स्थिरतेच्‍या माध्‍यमातून प्रगतीकडे वाटचाल: मसाई पदवीधरांच्‍या यशोगाथा

Admin

Masai मसाई

मसाई स्कूल या कौशल्य व संधी यांमध्ये दुवा साधून देणाऱ्या प्लॅटफॉर्मला भारतभरातील ५०००हून विद्यार्थ्यांची स्वप्ने साध्य करून देण्यात यश मिळाले आहे.

निष्पत्तीवर आधारित करिअर इन्स्टिट्यूट म्हणून काम करणाऱ्या मसाई स्कूलने १००हून अधिक बॅचेसना प्रशिक्षण दिले आहे आणि ६,००० नवीन नोंदण्यांसह आपली व्याप्ती गेल्या अनेक वर्षांत वाढवली आहे.

या महिन्यात पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या या कंपनीने शिक्षण व्यवस्था निष्पत्तीकेंद्री करून भारतातील मनुष्यबळातील संभाव्यता खुल्या करण्याचे आपले एकमेव उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

ओंकार पासलकर यांनी महाराष्‍ट्रातील पुणे येथून आपल्‍या करिअरला सुरूवात केली, जेथे त्‍यांनी मराठी माध्‍यमाच्‍या शाळेमधून सुरूवातीचे शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षणामध्‍ये उत्तम कामगिरी केल्‍यानंतर देखील त्‍यांना इंग्रजी संभाषण क्षमतेच्‍या अभावामुळे अनेक अडथळ्यांचा, तसेच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

डिप्‍लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक टेलिकम्‍युनिकेशनमध्‍ये शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर ओंकार यांना त्‍यांच्‍या इंजीनिअरिंग शिक्षणासाठी नोकरी मिळवण्‍यास संघर्ष करावा लागला आणि स्‍टुडण्‍ट लोनचा भार पडला.

पहिल्‍यांदा मसाई स्‍कूलबाबत समजल्‍यानंतर त्‍यांच्‍या मनात अभ्‍यासक्रमाबाबत शंका होती. त्‍यांनी मसाईचा कठोर अभ्‍यासक्रम स्‍वीकारला, जो त्‍यांच्‍या शंकांना झुगारून टेक्निकल क्षमता, इंग्रजीमध्‍ये फ्लूएन्‍सी आणि सॉफ्ट स्किल्सवर लक्ष केंद्रित करतो.

ओंकार त्‍यांच्‍या प्रकल्‍प सबमिशनमध्‍ये वरचढ ठरले आणि बूटकॅम्‍पच्‍या क्रांतिकारी दृष्टीकोनामुळे पाइन लॅब्‍समध्‍ये SDE1 म्‍हणून नोकरी मिळाली.

ओंकार म्‍हणाले, ”मराठी माध्‍यमाच्‍या शाळेमधून शिक्षण झाले असल्‍यामुळे मी टेक विश्‍वात यशस्‍वी ठरेन असा कधीच विचार केला नव्‍हता. पण, मसाईने मला टेकमध्‍ये भविष्‍य घडवण्‍यासाठी आवश्‍यक कौशल्‍ये आणि मानसिकता दिली, जे मला अशक्‍य वाटत होते.”

महाराष्‍ट्रातील पुण्‍याचे निवासी योगेश जगताप यांनी मेकॅनिकल इंजीनिअर म्‍हणून आपल्‍या व्‍यावसायिक प्रवासाला सुरूवात केली. पण, कामामध्‍ये स्थिर असताना देखील योगेश असमाधानी होते आणि त्‍यांच्‍या मनात करिअर मार्गाबाबत शंका निर्माण होऊ लागली. एका मित्राने त्‍यांना मसाई स्‍कूलबाबत सांगितले की त्‍याला अधिक अर्थपूर्ण करिअरसाठी मसाईने संभाव्‍य मार्ग दाखवला.   

योगेश यांनी आत्‍मविश्‍वासासह झेप घेतली आणि मसाईमध्‍ये अर्ज केला. त्‍याबाबत अनेक अनिश्चितता होती आणि त्‍यांचे कुटुंब या निर्णयाबाबत संकोच करत होते. मसाईमध्‍ये त्‍यांना इंग्रजी संभाषणामध्‍ये निपुण व गुंतागुंतीची डेटा संरचना अशा नवीन आव्‍हानांचा सामना करावा लागला, पण अध्‍यापन पद्धतींनी या अडथळ्यांना अध्‍ययन संधींमध्‍ये बदलले.

नवीन आत्‍मविश्‍वास आणि अध्‍ययनाप्रती आवडीसह योगेश यांनी अॅब्‍सोल्‍यूटस्क्रिप्‍ट येथे बॅकएण्‍ड डेव्‍हलपर म्‍हणून नोकरी मिळवली आणि नवीन करिअर घडवायच्‍या दिशेने पाऊल उचचले.

योगेश म्‍हणाले, ”मला मेकॅनिकल इंजीनिअरिंगमध्‍ये अडकल्‍यासारखे वाटले, पण मसाईने टेकमधील नवीन संधींच्‍या पूर्णत: नवीन विश्‍वाची ओळख करून दिली. शेवटी, मला करिअर मिळाले, ज्‍याचा आनंद होत आहे.” 

महाराष्‍ट्रातील पुणे येथे जन्‍मलेल्‍या व मोठ्या झालेल्‍या हर्षदा रौंदाळ यांचे डिजिटल विश्‍वात निपुण कामगिरी करण्‍याचे स्‍वप्‍न होते. कम्‍प्‍युटर सायन्‍समध्‍ये पदवी शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर महामारीमुळे त्‍यांच्‍या योजनांमध्‍ये अडथळे आले. त्‍यांना योग्‍य संधींचा शोध घेण्‍यास संघर्ष करावा लागला.

डेटा अॅनालिस्‍ट म्‍हणून नोकरी मिळाली असताना देखील हर्षदा यांचे मोठे यश गाठण्‍याचे स्‍वप्‍न होते, ज्‍यामुळे त्‍यांनी आवडणाऱ्या करिअरचा शोध घेण्‍यास सुरूवात केली. 

त्‍यांना मसाई स्‍कूलबाबत समजले आणि नोकरी सोडण्‍याची जोखीम पत्‍करत त्‍यांनी वेब डेव्‍हपलमेंटमध्‍ये करिअर घडवण्‍यासाठी प्रोग्राममध्‍ये नोंदणी केली. हर्षदा यांच्‍या प्रवासामध्‍ये त्‍यांच्‍या स्‍वत:चे संघर्ष होते, जेथे त्‍यांना मसाईच्‍या कठोर अभ्‍यासक्रमाचा अभ्‍यास करण्‍यासोबत नोकरीसंदर्भात धावपळ करावी लागली.

यादरम्‍यान त्‍यांना त्‍यांच्‍या मेन्‍टोर ईशा कटारिया यांच्‍याकडून सतत पाठिंबा मिळाला, तसेच मसाईच्‍या प्रखर प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातून स्थिरता मिळाली. हर्षदा यांना इंडीव्‍ह (Indivv) येथे सॉफ्टवेअर इंजीनिअरिंग म्‍हणून नोकरी मिळाली. हर्षदा म्‍हणाल्‍या, ”मला शिकायला मिळाले की, अडथळे हे यशाच्‍या दिशेने घेऊन जाणारे आधारस्‍तंभ आहेत.

मसाईचे मेन्‍टोरशीप आणि प्रशिक्षणाने मला अपयशांवर मात करण्‍यास आणि मला आवड असलेल्‍या क्षेत्रात प्रवेश करण्‍यास मदत केली. प्रत्‍येक अपयशाने मला माझ्या इच्छित पदापर्यंत पोहोचण्‍यास प्रेरित केले.”  

मसाई स्कूलचे सीईओ व सहसंस्थापक प्रतीक शुक्ला मसाई स्कूलबाबत म्हणाले, “विद्यार्थ्यांची कौशल्ये अधिक निपुण करणारा तसेच त्यांच्यातील संभाव्यता खुल्या करणारा प्लॅटफॉर्म खात्रीशीर निष्पत्तीसह देण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे.

आम्ही नवीन योजना आणण्यासाठी तसेच प्रस्थापित फर्म्ससोबत सहयोग करून टीम्सचा विस्तार करण्यासाठी समर्पितपणे काम करत आहोत आणि त्यायोगे विद्यार्थ्यांसाठी संधी वाढवत आहोत.

शैक्षणिक परिसंस्थेचा प्रगतीशीलरित्या कायापालट करण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे.” उद्योगक्षेत्रातील प्रमुख फर्म्ससोबत काम करत राहिल्यामुळे मसाई स्कूलने तीन आयआयटी फर्म्ससोबत सहयोग करार केले आहेत.

आयआयटी गुवाहाटी, आयआयटी मंडी आणि आयआयटी रोपर तसेच राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) यांच्यासोबत कंपनीचे करार आहेत. त्यामुळे अडथळे दूर होत आहेत आणि शक्यतांच्या मर्यादा विस्तारल्या जात आहेत.

Leave a Comment