महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, यावेळी पियाजिओ वेईकल्स प्रा. लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. डिएगो ग्राफी आणि पियाजिओ वेईकल्स प्रा. लि.च्या दुचाकी देशांतर्गत व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. अजय रघुवंशी उपस्थित होते
पियाजिओ वेईकल्स प्रा. लि. ही इटालियन ऑटो कंपनी पियाजिओ ग्रुपची १०० टक्के उपकंपनी स्कूटर्स व मोटरसायकल्सच्या आयकॉनिक वेस्पा आणि स्पोर्टी अॅप्रिलियासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीला महाराष्ट्रातील पुणे येथे आपल्या पहिल्या मोटोप्लेक्स डिलरशिपच्या उद्घाटनाची घोषणा करताना आनंद होत आहे. नवीन लाँच करण्यात आलेले मोटोप्लेक्स – लाँग माइल्समध्ये वेस्पा, अॅप्रिलिया व मोटो गुझ्झी अंतर्गत उत्पादनांची परिपूर्ण श्रेणी, तसेच विशेष ऑफिशियल मर्चंडाईज आणि सीबीयूंना दाखवण्यात येईल आणि त्यांची विक्री करण्यात येईल.
महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी उपस्थिती दर्शवून उद्घाटन समारोहाची शोभा वाढवली, तसेच याप्रसंगी पियाजिओ वेईकल्स प्रा. लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. डिएगो ग्राफी, पियाजिओ वेईकल्स प्रा. लि.च्या दुचाकी देशांतर्गत व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. अजय रघुवंशी आणि लाँग माइल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विश्वजीत बारवकर उपस्थित होते.
या विस्तृत डिलरशिपमध्ये २,४०० चौरस फूट जागेवर पसरलेले अत्याधुनिक शोरूम आणि २,४०० चौरस फूट जागेवर समर्पित सर्विस वर्कशॉप आहे, जे प्रीमियम ग्राहक अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. यामधून संबंधित ब्रँड्सचा संपन्न भारतीय वारसा दिसून येतो.
याप्रसंगी मत व्यक्त करत पियाजिओ वेईकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. डिएगो ग्राफी म्हणाले, ”मी या उद्घाटन कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचे आभार मानतो. पुणे पियाजिओ इंडियासाठी होम सिटी सारखे आहे आणि मला या शहरामध्ये मोटोप्लेक्सच्या विस्तारीकरणाचा आनंद होत आहे. लाँग माइल्सच्या माध्यमातून आम्ही पुण्यातील ग्राहकांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्यास आणि त्यांना वेस्पा, अॅप्रिलिया व मोटो गुझ्झीसह जागतिक दर्जाचा अनुभव देण्यास उत्सुक आहोत. पुण्यामधून नेहमी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्हाला शहरामध्ये आमच्या पहिल्या मोटोप्लेक्सचे उद्घाटन करण्याचा आनंद होत आहे, ज्यामधून ग्राहकांसाठी उपलब्धतेमध्ये वाढ झाली आहे. पियाजिओ इंडियामध्ये आम्ही सतत उच्च दर्जाची उत्पादने वितरित करण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम मालकीहक्क अनुभव देण्याची खात्री घेतो.”
आपले मत व्यक्त करत पियाजिओ वेईकल्स प्रा. लि. येथील दुचाकी देशांतर्गत व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. अजय रघुवंशी म्हणाले, ”चिंचवड येथे स्थित नवीन मोटोप्लेक्स कंपनीसाठी नवीन रिटेल टचपॉइण्ट असण्यासोबत कंपनीच्या विक्री धोरणामधील महत्त्वपूर्ण पाऊल देखील आहे. मोटोप्लेक्सच्या लाँचसह आम्ही पुण्यातील ग्राहकांच्या गरजांना प्रथम प्राधान्य देत आहोत. या शोरूममध्ये प्रशिक्षित कर्मचारी असतील, जे ग्राहकांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करतील. आम्हाला विश्वास आहे की हे शोरूम ग्राहकांना निवड करण्याचे स्वातंत्र्य देत सक्षम करेल, तसेच त्यांच्या मालकीहक्क प्रवासादरम्यान परिपूर्ण मन:शांतीची खात्री देईल.”
आपले मत व्यक्त करत लाँग माइल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विश्वजीत बारवकर म्हणाले, ”मला पियाजिओ इंडियासोबत त्यांची सर्वात प्रीमियर डिलरशिप ऑफरिंग – मोटोप्लेक्ससाठी सहयोग करण्याचा आनंद होत आहे. आम्ही आज उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम ब्रँड्सकडून स्वप्नवत राइडिंगची पूर्तता करू पाहणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी १२५ सीसीपासून १००० सीसीहून अधिक क्षमतेपर्यंतच्या मॉडेल्सच्या परिपूर्ण श्रेणीला दाखवण्यास आणि त्यांची विक्री करण्यास उत्सुक आहोत. वेस्पा, अॅप्रिलिया व मोटो गुझ्झी पियाजिओ ग्रुपचे मार्की ब्रँड्स आहेत आणि आम्हाला पुण्यातील ग्राहकांसाठी हे मॉडेल्स सादर करण्याचा अभिमान वाटतो.”
लाँग माइल्स जुडल्याने पियाजिओचे आता भारतभरात वेस्पा, अॅप्रिलिया आणि मोटो गुझ्झीसाठी २५० हून अधिक टचपॉइण्ट्स आहेत, ज्यामुळे देशामध्ये फूटप्रिंट वाढवण्याप्रती कंपनीची कटिबद्धता अधिक दृढ होत आहे.