‘सर्वात स्मार्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन’ वनप्लस 13 ची भारतात उद्यापासून खुली विक्री केली (ओपन सेल केले) जाणार आहे

Admin

वनप्लस
  • वनप्लस 13 सोबतच वनप्लस बड्स प्रो 3 सुद्धा दुपारी 12 वाजल्यापासून खुल्या विक्रीसाठी (ओपन सेलसाठी) उपलब्ध केला जाणार आहे
  • ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमांद्वारे ग्राहकांना दोन्ही डिव्हाइसेसवर आकर्षक ऑफर्सचा लाभ उचलता येणार आहे

वनप्लस हा जागतिक तंत्रज्ञान ब्रँड आहे आणि आपल्या नवीन फ्लॅगशिप डिव्हाइस, वनप्लस 13 आणि नवीन कलर व्हेरिएंट मध्ये वनप्लस बड्स प्रो 3 यांच्यासाठी उद्या, म्हणजेच दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून खुली विक्री (ओपन सेल) सुरू करणार आहे. नुकतेच जागतिक स्तरावर विंटर लाँच इव्हेंटमध्ये ब्रँडने वनप्लस बड्स प्रो 3 च्या सफायर ब्लू व्हेरिएंट सोबत वनप्लस 13 सीरिज हे नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन्स लाँच केले आहेत.

वनप्लसने स्टारलाइट या प्रोजेक्टच्या अनुषंगाने, 180 दिवसांच्या फोन बदलण्याच्या प्लॅनची घोषणा वनप्लस 13 सीरिज वापरकर्त्यांसाठी केली आहे. प्लॅननुसार, दिनांक 13 फेब्रुवारी 2025 पूर्वी खरेदी केलेल्या वनप्लस 13 सीरिज डिव्हाइसेससाठी, असंभवनीय परिस्थितीमध्ये नवीन डिव्हाइसमध्ये हार्डवेअरची समस्या दिसून आली तर ब्रँड खरेदी केल्याच्या तारखेनंतर पहिल्या 180 दिवसांच्या आत विनामूल्य फोन बदलून देण्याचा प्रस्ताव देत आहे.

वनप्लस 13 साठी ओपन सेल किंमत आणि ऑफर्स

वनप्लस 13 रु. 69,999 पासून सुरू होत असून 12+256जीबी, 16+512जीबी आणि 24+1टीबी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून प्रत्येकी मिडनाइट ओशन, आर्क्टिक डॉन आणि ब्लॅक एक्लिप्स या तीन रंगांच्या प्रकरांमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. वनप्लस कम्युनिटीला OnePlus.in, वनप्लस स्टोअर ॲप, Amazon.in वर हा फोन ऑनलाइन खरेदी करू शकते आणि वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स, रिलायन्स डिजिटल, क्रोमा, विजय सेल्स, बजाज इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर रिटेल भागीदारांकडून हे डिव्हाइस ऑफलाइन खरेदी करू शकते.

किंमत12+256जीबी व्हेरिएंट व्हेरिएंट | रु. 69,999 16+512जीबी व्हेरिएंट | रु. 76,999 24+1टीबी व्हेरिएंट | रु. 89,999
बँक ऑफर्स आणि ई.एम.आय चे पर्याय*आय.सी.आय.सी.आय बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांना वनप्लस 13 वर रु. 5,000 चा इन्स्टंट बँक डिस्काउंटचा लाभ उचलता येईल.   ग्राहकांना बजाज फिनसर्व्ह आणि आघाडीच्या क्रेडिट कार्डवर 24 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ई.एम.आय चा लाभ उचलता येईल.
खुल्या विक्रीत खास (ओपन सेल स्पेशल) ऑफर्स*नवीन वनप्लस 13 खरेदी केल्यावर सध्याच्या वनप्लस व इतर स्मार्टफोन वापरकर्त्यांना त्यांचे जुने डिव्हाइस एक्सचेंज केल्यास आकर्षक फायदे मिळू शकतात. उदाहरणार्थ, जर वनप्लस 13 खरेदी करण्याची इच्छा असलेल्या खरेदीदाराने एक्सचेंज किंमत रु. 18,000 असू शकणारा आपला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करण्याचे ठरविले, तर ते रु. 18,000 च्या एक्सचेंज किंमतीचा लाभ घेऊ शकतात आणि यास सध्याच्या ऑफर्स व्यतिरिक्त रु. 7,000 पर्यंतच्या विशेष एक्सचेंज बोनस सोबत जोडू शकतात. यामुळे वनप्लस 13 ची निव्वळ प्रभावी किंमत रु. 39,999 पर्यंत खाली आणू शकतात.
वनप्लस 13 (12+256जीबी) किंमतरु. 69,000
इन्स्टंट बँक डिस्काउंट(-) रु. 5,000
आपल्या जुन्या डिव्हाइसची एक्सचेंज किंमत(-) रु. 18,000
अतिरिक्त एक्सचेंज बोनस(-) रु. 7,000
एक्सचेंजची प्रभावी किंमतरु. 39,999
अतिरिक्त ऑफर्स*विनामूल्य 180-दिवसांचा फोन बदलण्याचा प्लॅन जो असंभवनीय परिस्थितीमध्ये नवीन वनप्लस 13 मध्ये हार्डवेअरची समस्या दिसून आली तर खरेदी केल्याच्या तारखेनंतर पहिल्या 180 दिवसांच्या आत विनामूल्य फोन बदलून देणार आहेप्रोजेक्ट स्टारलाइटचा एक भाग म्हणून ग्रीन लाइन चिंता-मुक्त समाधान जे ग्रीन लाइनची समस्या असलेल्या कोणत्याही फोनसाठी विनामूल्य लाइफटाइम वॉरंटी प्रदान करतेदोन मोफत एअरपोर्ट लाउंज मध्ये प्रवेश 24 महिन्यांच्या नो-कॉस्ट ई.एम.आय सोबत फक्त 65% किंमत भरून ग्राहक वनप्लस 13 चे मालक होऊ शकतात. आय.सी.आय.सी.आय बँक क्रेडिट कार्ड वापरुन  OnePlus.in आणि ऑफलाइन स्टोअर्स मधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी लागू असलेल्या ईझी अपग्रेड्स प्रोग्राम द्वारे 35% खात्रीशीर बायबॅकची हमी यामुळे मिळते. 16जीबी/512जीबी आणि 24जीबी/1टीबी व्हेरिएंट्स साठी निवडक कंपन्यांच्या कॉर्पोरेट वापरकर्त्यांना कॉर्पोरेट एम्प्लॉई प्रोग्राम अंतर्गत OnePlus.in वर अनुक्रमे रु. 3750 आणि रु. 4500 चे अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकते. जिओ प्रीपेड वापरकर्त्यांना सहा महिन्यांसाठी 10ओटीटी ॲप्सचा विनामूल्य प्रीमियम ॲक्सेस मागता येईल.  

*टीआणिशर्तीलागू

वनप्लस 13

वनप्लस 13 हा स्नॅपड्रॅगनच्या आजवरच्या सर्वात प्रगत मोबाइल प्लॅटफॉर्म म्हणजेच अविश्वसनीय क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट वर चालतो आणि त्यात 24जीबी पर्यंत रॅम आहे आणि यामुळे अतिशय जलद कार्यक्षमता सुनिश्चित केली जाते. यात जागतिक स्तरावर कोणत्याही वनप्लस स्मार्टफोनसाठी पहिलीच अशी 6,000 एमएएच क्षमतेची सिलिकॉन नॅनोस्टॅक बॅटरी देण्यात आली आहे. अगदी पातळ आणि आरामदायक असे याचे डिझाइन असून संपूर्ण दिवस बॅटरी चालेल याची सुनिश्चिती केली गेली आहे. हे नवीन फ्लॅगशिप डिव्हाइस आयपी68 आणि आयपी69 रेटिंग ने प्रमाणित आहे आणि यामुळे अत्यंत टिकाऊ डिव्हाइस शोधत असलेल्या वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम आहे.

फोनमध्ये दमदार ट्रिपल कॅमेरा सिस्टीम देण्यात आली आहे ज्याचा विकास हॅसेलब्लाडच्या सहकार्याने केला गेला आहे. यात 50एमपी सोनी एलवायटी-808 मुख्य कॅमेरा, 50एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि एआय टेलिफोटो वैशिष्ट्यामुळे 10एक्स झूमपेक्षा जास्त झूम करू शकणारा 50एमपी 3एक्स ट्रायप्रिझम टेलिफोटो कॅमेरा आहे.  याव्यतिरिक्त, वनप्लस 13 वेगवान गोष्टी टिपण्यासाठी इष्टतम करण्यात आला आहे कारण यात ड्युअल एक्सपोजर अल्गोरिदम, क्लिअर बर्स्ट आणि ॲक्शन मोड सारखी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. यामुळे वेगवान गतीने चालणाऱ्या गाड्या, लोकं किंवा पाळीव प्राणी यांचे छायाचित्रण करताना खात्रीशीर उत्कृष्ट परिणाम पहायला मिळतात.

ऑक्सिजनओएस 15 ही वनप्लसच्या ऑपरेटिंग सिस्टीमची नवीनतम आवृत्ती आहे आणि ही अधिक स्मार्ट, सहजसोपे आणि हलके वापरकर्ता अनुभव प्रदान करण्याचे वचन देत आहे. यात एआय-संचालित साधनांचा समावेश आहे, जसे की, सर्कल टू सर्च, इंटेलिजंट सर्च आणि एआय ट्रान्सलेशन. एआय अनब्लर, एआय डिटेल बूस्ट आणि एआय रिफ्लेक्शन इरेजर सारख्या वैशिष्ट्यांमुळे वनप्लस 13 मध्ये उत्तम प्रतीचे फोटो काढायला मिळतात.

स्मार्टफोनमध्ये 2के 120 हर्ट्झ प्रोएक्सडीआर डिस्प्ले सुद्धा देण्यात आलेला आहे. हा डिस्प्लेमेट ए++ रेटिंग प्राप्त करणारा जगातील पहिला फोन आहे. हे ॲक्वा टच 2.0 देखील सादर करते, ज्यामुळे बोटं तेलकट असताना किंवा मेंढीचे कातडे किंवा लोकरी हातमोजे घातलेले असताना सुद्धा स्क्रीन स्पर्शांना अचूक प्रतिसाद देते.

वनप्लस बड्स प्रो 3 साठी खुली विक्री किंमत आणि ऑफर्स

वनप्लस बड्स प्रो 3 रु. 11,999 पासून सुरू होणार असून दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून खुल्या विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि तो पूर्णपणे नवीन सफायर ब्लू प्रकारात उपलब्ध असेल. लाँच ऑफर म्हणून, ग्राहकांना दिनांक 26 जानेवारी 2025 पर्यंत रु. 1,000 च्या तात्पुरत्या कमी किंमतीचा आनंद उचलता येईल. आय.सी.आय.सी.आय बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांना अतिरिक्त रु. 1,000 चे इन्स्टंट बँक डिस्काउंट मिळणार असल्याने वनप्लस बड्स प्रो 3 ची निव्वळ प्रभावी किंमत रु. 9,999 पर्यंत कमी होते.

ई.एम.आय चा पर्याय पाहत असलेल्या ग्राहकांना 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ई.एम.आय चा लाभ घेता येईल. वनप्लस कम्युनिटीला OnePlus.in, वनप्लस स्टोअर ॲप, Amazon.in, फ्लिपकार्ट, मिंत्रा वर ऑनलाइन आणि वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्सच्या माध्यमातून ऑफलाइन खरेदी करता येईल.

वनप्लस बड्स प्रो 3

वनप्लस बड्स प्रो 3 आता नवीन सफायर ब्लू रंगाच्या प्रकारात उपलब्ध असून प्रीमियम सौंदर्य देऊन फ्लॅगशिप सीरिजला अगदी पूरक केले गेले आहे.

वनप्लस बड्स प्रो 3 स्टेडी कनेक्टसह येतो. यामुळे विमानतळ आणि रेल्वे स्थानकांसारख्या उच्च व्यत्यय जाणवणाऱ्या भागात सुद्धा ब्लूटूथ कनेक्शनची शक्ती आणि विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात वाढवते. भारतात 360 मीटर अंतरापर्यंतच्या मोकळ्या जागांमध्ये वापरकर्त्यांना कनेक्ट करून राहता येईल. याव्यतिरिक्त, बड्स प्रो 3 ने आता वनप्लस 13 सीरिजसह जोडल्यावर एआय ट्रान्सलेशन वैशिष्ट्यास समर्थन दिल्याने समोरासमोर संभाषण अधिक सोयीस्कर केले गेले आहे. दोन भाषांमध्ये संभाषण चालू असताना वापरकर्त्यांना बड्स प्रो 3 वापरून त्यांच्या पसंतीच्या भाषेत भाषांतर ऐकता येणार आहे. त्याचवेळेस त्यांच्या फोनच्या ॲपवर संभाषण भागीदारांना त्यांच्या भाषेत भाषांतर पाहता येणार आहे. नवीनतम ओटीए अपडेट ब्लूटूथ रेंज आणि कनेक्शन स्थिरता देखील सुधारते. यामुळे निश्चितच एक सुलभ अनुभव मिळतो आणि हे खास करून सुसंगत वनप्लस फोन्स सोबत वापरल्यावर अनुभवायला मिळते.

सफायर ब्लू बड्स प्रो 3 मध्ये फास्ट चार्जिंग, अतिशय पातळ चामड्यासारखी दिसणारी केस आणि सुविधापूर्ण (एर्गोनॉमिक) डिझाइन देण्यात आलेले आहे आणि हे गुगल स्पेसियल ऑडिओला देखील समर्थन देते ज्यामुळे समृद्ध ऑडिओ अनुभव लाभतो. यात सहजस्फूर्त (इंट्यूटिव्ह) स्पर्श नियंत्रणे दिल्याने आरामात आवाज कमी जास्त करता येतो, प्लेबॅक हाताळता येते आणि मागचा आवाज काढून टाकणे (नॉइझ कॅन्सलेशन) आणि पारदर्शकता मोड दरम्यान स्विच करता येते, ज्यामुळे संपूर्ण ऑडिओ अनुभव लाभतो.

वनप्लसच्या विंटर लाँच इव्हेंटमध्ये जारी करण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची अधिक माहिती http://www.oneplus.com येथे उपलब्ध आहे.

Leave a Comment