अखंड ध्यानामध्ये स्वतः जगायला शिका – सरश्री

Admin

सरश्री

प्रख्यात अध्यात्मिक गुरु व लेखक सरश्री यांचा “या… ध्यानामध्ये जगायला शिकूया” हा अध्यात्मिक कार्यक्रम सिंहगड रोड येथील मनन आश्रम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी सरश्री यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. आजच्या धावपळीच्या युगात ध्यान करणे किती गरजेचे आहे. याचे त्यांनी महत्त्व पटवून देत त्याच बरोबर ध्यानामध्ये कसे जगायचे याचा त्यांनी उपस्थितांना कानमंत्र दिला.

यावेळी बोलताना सरश्री म्हणाले, की “एखादी गोष्ट मिळवण्यासाठी लोक हजारो तंत्र, मंत्र शिकत असतात, हे करा, ते करा, हे कसे मिळवायचे, ते कसे मिळवायचे याचे मंथन करत बसतात.” सोशल मीडियावर जावून अशा प्रकारचे हजारो व्हिडीओ लोक बघतात. मी कोण आहे. याचा विचार न करता स्वतःला सोशल मीडियावरती शोधत असतात. ज्या ठिकाणी तुम्ही नाहीत. त्या ठिकाणी तुम्ही कसे सापडाल. त्यामुळे आभासी दुनियेत न रमता खऱ्या आयुष्यात आपण सर्वांनी जगायला शिकले पाहिजे.

तुम्ही नसलेल्या गोष्टी बनवण्याचा विचार केलात तर तुम्हाला पूर्णत्व मिळणार नाही. तुम्ही म्हणाला मी एक स्त्री आहे, तर स्त्री हे पूर्ण ज्ञान नाही, तो स्त्री असण्याचा एक भाग आहे. आपण जे काही झालो त्यात फक्त समाधान आहे, तुम्ही जे जीवन जगत आहात ते आता संपून जाईल. तुम्हाला स्वत:ला स्वतःबद्दल जाणून घ्यायचे आहे ? मग ध्यान करताना तुम्ही काय गृहीत धरत आहात, जे तुम्ही गृहीत धरत आहात त्यात समाधान आहे ? ध्यानात बसलेले असताना, तुम्हाला काय वाटत आहे? याचा विचार व्हायला हवा. ध्यानामध्ये आपण जगायला शिकल्याशिवाय आपण जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही.

Leave a Comment