जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात विश्वासार्ह सोने आणि हिरेजडित दागिन्यांच्या किरकोळ विक्रेत्यांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने, आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळांनी प्रमाणित केलेल्या नैसर्गिक हिऱ्यांचा एक उत्कृष्ट संग्रह ‘सॉलिटेअर वन’च्या प्रस्तुतीची आज अभिमानपूर्वक घोषणा केली. बॉलीवूड तारका आणि ब्रँड ॲम्बॅसेडर आलिया भट्टसह या नवप्रस्तुतीसाठी विशेष प्रसारमोहिम आखण्यात आली आहे.
ज्यात अनमोल हिऱ्याचे कालातीत आकर्षण साजरे करण्यासह, जीवनातील मौल्यवान क्षणांना प्रकाशित करण्यारी क्षमता प्रदर्शित करण्यासह, या चमकदार रत्नांबद्दल प्रत्येक स्त्रीच्या मनांत असलेले अमीट प्रेम दाखविले गेले आहे.
मोहिमेची सुरुवात आलिया भट्ट अभिनीत एका मोहक चित्रपटाने झाली असून, ज्यात तीन सुंदर गुंफलेल्या प्रेमकथा जिवंत केल्या गेल्या आहेत. दृश्यात्मक विस्मयकारक अशा कथांमध्ये व्यक्तीचे तिच्या जीवनसंगिनीसह, सोलिटियर्स हिऱ्यांत गुंफलेल्या भावनिक जवळीकीसह सखोल नातेसंबंधाच्या प्रवासाला दर्शविले गेले आहे. हे कालातीत दागिने जीवनातील सर्वात विलक्षण क्षणांचे मोहमयी भाग कसे बनतात यावर त्यात भर दिला गेला आहे.
आलिया भट्टशी संलग्न असलेली अभिजातता आणि करिष्मा या मोहिमेला इच्छित भावनेची उब देणारा ठरतोच, परंतु “द वन” अर्थात हेच ते अद्वितीय शोधल्याच्या आनंदाला मूर्त रूपही देते. या मोहिमेची संकल्पना डीडीबी मुद्राकडून केली गेली आहे.
मलाबार समूहाचे अध्यक्ष, एमपी अहमद म्हणाले, “‘सॉलिटेअर वन’च्या प्रस्तुतीसह, आम्ही केवळ नवीन संग्रहाच्या सादरीकरणापेक्षा बऱ्याच काही गोष्टींची सज्जता केली आहे. हा कालातीत सौंदर्य आणि प्रेमाच्या सामर्थ्याचा अजो़ड उत्सव आहे. या निमित्ताने संकल्पित मोहिमेमध्ये स्त्रियांच्या सॉलिटेअर्स हिऱ्यांशी खोल जुळलेल्या भावनिक संबंधांना दर्शविले गेले आहे, जे लालित्यासह शाश्वतता अशा दोन्ही क्षणांचे प्रतीक बनले आहे.
मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही हर्षोत्साहित झालो आहोत आणि हे दागिने परिधान करणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ताकद, लावण्य आणि व्यक्तित्त्वाला दर्शवणारे हे अमोघ ऐवज प्रस्तुत करताना आम्हाला अभिमान वाटतो.”
‘सॉलिटेअर वन’ हे सॉलिटेअर दागिन्यांच्या अनुभवाला पुनर्परिभाषित करण्यासाठी सज्ज झाले आहेत, जे संपूर्ण देशात उपलब्धतेसह, आयुष्यभरासाठी मौल्यवान राहण्याचे वचन देणाऱ्या नैसर्गिक हिऱ्यांच्या उत्कृष्ट श्रेणीला प्रस्तुत करतात. ०.३० कॅरेटपेक्षा जास्त आकाराचा प्रत्येक हिरा आणि दागिन्यांचा प्रत्येक नग द्वि-स्तरीय प्रमाणन प्रक्रियेतून गेलेला असेल, याची खात्री करून आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोच्च गुणवत्ता प्रदान करतो.
भारत, आखाती देश, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह १३ देशांमध्ये ३७० हून अधिक शोरूमच्या जागतिक पदचिन्हांसह – मलाबार गोल्ड अँड डायमंड्स दागिन्यांचा विस्तृत संग्रह, अपवादात्मक गुणवत्ता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यासाठी प्रसिद्ध आहे. २६ देशांमधील सुमारे २२,००० बहुभाषिक कर्मचाऱ्यांच्या समर्पित संघाच्या पाठिंब्याने, या नाममुद्रेने जगभरातील १५ दशलक्षाहून अधिक समाधानी ग्राहकांना सेवा दिली आहे.
मलाबार गोल्ड अँड डायमंड्स त्यांच्या “मलाबार प्रॉमिसेस” द्वारे ग्राहकांचे सर्वतोपरी समाधान करणाऱ्या वचनबद्धतेसाठी प्रसिद्ध आहे, ज्यात तपशीलवार खर्च पारदर्शकपणे नमूद असलेली किंमत-पट्टी, सर्व जागतिक शोरूममध्ये उपलब्ध आजीवन मोफत देखभाल सेवा आणि जुन्या सोन्याचे दागिने आणि हिऱ्यांसाठी १०० टक्के विनिमय मूल्य समाविष्ट आहे.
कंपनी हे सुनिश्चित करते की, तिचे सर्व दागिने १०० टक्के एचयूआय़डी मानकांच्या अनुरूप असतील आणि ग्राहकांना त्यायोगे संपूर्ण पारदर्शकता आणि सत्यतेची खात्री मिळेल. प्रमाणित हिरे गुणवत्ता तपासणीची २८ सूत्री प्रक्रिया पू्र्ण करतात आणि प्रत्येक दागिन्यांची खरेदी एक वर्षाच्या मोफत विस्तारित विम्याच्या संरक्षणासह आणि वॉरंटीच्या पर्यायांसह ग्राहकांकडून केली जाते.
सॉलिटेअर वन त्याच्या नैतिक स्रोतातून पुरवठा झाला असल्याच्या वचनबद्धतेसह, ते जेथून प्राप्त केले ते सत्यापित करणारी पूर्ण साखळीच्या उलगड्यासह, मलाबार वचनांची हमी, २८ सूत्री कठोर गुणवत्ता तपासणी आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणन यासह ग्राहकांपुढे प्रस्तुत झाले आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्स हे सुनिश्चित करते की सर्व सोने आणि हिरे जबाबदारीने अधिकृत पुरवठादारांद्वारे मिळविले जायला हवेत.
शिवाय, मलाबार समूह आरोग्य, गृहनिर्माण, शिक्षण, पर्यावरणीय शाश्वतता, भूकेचे निर्मूलन आणि महिला सशक्तीकरण कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करून, अशा सामाजिक दायीत्व (सीएसआर) उपक्रमांसाठी वार्षिक नफ्यातील ५ टक्के योगदान देतो.