पॅरागॉन फुटवेअर ने वितरक भागीदारांचा केला गौरव सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त पुण्यात खास आयोजन

Admin

पॅरागॉन Paragon

भारतातील विश्वसनीय फूटवेअर ब्रँड असलेला पॅरागॉन आपला सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. या निमित्त कंपनीच्या वतीने आपल्या यशात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या वितरक भागीदारांचा गौरव करण्यात आला. तसेच भागीदारांना आणखी बळ देण्यासाठी नवी डिजिटल साधने सादर करण्यात आली.

पुण्यातील या कार्यक्रमात नाविन्य आणि सहकार्यावर पॅरागॉनचा असलेला भर अधोरेखित झाला, तसेच पुढील ५० वर्षांच्या वाढीचा आणि उत्कृष्टतेचा पाया घातला. दर्जेदार आणि मजबूत भागीदारींच्या कटिबद्धतेसह आपले व्यापार नेटवर्क सशक्त करणे आणि ग्राहकांचे अनुभव समृद्ध करणे पॅरागॉनने सुरू ठेवले आहे.

पॅरागॉनचे मार्केटिंग आणि आयटीचे कार्यकारी उपाध्यक्ष सचिन जोसेफ म्हणाले, कार्यक्षमता आणि उपयोगिता यांच्यासाठी तयार केलेली काही व्यावहारिक डिजिटल साधने पॅरागॉनने सादर केली.व्यावसायिक कार्यांना मजबूती आणण्यासाठी तसेच भागीदारांचे सहकार्य वाढविण्यासाठी ही साधने आणण्यात आली आहेत. यातील व्हॉट्सॲप चॅटबॉटमुळे उत्पादन कॅटलॉग, ऑर्डर ट्रॅकिंग आणि फीडबॅक यंत्रणा सुलभपणे उपलब्ध होतील तसेच तत्पर कस्टमर सपोर्टची हमी मिळेल.

गोल्ड सर्कल लॉयल्टी ॲपमुळे किरकोळ विक्रेत्यांना ॲमेझॉनद्वारे सहजपणे पॉइंट मिळवणे आणि रिडीम करणे शक्य होईल, तसेच रिवॉर्ड प्रक्रिया सरळ आणि पारदर्शक होईल. सेल्सफोर्ससोबत सहयोग करून पॅरागॉनने डिस्ट्रिब्युटर मॅनेजमेंट सिस्टम (डीएमएस) विकसित केली आहे. हे उत्पादन लॉजिस्टिक्स सुरळीत करण्यासाठी आणि दैनंदिन कामकाज अनुकूलन करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. त्यामुळे भागीदारांना ग्राहकांशी संबंध बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

प्राईम पार्टनर्स प्रोग्राम :
पॅरागॉन प्राईम पार्टनर प्रोग्राम उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना आधार पुरवते. यामध्ये नवीन उत्पादने लवकर मिळणे, मार्केटिंग सहाय्य आणि वाढीव दृश्यमानतेसाठी दुकान शेल्फ फर्नीचर यांसारखे लाभ मिळतात. साप्ताहिक सप्लाय व्हिजिट आणि अग्रगण्य भागीदारांसह धोरणात्मक चर्चांच्या माध्यमातून ते नियमित कटिबद्धतासुद्धा सोपी बनवते. चांगले सहयोग आणि वाढीच्या संधींना चालना देणे हा त्याचा उद्देश आहे.

Leave a Comment