जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी आणि भारतीय भागिदारांतर्फे ‘टीबी- मुक्त शाळा’ उपक्रम लाँच

Admin

TB-Free Schools जॉन हॉपकिन्स

या उपक्रमाद्वारे तीन राज्यांतील १०,००० पेक्षा जास्त शालेय मुलांमध्ये तपासणी, माहिती, उपचार व प्रतिबंधात्मक थेरपीचा प्रसार केला जाणार आहे. हिमाचल प्रदेशात या उपक्रमाची प्राथमिक टप्प्यात यशस्वी अमलबजावणी केल्यानंतर संपूर्ण देशभरात उपक्रमाची व्याप्ती वाढवणार

टीबी मुक्त शाळा उपक्रम इंडिया- जेएचयू रिसर्च यांच्यात एकत्रितपणे करण्यात आलेल्या अभ्यास अहवालाच्या यशाच्या पायावर रचण्यात आला आहे. त्यामध्ये टीबीविषयी माहिती, तपासणी, उपचार, मोबाइल सर्व्हिस डिलीव्हरी मॉडेल्सद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हिमाचल प्रदेशातील तिबेटियन लोकसंख्येसाठी प्रतिबंधात्मक थेरपी यांचा समावेश आहे.

या प्रकल्पाने धरमशाला येथील मॉनेस्ट्रीज व शाळांमधील क्षयरोगाचे प्रमाण वाजवी पद्धतीने कमी करण्यात आल्याचे दाखवून दिले आहे. या यशाने प्रेरित होत आणि नॅशनल टीबी एलिमिनेशन प्रोग्रॅम व इतर सीएसआर भागिदारांच्या सहकार्याने तीन राज्यांतील चार ठिकाणी या उपक्रमाचा विस्तार केला जाणार आहे. त्यात महाराष्ट्रातील पुणे व सातारा, उत्तरप्रदेश येथील गोरखपूर आणि तमिळनाडूमधील चेन्नई यांचा समावेश आहे.

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने भारतात स्थानिक संस्था व सरकारच्या सहकार्याने संशोधन, प्रशिक्षण उपक्रम राबवत विविध ठिकाणी क्षयरोगावर नियंत्रण आणण्यासाठी धोरणे अमलात आणली आहेत. टीबी- मुक्त शाळा उपक्रमामुळे भारत व जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांच्यातील शतकभर जुने नाते व शिक्षण, वैद्यकीय तसेच अभियांत्रिक संशोधन क्षेत्रातील काम आणखी बळकट झाले आहे.

Leave a Comment