इंडसइंड बँक लि. (IBL) आणि भारत फायनान्शिअल इन्क्लुजन लि. (BFIL) यांनी भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी…

Admin

IndusInd Bank इंडसइंड बँक

शेतकऱ्यांचे उत्पन्न मजबूत आणि शाश्वतपणे वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आणि कौशल्याचा लाभ घेत देशभरातील 10,000 शेतकरी उत्पादक संस्थांना पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट आहे.

इंडसइंड बँक लि. (IBL) आणि भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड (BFIL), आयबीएलची पूर्ण मालकी असलेल्या उपकंपनीने भारत संजीवनी कृषी उत्थान उपक्रम राबवण्यासाठी भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाशी (MoA & FW) सहयोगाची घोषणा केली आहे. 10,000 शेतकरी उत्पादक संस्थांची (FPOs) ची निर्मिती आणि प्रोत्साहन, या सरकारच्या प्रमुख कार्यक्रमाला समर्थन देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशभरातील FPOs सक्षम करण्यासाठी एक मजबूत फ्रेमवर्क निर्माण होते.

एफपीओ शेतकऱ्यांना त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यास, मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेचा लाभ घेण्यास, उत्पादन खर्च कमी करण्यास आणि त्यांच्या कृषी उत्पादनांच्या एकत्रीकरणाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास सक्षम करतात. या माध्यमातून या संस्था शाश्वत उत्पन्नासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

ही केंद्रीय क्षेत्र योजना कृषी उत्पादकता आणि नफा वाढवण्यासाठी, विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी, सरकारच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे. BFIL आणि IBL च्या सामाजिक उपक्रमांद्वारे (CSR) चालवलेल्या या सहकार्याचा उद्देश कृषी उत्पादकता वाढवणे, शाश्वत शेती पद्धतींना चालना देणे आणि आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 11 राज्यांमध्ये सातत्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारणे हा आहे.

FPO प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर प्रभावीपणे देखरेख, समर्थन आणि मार्गदर्शन करण्यासाठी भारत संजीवनी कृषी उत्थान उपक्रमांतर्गत, BFIL आणि IBL राष्ट्रीय स्तरावर तसेच 11 लक्ष्य राज्यांमध्ये केंद्रीकृत प्रकल्प व्यवस्थापन युनिट (CPMU) स्थापन करतील. ग्रामीण सशक्तीकरणासाठी नावीन्यपूर्ण सार्वजनिक-खासगी भागीदारी निर्माण करण्याच्या प्रयत्नांना अधोरेखित करत, एफपीओ विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कॉर्पोरेट संस्थांसोबत करण्यात आलेला कृषी मंत्रालयाचा हा पहिला औपचारिक सामंजस्य करार आहे.

या सामंजस्य कराराद्वारे, BFIL आणि IBL डेटा व्यवस्थापन, कार्यक्षमतेत वाढ करणे आणि IT पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांमध्ये तांत्रिक सहाय्य प्रदान करतील, FPOs साठी त्यांचे कार्य ऑप्टिमाइझ करण्यासाठी, लवचिकता निर्माण करण्यात आणि त्यांचा व्यवसाय वाढविण्यास मदत करून शाश्वत वाढीचा मार्ग तयार करतील. या कार्यक्रमाला चालना देण्यासाठी BFIL आणि IBL रोजच्या घडामोडींमध्ये समन्वय साधण्यासाठी कृषी/फॉर्टिकल्चर उत्पादन, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, मार्केट लिंकेज, कोल्ड चेन, सामाजिक क्षेत्र इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञ नियुक्त करतील.

या सामंजस्य करारावर भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (MoA & FW), आणि BFIL तसेच IBL यांनी स्वाक्षरी केली.

या महत्त्वपूर्ण भागीदारीवर भाष्य करताना, श्री. फैज अहमद किडवई, भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव म्हणाले, “कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्याची BFIL आणि IBL ची वचनबद्धता प्रशंसनीय आहे. IT सोल्यूशन्सचा वापर करून, प्रोजेक्ट मॅनेजमेंट सहाय्य प्रदान करून, आणि त्यांचे कौशल्य वाढवून, BFIL आणि IBL शेतकऱ्यांना डेटा-आधारित निर्णय घेण्यास आणि त्यांच्या उत्पादन पद्धती वाढवण्यासाठी, कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी आणि टिकाऊपणामध्ये योगदान देत आहेत.”

श्रीनिवास बोनम, प्रमुखइन्क्लुझिव्ह बँकिंग, सीएसआर अँड सस्टेनेबिलिटी, आयबीएल, म्हणाले, “भारत सरकारसोबतचे आमचे सहकार्य, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याच्या आमच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. कृषी-संलग्न सेवांपासून मुख्य प्रवाहातील शेतीपर्यंत पाठबळ देऊन ग्रामीण भारतासाठी कृषी लवचिकता आणि सक्षमीकरणाच्या राष्ट्रीय ध्येयाच्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे.”

श्री. जे. श्रीधरन, कार्यकारी उपाध्यक्ष, BFIL, पुढे म्हणाले, “FPOs ला समर्थन देणारा भारत संजीवनी कृषी उत्थान उपक्रम सुरू करण्यासाठी कृषी मंत्रालयासोबत केलेल्या सामंजस्य कराराद्वारे, शेतकऱ्यांना थेट फायदा होणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित उपायांमध्ये योगदान दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. कृषी-संलग्न क्षेत्रातील आमच्या सातत्यपूर्ण कामाने आम्हाला आता कृषी क्षेत्रात समान कौशल्य लागू करण्यासाठी चांगले तयार केले आहे, इथे आम्ही मजबूत, उत्पादक FPOs तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे जे शेतकऱ्यांचे उत्पन्न मजबूत आणि शाश्वत मार्गाने सुधारेल.”

भारत संजीवनी द्वारे कृषी-संलग्न क्षेत्रातील कौशल्य यशस्वीरित्या प्रदर्शित केल्यानंतर तसेच शेतकऱ्यांना व्यापक पशुवैद्यकीय सेवा पुरवून ग्रामीण समुदायांना आधार देणारा डिजिटल उपक्रम राबवल्यानंतर BFIL आणि IBL आता मंत्रालयासोबत भागीदारी करत कृषी क्षेत्राला पाठिंबा देत आहेत. BFIL, IBL आणि मंत्रालय संयुक्तपणे त्रैमासिक आधारावर प्रगतीचा आढावा घेतील, तसेच या प्रकल्पातील टप्पे गाठण्याची खात्री करून आणि उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आव्हानांना सामोरे जातील.

भारत सरकारसोबतच्या या भागीदारीवर आधारित, BFIL आणि IBL शेतकऱ्यांना आवश्यक साधन सामग्री  आणि सहाय्य प्रदान करून भारताच्या कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी आणि शाश्वततेसाठी त्यांच्या समर्पणाची पुष्टी करतात.

Leave a Comment