूत लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. 500 पेक्षा जास्त शाखा आणि 13,000 पिन कोडमध्ये उपस्थितीसह, पिरामल फायनान्स 13,700 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने 1.3 दशलक्ष ग्राहकांना सेवा देते.
गृहकर्ज आणि व्यावसायिक कर्जावर लक्ष केंद्रित करण्यासोबतच, पिरामल फायनान्सने अलीकडेच “हम कागज से ज्यादा नियत देखते है” या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. याद्वारे भारतातील सेवा नसलेल्या ग्राहकांना औपचारिक कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम बनवण्याचा कंपनीचा उद्देश आहे.
पारंपरिकरित्या काम करत नसतील परंतु मजबूत ध्येय आणि क्षमता असलेले उद्योजक तसेच ग्राहकांना पाठिंबा देण्याच्या वचनबद्धतेवर पिरामल फायनान्सची ही मोहीम प्रकाश टाकते. ‘आइये बात करते हैं‘ या टॅगलाइनसह कंपनी ग्राहकांना त्यांचे आर्थिक पर्याय शोधण्यासाठी मदत करते.
पिरामल फायनान्सचे मार्केटिंग प्रमुख अरविंद अय्यर म्हणाले, “भारताच्या कमी सेवा असलेल्या बाजारपेठांमध्ये आमचा विस्तार वाढवण्यासाठी तसेच सुलभ आर्थिक उपाय प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. संपूर्ण भारतातील सेवा नसलेल्या व्यक्तींसाठी अधिक समावेशक आर्थिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी कर्जदाता म्हणून आम्ही वचनबद्ध आहोत. ग्राहकांच्या गरजांचे आम्ही निष्पक्ष आणि पारदर्शकपणे मूल्यांकन करतो त्यासोबतच विश्वास आणि समर्थनाच्या पायावर उभारलेल्या नातेसंबंधांवर भर देतो.”
वाढते शाखा नेटवर्क, उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार आणि केंद्रित ग्राहक मोहिमेसह, पिरामल फायनान्स मेट्रो आणि नॉन-मेट्रो दोन्ही बाजारांसाठी सेवा देत किरकोळ कर्ज देण्याच्या क्षेत्रात भारतातील एक प्रमुख म्हणून स्थान मिळवत आहे.