जगातील सर्वात मोठ्या सोने आणि हिरेजडित दागिन्यांच्या किरकोळ विक्रेत्या साखळ्यांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अॅण्ड डायमंड्सने, ‘स्वर्णकृती’ हे त्यांच्या नवीन खास दागिन्यांच्या संग्रहणाच्या प्रस्तुतीची सोमवारी घोषणा केली. अत्यंत कुशल हस्तकारागिरीद्वारे रचित हे अभिजात संग्रहण म्हणजे, भारताच्या समृद्ध वारशाचे समकालीन रचनांसह सुंदरपणे मेळ घालणाऱ्या उत्कृष्ट सोन्याच्या दागिन्यांची अनोख्या मालिकेचे दर्शन घ़डविते.
स्वर्णकृती ही कालातीत लालित्यासह, धीरोदात्त सामर्थ्य धारण करणाऱ्या महिलांच्या शक्तीचा आदर आहे आधुनिकतेसह परंपरेचा समतोल या दागिन्यांनी साधला आहे. संग्रहणातील प्रत्येक दागिन्याचा नग बारकाईने केलेल्या हस्तकलेतून साकारलेला आहे, ज्यामध्ये गुंतागुंतीचे नक्षीकाम, नाजूक तारकशी आणि भारताचा वारसा असणारे अलंकारिक साज समाविष्ट आहेत.
या प्रस्तुतीबद्दल भाष्य करताना, मलाबार समूहाचे अध्यक्ष, एमपी अहमद म्हणाले, “स्वर्णकृतीसह, आम्ही केवळ हस्तकारागिरीद्वारे रचित सोन्याच्या दागिन्यांचे सौंदर्यच नव्हे, तर संग्रहणातील दागिन्याचा प्रत्येक नग हा वारसा आणि अभिजातता देखील साजरी करतो. मलाबार गोल्ड अॅण्ड डायमंड्सवर विश्वास कायम ठेवणाऱ्या ग्राहकांना आम्ही दिलेले हे गुणवत्ता, पारदर्शकता आणि अत्युत्तम मूल्याचे वचन आहे.”
स्वर्णकृती संग्रहणाला मलाबार गोल्ड अॅण्ड डायमंड्सच्या ग्राहक-प्रथम या महत्त्वपूर्ण धोरणाचेही पाठबळ आहे. ‘मलबार प्रॉमिसेस’ म्हणून प्रचलित या धोरणांतून, प्रत्येक खरेदीसाठी गुणवत्ता, पारदर्शकता आणि मूल्य सुनिश्चित केले गेले आहे. संपूर्ण पारदर्शकतेला प्रमाण मानणाऱ्या या उपक्रमात प्रत्येक दागिन्यासाठी तपशीलवार बीजक (इनव्हॉइस) आणि किंमत पट्टी प्रदान करते, दागिन्याचे एकूण वजन, खड्यांचे वजन, निव्वळ वजन, खड्यांचे शुल्क आणि घडणावळ खर्च असा परिपूर्ण तपशील त्यावर नमूद असतो. ही स्पष्टता विश्वास निर्माण करते आणि ग्राहकांना आत्मविश्वासपूर्ण निवड करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीसह सक्षम करते.
प्रसार मोहिमेची दुवा: https://www.youtube.com/watch?v=PdJdkoXHN-I
इतर ग्राहक-केंद्रित धोरणांमध्ये जगभरातील सर्व मलाबार शोरूममध्ये आजीवन देखभाल, सोने आणि डायमंड एक्सचेंजवर १०० टक्के मूल्य आणि सर्व सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर फेर-खरेदीच्या हमीचा समावेश आहे. २८ सूत्री कठोर अंतर्गत गुणवत्ता तपासणी आणि आयजीआय- जीआयए प्रमाणपत्र घेऊन, दागिन्यातील प्रत्येक हिरा चाचणीने प्रमाणित आहे. अतिरिक्त मनःशांतीसाठी, मलाबार घरफोडी, आग किंवा खंडणीमुळे झालेल्या नुकसानीविरूद्ध खरेदी केलेल्या दागिन्यांना एक वर्षासाठी मोफत विम्याचे कवच प्रदान करते.
मलाबार गोल्ड अॅण्ड डायमंड्स देखील शुद्धतेची हमी देणारे हॉलमार्क प्रमाणपत्रासह १०० टक्के एचयूआयडी-अनुरूप सोन्यासाठी वचनबद्ध आहे. याव्यतिरिक्त, ब्रॅण्डकडून जबाबदार स्रोतातून मिळविलेल्या उत्पादनांवर भर दिला जातो आणि वाजवी किंमत धोरणाचे काटेकोर पालन केले जाते. प्रत्येक दागिना गुणवत्ता आणि कारागिरीला पुरेपूर प्रतिबिंबित करतानाच, घडणावळ शुल्क वाजवी राहिल हेही पाहिले जाते.