कायलॅक (Kylaq): स्‍कोडा ऑटो इंडियाची आगामी नवीन कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही

Admin

स्‍कोडा
  • आतापर्यंतचे सर्वात मोठे लाँच: स्‍कोडा ऑटो इंडियाने नवीन कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीच्‍या नावाची घोषणा केली आहे, राष्‍ट्रीय ‘नेम युअर स्‍कोडा’ मोहिमेच्‍या माध्‍यमातून अद्वितीय नाव देण्‍यात आले आहे
  • देशव्‍यापी सहभाग: २००,००० हून अधिक प्रवेशिका मिळाल्‍या, ज्‍यामधून स्‍कोडाच्‍या पारंपारिक आयसीई एसयूव्‍ही नामकरण पद्धतीला साजेशा नावाची निवड करण्‍यात आली, जे ‘के’ अक्षरापासून सुरू होत ‘क्‍यू’ अक्षरावर शेवट होते
  • सहभागींसाठी रिवॉर्ड्स: १० फायनालिस्‍ट्समधील सर्वात लोकप्रिय नावाला अव्‍वल स्‍थान मिळाले, जेथे भव्‍य पारितोषिक विजेत्‍याला २०२५ मध्‍ये प्रॉडक्‍शन लाइनमधील पहिली वेईकल मिळाली, तर दहा इतर सहभागींना प्रागसाठी विशेष ट्रिप मिळाली

आजचा क्षण स्‍कोडा ऑटो इंडियासाठी महत्त्वाचा टप्‍पा आहे, जेथे कंपनी आपल्‍या नवीन कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीसह भारतातील नवीन युगाच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. फेब्रुवारीमध्‍ये घोषणा आणि नुकतेच डिझाइनचे टीझर सादर केल्‍यानंतर वेईकलना कल्‍पनात्‍मक देशव्‍यापी मोहिमेच्‍या माध्‍यमातून नाव देण्‍यात आले आहे.

हजारो व्‍यक्‍तींच्‍या आवडीला सादर करणाऱ्या स्‍कोडा ऑटो इंडियाच्‍या नवीन कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीचे नाव असणार आहे कायलॅक (Kylaq), जी तिच्‍या भावी ड्रायव्‍हर्ससोबत अद्वितीय कनेक्‍शनची प्रतीक आहे. 

नावाच्‍या अनावरणाप्रसंगी मत व्‍यक्‍त करत स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्‍हणाले, ”आमची नवीन एसयूव्‍ही कायलॅक (Kylaq) भारतातील नागरिकांसाठी आहे. ते देशातील आमच्‍या आतापर्यंतच्‍या सर्वात मोठ्या लाँचच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍याचा भाग असण्‍याची आमची इच्‍छा होती. ‘नेम युअर स्‍कोडा’ मोहिमेचा सहभागी आणि संभाव्‍य ग्राहकांमध्‍ये अभिमान व आपलेपणाची भावना जागृत करण्‍याचा मनसुबा होता.

२००,००० हून अधिक प्रवेशिकांसह प्रतिसाद अत्‍यंत उत्‍स्‍फूर्त आहे. यामधून भारतातील आमचा वारसा अधिक दृढ होतो आणि लोकांमध्‍ये ब्रँड स्‍कोडाप्रती असलेली खास आवड दिसून येते.

कारची नामकरण प्रक्रिया आमच्‍यासाठी महत्त्वाची आहे. आणि आगामी नवीन कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या व सर्वात मोठ्या सेगमेंटमधील अल्टिमेट टप्‍प्‍याला सादर करते. कायलॅक (Kylaq) सह व्‍यक्‍ती, ग्राहक व चाहत्‍यांनी स्‍वत:हून आमच्‍या नवीन फॅमिली मेम्‍बरला नाव दिले आहे, जेथे ही नवीन एसयूव्‍ही भारत व युरोपमधील टीम्‍सनी संयुक्‍तपणे विकसित केली आहे आणि स्‍थानिक पातळीवर उत्‍पादित केली जाईल.”

लोकांकडून नाव देण्‍यात आले

फेब्रुवारी २०२४ मध्‍ये सुरू करण्‍यात आलेल्‍या ‘नेम युअर स्‍कोडा’ मोहिमेन स्‍कोडाचे वापरकर्ते, ग्राहक आणि चाहत्‍यांना नवीन कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीसाठी नाव देण्‍याकरिता सक्षम केले, जी भारतात व जगभरात २०२५ मध्‍ये लाँच करण्‍यात येणार आहे. ‘नेम युअर स्‍कोडा’ मोहिमेच्‍या माध्‍यमातून सहभागींनी कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीसाठी नाव सुचवले, जे स्‍कोडाच्‍या त्‍यांच्‍या आयसीई एसयूव्‍हींना नाव देण्‍याच्‍या परंपरेशी बांधील राहत एक किंवा दोन शब्‍दांसह ‘के’ अक्षरापासून सुरू होत ‘क्‍यू’ अक्षरावर शेवट होते. या मोहिमेला २४,००० हून अधिक अद्वितीय नावांसह २००,००० हून अधिक प्रवेशिका मिळाल्‍या. 

पुढील टप्‍प्‍यामध्‍ये, सहभागींनी १५ शॉर्टलिस्‍ट करण्‍यात आलेल्‍या नावांमधून त्‍यांच्‍या आवडीच्‍या नावासाठी मत दिले. मिळालेल्‍या मतांच्‍या आकडेवारीनुसार १५ शॉर्टलिस्‍ट करण्‍यात आलेल्‍या नावांमधून स्‍कोडा ऑटो इंडियाने १० नावांची घोषणा केली. या यादीमधून सर्वाधिक मते मिळालेल्‍या आणि सर्व कायदेशीर अनुपालन निकषांची पूर्तता केलेल्‍या विजेत्‍या नावाची नवीन कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीसाठी निवड करण्‍यात आली. कायलॅक (Kylaq) हे नाव क्रिस्‍टलसाठी संस्‍कृत शब्‍दामधून आले आहे, ज्‍यामधून वेईकलची मूळ वैशिष्‍ट्ये दिसून येतात आणि माउंट कैलाश मधून प्रेरित आहे.

Naming film – YouTube link (English): https://youtu.be/MJG9S36OfQg

Naming film – YouTube link (Hindi): https://youtu.be/tVlV_XHgLTs

मत देणारे विजेते आहेत

या नामकरण स्‍पर्धेचा विजेता २०२५ मध्‍ये लाँच करण्‍यात आल्‍यानंतर स्‍कोडा कायलॅक (Kylaq) चा पहिला मालक असेल, ज्‍यामुळे त्‍यांना स्‍वत: नाव दिलेल्‍या वेईकलचे मालक बनण्‍याची अद्वितीय संधी आहे. इतर १० विजेत्‍यांना प्रागमधील स्‍कोडा ऑटोला भेट देण्‍याची, तसेच स्‍कोडा म्‍युझियम व शहराचा दौरा करण्‍याची संधी मिळेल. स्‍कोडा ऑटो इंडियाच्‍या सोशल मीडिया चॅनेल्‍सवर आज दुपारी २ वाजता विजेत्‍यांची घोषणा करण्‍यात येईल.

द कायलॅक (Kylaq)

आता कायलॅक (Kylaq) हे नाव देण्‍यात आलेली आणि ‘एसयूव्‍ही फॉर यू’ म्‍हणून स्थित असलेली नवीन कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही स्‍कोडा ऑटो इंडियाची कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही सेगमेंटमधील पहिलीच वेईकल आहे. ही एसयूव्‍ही कुशक एसयूव्‍ही आणि स्‍लाव्हिया सेदानप्रमाणे एमक्‍यूबी-एओ-इन प्‍लॅटफॉर्मवर आधारित आहे. भारतातील व झेक रिपब्लिकमधील टीम्‍सनी विशेषत: भारतासाठी एमक्‍यूबी-एओ-इन प्‍लॅटफॉर्म डिझाइन केले, जेथे वैविध्‍यता, सुरक्षिता, गतीशीलतेसह स्‍थानिकीकरण, कमी मेन्‍टेनन्‍स खर्च आणि त्रासमुक्‍त मालकीहक्‍क अनुभवावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले.

काय अपेक्षित आहे

नवीन कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही भारतात कंपनीची मॉडर्न सॉलिड डिझाइन शैलीची पहिली अंमलबजावणी असेल. या वेईकलमध्‍ये उच्‍च ग्राऊंड क्‍लीअरन्‍स आणि रस्‍त्‍यावरील असमान पृष्‍ठभागांचा सामना करण्‍यासाठी चाकाभोवती स्‍पेस असेल, जे कारला एसयूव्‍ही विशिष्‍टता देतील. डिझाइनमध्‍ये विशिष्‍ट स्‍कोडा एसयूव्‍ही शैली कायम ठेवण्‍यात येईल, तसेच सुधारित व अचूक डीआरएल लाइट सिग्‍नेचर्स अशा वैशिष्‍ट्यांची भर करण्‍यात येईल. आगामी एसयूव्‍हीमध्‍ये कारच्‍या बाजूला व मागील बाजूस हेक्‍सागॉन षटकोनी पॅटर्न देखील असेल. कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीची सध्‍या भारतभरात प्रखर चाचणी घेतली जात आहे आणि कंपनी स्‍थानिक पुरवठादारांमध्‍ये वाढ करत उत्‍पादनासाठी तयारी करत आहे. सर्वात मोठ्या कार प्‍लॅटफॉर्मवर आधारित कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीच्‍या कॉम्‍पॅक्‍ट फूटप्रिंटमध्‍ये ‘मोठ्या कार’चा अनुभव मिळेल.

नामकरण परंपरा

ही परंपरा आहे, जेथे २०१७ मध्‍ये कंपनीच्‍या पहिल्‍या संपूर्ण सुसज्‍ज ७-आसनी लक्‍झरी ४x४ वेईकलला कोडियक नाव देण्‍यात आले. या नावामधून कोडियक अस्‍वल आणि दक्षिण अलास्‍का, यूएसमधील त्‍यांचा अधिवास असलेले कोडियक आर्किपेलॅगोचे गुण दिसून येतात. या नामकरणामधून अस्‍वल आणि त्‍यांचा अधिवास असलेल्‍या प्रदेशाचे सौंदर्य, भव्‍यता आणि कणखरपणा दिसून येतो. स्‍कोडा कुशक या वारसाला पुढे घेऊन जाते, जेथे तिचे नाव सम्राटसाठी संस्‍कृत शब्‍दामधून आले आहे. आणि २०२५ मध्‍ये भारतात जागतिक पदार्पण करणारी नवीन कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही स्‍कोडा कायलॅक (Kylaq) लोकांनी दिलेल्‍या मतांवरून देण्‍यात येणाऱ्या नामकरण वारसाला अधिक पुढे घेऊन जाते, तसेच स्‍कोडा एसयूव्‍ही फॅमिलीच्‍या नामकरण परंपरेचे पालन करते.

भारतातील ताफा कुशक एसयूव्‍हीने जुलै २०२१ मध्‍ये आणि स्‍लाव्हिया सेदानने मार्च २०२२ मध्‍ये भारतात व जगभरात पदार्पण केले. तेव्‍हापासून, या दोन्‍ही भारतात विकसित करण्‍यात आलेल्‍या कार्सनी स्‍कोडा ऑटो इंडियाला विक्रीसंदर्भात सर्वात मोठे वर्ष गाठण्‍यास मदत केली आहे, तसेच अल्‍पावधीत १००,००० हून अधिक कार्सच्‍या विक्रीचा टप्‍पा गाठला आहे. स्‍कोडा कायलॅक (Kylaq) ही स्‍कोडा ऑटो इंडियाने विकसित केलेली तिसरी नवीन, भारत-विशिष्‍ट उत्‍पादन असेल

Leave a Comment