आर्थिक वर्ष 2025 मध्ये  ₹2,000 कोटींच्या विक्रीचे मेडिकाबाजारचे उद्दिष्ट, वृद्धी आणि नफा यावर लक्ष केंद्रित

Admin

मेडिकाबाजार

मेडिकाबाजार ही भारतातील आघाडीची B2B हेल्थकेअर खरेदी आणि पुरवठा साखळी सोल्युशन्स प्रदाता कंपनी आहे. कंपनी सुधारित मेडिकाबाजार 2.0 धोरणांतर्गत महत्त्वाकांक्षी लक्ष्ये सेट करत आहे. कंपनी जलद वाढ आणि नफ्याच्या समतोलावर लक्ष केंद्रित करीत आहे आर्थिक वर्ष 2025 च्या अखेरीस ₹2,000 कोटी वार्षिक आवर्ती महसूल (ARR) साध्य करण्याच्या मार्गावर आहे.

मेडिकाबाजार 25,000 पेक्षा जास्त एसकेयूसह डिजिटल मार्केटप्लेस ऑफर करते, जे 900 हून अधिक शहरांमध्ये विस्तारलेले आहे. मोठ्या हॉस्पिटल चेनसाठी तयार केलेल्या टेक-चालित सप्लाय चेन मॅनेजमेंट सोल्युशनसह, उच्च श्रेणीचे वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपभोग्य वस्तूंवर लक्ष केंद्रित करणारी स्थानिक टीम 600 जिल्ह्यांमध्ये काम करते.

कंपनीचे दुबई कार्यालय आंतरराष्ट्रीय विस्ताराला आणखी समर्थन देते, ज्यामुळे भारतीय वैद्यकीय उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचू शकतात. 10-15 मोठ्या आणि मध्यम रुग्णालयांसाठी खरेदी भागीदार म्हणून, कंपनीची मजबूत पुरवठा साखळी शहरातील प्रमुख रुग्णालयांमध्ये काही तासांत जलद वितरण सुनिश्चित करते.

मेडिकाबाजारचे ग्रुप सीईओ श्री. दिनेश लोढा यांच्या म्हणण्यानुसार, 12 अब्ज डॉलर मूल्याची वैद्यकीय पुरवठ्याची भारतीय बाजारपेठ आणि $500 अब्ज किमतीची जागतिक संधी, आम्ही लक्षणीय वाढीच्या संधी मिळविण्यासाठी योग्य स्थितीत आहोत. मेडिकाबाजार 2.0 सह आमचे प्राथमिक लक्ष हे डिजिटल प्लॅटफॉर्म व्यवसायावर वाढीव भर देऊन वाढ आणि नफा या दोन्हींवर आहे.

आंतरराष्ट्रीय विस्तार आणि वैद्यकीय उपभोग्य वस्तू व इन विट्रो डायग्नोस्टिक्स (IVD) विभागांमध्ये खासगी लेबल लाँच करणे यासह धोरणात्मक उपक्रमांद्वारे कंपनी 30-40% वाढीचे लक्ष्य ठेवत आहे. कंपनी नेफ्रोलॉजी आणि आयव्हीएफ सारख्या उच्च नफा क्षेत्रातही विस्तार करत आहे.

या व्यतिरिक्त, मेडिकाबाजारचे उद्दिष्ट मोठ्या ओईएम भागीदारांना सोबत घेण्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून ते टियर 2 आणि 3 शहरांमध्ये पुरवठा साखळी पोहोचेल, जेथे अॅक्सेस मिळविणे एक आव्हान आहे. मजबूत डिजिटल आणि ऑन-ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चरसह, मेडिकाबाजार दुर्गम आणि सेवा नसलेल्या प्रदेशातील रुग्णालयांच्या लॉजिस्टिक मागण्या पूर्ण करण्यासाठी सुस्थितीत आहे.

अलीकडेच, कंपनीने भारतातील सर्वात मोठ्या निदान सेवा प्रदात्यांपैकी एक असलेल्या कृष्ण डायग्नोस्टिक्स सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे टियर 2 आणि 3 शहरांमध्ये परवडणाऱ्या डायग्नोस्टिक्सचा प्रवेश वाढला आहे. या भागीदारीद्वारे, मेडिकाबाजार भारतातील 30 पेक्षा जास्त निदान केंद्रांना उच्च दर्जाची वैद्यकीय उपकरणे आणि तंत्रज्ञान पुरवेल, ज्यामुळे किफायतशीर आरोग्यसेवा उपाय उपलब्ध होतील.

Leave a Comment