मॅक्डोनाल्ड्स इंडियाचे बारामतीत नवीन ड्राईव्ह-थ्रू रेस्टॉरंट सुरु

Admin

मॅक्डोनाल्ड्स

मॅक्डोनाल्ड्स इंडियाचे (पश्चिम आणि दक्षिण) संचालन करणाऱ्या वेस्टलाईफ फूडवर्ल्ड लिमिटेडने आपल्या विस्तारासाठी बारामती या सदाबहार शहराची निवड केली आहे. यामुळे मॅक्डोनाल्ड्स रेस्टोरंटचे बारामतीत शहरात आगमन झाले असून या शहरासाठी हा एक मैलाचा दगड आहे. हे रेस्टॉरंट आधुनिक असे ड्राईव्ह थ्रू (डीटी) रेस्टॉरंट आहे. या ब्रँडच्या महाराष्ट्रभरातील १८० तर पश्चिम व दक्षिण भारतातील ४०० ठिकाणी असलेल्या रेस्टॉरंट्सच्या वाढत्या नेटवर्कमध्ये भर पडली आहे.

भविष्यातील अनुभव (एक्स्पीरियंस ऑफ दि फ्यूचर – ईओटीएफ) असे हे रेस्टॉरंट भिगवण रस्त्यावरील मोक्याच्या जागी आहे. यात शहर व परिसरातील ४५ जणांना रोजगार मिळाला आहे. हे डीटी स्टोअर १४,००० चौ. फुटांवर पसरले असून यात १३० अभ्यागतांसाठी आरामदायक बसण्याची तसेच सुविधाजनक कार पार्किंगची सुविधा आहे.

या रेस्टॉरंटमध्ये कंटेपररी भोजनाचा अनुभव मिळतो आणि डिजिटल सेल्फ ऑर्डरिंग किऑस्क , एक खास बच्चे कंपनी साठी वाढदिवस पार्टीचा एरिया आणि एक मॅककॅफे ( कॉफी पेय)हे त्याचे आकर्षण आहे. अभ्यागत येथे आपल्या आवडत्या मॅक्डोनाल्ड्स मेनूचा आनंद घेऊ शकतात, यामध्ये मॅकआलू टिक्की, मॅकवेजी, महाराजा मॅक आणि मॅकक्रिस्पी रेंज या सारक्या बहु विविध बर्गर्स चा समावेश आहे. या रेस्टॉरंटमध्ये मजेदार डेझर्ट आणि मिठाईच्या पदार्थही उपलब्ध आहेत, तर मॅककॅफेमध्ये १०० टक्के रेनफॉरेस्ट अलायन्स प्रमाणित अरेबिका बियांपासून बनविलेले हातांनी बनविलेले प्रीमियम पेये उपलब्ध आहेत.

ड्राइव्ह-थ्रूमध्ये ग्राहकांना आपल्या वाहनांमधून बाहेर न पडता ऑर्डर्स प्राप्त करण्यासाठी १२० सेकंदांमध्ये जलद सेवेची हमी मॅकडोनाल्ड्स देते. ब्रँडच्या जलद सेवेच्या कटिबद्धतेचा भाग म्हणून, ग्राहकांना ऑर्डर मिळण्यास २ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला तर मोफत रेग्युलर फ्राईज दिले जातात.

मॅकडोनाल्ड्स इंडियाचे (पश्चिम आणि दक्षिण) व्यवसाय विकास विभागाचे वरिष्ठ संचालक संकेत सतोसे म्हणाले, बारामतीतील आमच्या रेस्टॉरंटचे उद्घाटन हा महाराष्ट्रातील आमच्या विस्ताराच्या धोरणातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. स्थानिक अर्थव्यवस्था आणि सामुदायिक सहभागासाठी योगदान देत असतानाच मॅकडोनाल्डचा अनुभव आमच्या ग्राहकांच्या जवळ आणण्याच्या आमच्या कटिबद्धतेचे हे नवीन स्थान प्रतीक आहे. जागतिक पातळीवर मॅकडोनाल्ड्सची ज्यासाठी ओळख आहे, त्याच आनंददायी जेवणाच्या अनुभवासह बारामतीकर आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना सेवा देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

या रेस्टॉरंटमध्ये मॅकडोनाल्ड्स इंडियाच्या काटेकोर गोल्डन गॅरंटी प्रोग्रामचे पालन केले जाते. यात ४२ सर्वसमावेशक सुरक्षा आणि स्वच्छता व निर्भोळ अन्न हे प्रोटोकॉल लागू करण्यात येते, जेणेकरुन ग्राहक आणि कर्मचारी दोघांनाही सुरक्षित भोजनाच्या वातावरणाची हमी मिळेल. भिगवण रोडवरील मोक्याच्या ठिकाणी हे रेस्टॉरंट स्थानिकांना आणि प्रवाशांना सेवा देण्यासाठी असून जेवणाचे सोयीस्कर ठिकाण आहे. येथे आधुनिक सुविधांसह मॅकडोनाल्ड्सच्या गुणवत्तेचा मिलाफ झाला आहे.

स्वादिष्ट अनुभवाचे-उत्तम क्षण सर्वांसाठी सुलभ बनविण्याच्या आपल्या मिशनवर मॅकडोनाल्ड्स इंडिया ठाम आहे. ‘रिअल फूड रिअल गुड’ यावर कंपनीचा खरोखर विश्वास असून आपल्या निवडक मेनू सह, कोणत्याही पदार्थात कृत्रिम रंग नसतील, कृत्रिम स्वाद नसतील, कृत्रिम प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि चिकनच्या पदार्थांमध्ये एमएसजी अजिनो मोटो असणार नाही, याची ती काळजी घेते. मॅकडोनाल्ड्स इंडिया आपल्या मौल्यवान ग्राहकांसाठी अतुलनीय गुणवत्ता आणि पारदर्शकतेची हमी देत जागतिक पातळीवरील नावाजलेल्या पुरवठादारांकडून स्थानिक पातळीवर प्राप्त केलेले ताजे साहित्य वापरण्यासाठी जवळपास तीन दशकांपासून कटिबद्ध आहे.

Leave a Comment