- भारतातील 68% आणि चीन मधील 61% एस.एम.ई यांचे मानणे आहे की शाश्वत वितरण पर्याय उपलब्ध करून दिल्याने त्यांचे व्यावसायिक यश वाढेल
- वित्तीय सेवा आणि फॅशन क्षेत्र हे शाश्वत पद्धतींसाठी कार्यवाहक अर्थसंकल्प (ऑपरेटिंग बजेट) वाटप करण्याची खूप इच्छा बाळगतात
- एस.एम.ई च्या समोर अंतर्गत व ग्राहकांनी खरेदी करणे कायम सुरू राहणे हे एक मोठे आव्हान बनले आहे
- “सस्टेनेबिलिटी मॅटर्स: डी.एच.एल एक्सप्रेस ग्लोबल सर्व्हे ऑन स्मॉल बिझनेस” या विनामूल्य ईबुक मध्ये अधिक माहिती देण्यात आलेली आहे जी लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांकडून (एस.एम.ई) माहिती प्रदान करते
लहान व मध्यम उद्योगांसाठी (एस.एम.ई) शाश्वतता ही धोरणात्मक गरज बनलेली असून यामुळे त्यांच्या दीर्घकालीन मूल्यावर व विश्वासार्हतेवर लक्षणीय परिणाम होत असल्याचे डी.एच.एल एक्सप्रेसच्या नवीन आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात पहायला मिळत आहे.
पुरवठा साखळी कामाकाजांमध्ये (ऑपरेशन्समध्ये) शाश्वततेचे प्राधान्य वाढत चाललेले आहे आणि ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावे म्हणून डी.एच.एल एक्सप्रेस ने यू.के, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, चीन, सिंगापूर, जपान, मेक्सिको, कॅनडा आणि भारत या 11 जागतिक बाजारपेठांमधील 5,000 एस.एम.ई निर्णयकर्त्यांचे सखोल सर्वेक्षण केले.
शाश्वतता त्यांच्या व्यवसायासाठी “खूप महत्वाची” किंवा “फारच महत्वाची” आहे असे 95% भारतीय एस.एम.ई मानत असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. हे जागतिक सरासरी 75% पेक्षा लक्षणीय प्रमाणात जास्त आहे आणि भारतीय व्यवसायांची शाश्वततेसाठी असलेली मजबूत बांधिलकी स्पष्ट करते.
“अनेक व्यवसायांच्या कार्यसूचीमध्ये (अजेंडांमध्ये ) शाश्वतता आता अग्रस्थानी आहे. परंतु शाश्वतता धोरण विकसित करण्याचे व अंमलात आणण्याचे आव्हान बऱ्याचदा बळजबरी वाटू शकते – कारण सर्वेक्षणाला उत्तर देणाऱ्या बऱ्याच जणांनी प्रवासाची सुरुवात कोठून करावी हे माहित नसल्याचे स्पष्ट केले आहे.
डी.एच.एल एक्सप्रेस कमी उत्सर्जन शिपिंग उपाय प्रदान करण्याच्या समर्पित पोर्टफोलिओसाठी ओळखली जाते आणि एस.एम.ई हे डी.एच.एल एक्सप्रेस सारख्या विश्वासार्ह लॉजिस्टिक्स अग्रणी सोबत भागीदारी करून स्वत:चे स्थान प्रस्थापित करू शकतात जेणेकरून त्यांना व्यवहार्य, स्पर्धात्मक राहता येईल आणि दीर्घकालीन वाढीची खात्री करता येईल,” असे डी.एच.एल एक्सप्रेस चे कार्यकारी उपाध्यक्ष ग्लोबल कमर्शिअल ग्रीव्हन म्हणतात.
आर. एस. सुब्रमण्यम, एस.व्ही.पी, दक्षिण आशिया, डी.एच.एल एक्स्प्रेस म्हणतात, “शाश्वतता आता व्यवसायांसाठी ‘चांगली’ राहिलेली नाही, विकासाला चालना देण्यासाठी, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि दीर्घकालीन गुंतवणूक सुरक्षित करण्यासाठी ही गरज बनली आहे. “भारतीय एस.एम.ई ने हे जाणले असून त्यांच्या कामकाजात शाश्वत पद्धतींचा समावेश करण्यासाठी ते सक्रिय पावले उचलत आहेत.
खरे पाहता, डी.एच.एल मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, ग्राहक जागतिक सरासरी 23% च्या तुलनेत शाश्वत शिपिंगसाठी अधिक पैसे देण्यास तयार असतील, असे भारतातील 51% एस.एम.ई आणि चीनमधील 47% एस.एम.ई चे मानणे आहे, हे आम्ही पाहत आहोत. हे शक्य आहे, कारण भारत आणि चीन पॉवरहाऊसची निर्यात करत आहेत आणि येथील एस.एम.ई शाश्वत धोरणांकडे झुकून पाश्चिमात्य ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.”
या संशोधनात किरकोळ, ग्राहकोपयोगी वस्तू, व्यावसायिक सेवा, अभियांत्रिकी, फॅशन, तंत्रज्ञान, रसायने, जीवन विज्ञान आणि आरोग्यसेवा व आर्थिक सेवा, या नऊ क्षेत्रांमध्ये व्यवसायांनी भाग घेतला आणि एसएमईंना विकसित होत असलेले भूदृश्य पार करण्यास व नवीन संधींचा लाभ घेण्यास मदत करणारी मौल्यवान माहिती उपलब्ध करून दिली. याचा परिणाम स्वरूप तयार झालेले ईबुक एस.एम.ई वर शाश्वततेचा होणारा परिणाम आणि त्यांच्या पुरवठा साखळी कामकाजात (ऑपरेशन्समध्ये) वाढत्या प्राधान्यक्रमाचा शोध लावते.
भारतात केलेल्या सर्वेक्षणातील प्रमुख निष्कर्षांमध्ये पुढील गोष्टी सामील आहेत :
- भारत आणि चीनमधील एस.एम.ई साठी शाश्वतता फारच महत्वपूर्ण आहे: 72% चीनी एस.एम.ई आणि 59% भारतीय एस.एम.ई म्हणाले की शाश्वतता त्यांच्या व्यवसायासाठी “फारच महत्वपूर्ण” आहे. हे प्रमाण जागतिक सरासरी 35% पेक्षा लक्षणीय प्रमाणात जास्त आहे.
- शाश्वततेसाठी मजबूत ग्राहक समर्थन: 51% भारतीय एस.एम.ई चा असा विश्वास आहे की त्यांचे ग्राहक शाश्वत शिपिंगसाठी “फारच” किंवा “खूप” अधिक पैसे देण्यास तयार आहेत, जे जागतिक सरासरी 23% पेक्षा लक्षणीय प्रमाणात जास्त आहे.
- शाश्वतता व्यावसायिक यशास चालना देत आहे: 68% भारतीय एस.एम.ई चा असा विश्वास आहे की शाश्वत वितरण पर्याय प्रदान केल्याने व्यावसायिक यश मिळण्याचे प्रमाण वाढेल.
- शाश्वत लॉजिस्टिक्स प्रदात्यांसह भागीदारी महत्वपूर्ण आहे: 90% भारतीय एस.एम.ई म्हणतात की शाश्वततेला प्राधान्य देणाऱ्या लॉजिस्टिक्स प्रदात्यांशी भागीदारी करणे “फारच” किंवा “खूप” महत्वपूर्ण आहे.
इतर महत्त्वपूर्ण निष्कर्ष आणि आव्हानांमध्ये पुढील गोष्टी सामील आहेत:
उच्च सुसंबंधता परंतु गुंतवणुकीची तयारी कमी असणे
सर्वेक्षण केलेल्या सर्व क्षेत्रांमधील किमान दोन तृतीयांश एसएमईंनी सांगितले की शाश्वतता त्यांच्यासाठी “खूप महत्वपूर्ण” किंवा “फारच महत्वपूर्ण” आहे. या भावनेशी वित्तीय सेवा क्षेत्र आणि फॅशन क्षेत्रांनी सर्वात ठामपणे सहमती दर्शविली असून प्रत्येक गटातील 81% उत्तर देणाऱ्यांनी अशा प्रकारे उत्तरे दिली आहेत.
या समस्येचे महत्त्व व्यापकपणे समजले असले तरी सुद्धा बहुतेक एस.एम.ई शाश्वत उपक्रमांसाठी अर्थसंकल्पाची (बजेटची) तरतूद करण्यास राजी नाहीत. बहुतेक (53%) त्यांच्या कार्यवाहक अर्थसंकल्पाच्या (ऑपरेटिंग बजेटच्या) फक्त 1-3% शाश्वत पद्धतींमध्ये गुंतवणूक करण्यास तयार आहेत. फक्त 9% एस.एम.ई 5% पेक्षा जास्त गुंतवणूक करतील, तर 16% कोणतीही गुंतवणूक करणार नाहीत.
अंतर्गत आणि ग्राहकांनी खरेदी हे एक मोठे आव्हान आहे
जेव्हा त्यांनी त्यांची शाश्वततेची उद्दिष्टे गाठण्यात समोर असलेल्या आव्हानांबद्दल विचारले गेले तेव्हा अंतर्गत आणि ग्राहक खरेदी सुरक्षित करणे हे सर्व बाजारपेठांमधील बहुतेक एस.एम.ई साठी मुख्य काळजीचे कारण दिसून आले. हे विशेषत: जर्मनीमध्ये सर्वत्र पसरलेले असून तिथे 74% एस.एम.ई हे आव्हान स्वीकारतात.
फॅशन उद्योग आणि वित्तीय सेवा क्षेत्र बहुतेक शाश्वत उद्योगांमध्ये
फॅशन उद्योग बऱ्याचदा त्याच्या पुरवठा साखळीच्या शाश्वततेबद्दल महत्त्वपूर्ण तपासणीच्या अधीन असला तरी सुद्धा बहुतांश फॅशन एस.एम.ई कठोरपणे शाश्वततेसाठी समर्थन देतात. या क्षेत्रातील 81% उत्तर देणाऱ्यांनी सांगितले की हे त्यांच्या व्यवसायासाठी “खूप महत्वपूर्ण” किंवा “फारच महत्वपूर्ण” आहे आणि तीन चतुर्थांश (78%) लोकांचे असे मानणे आहे की त्यांची ब्रँड प्रतिमा (“काही / मोठ्या / खूप मोठ्या” प्रमाणावर) शाश्वत वितरण पर्याय उपलब्ध करून देऊन सुधारता येईल.
शाश्वतता “फारच महत्वपूर्ण” आहे, असे स्वतःच्या व्यवसायासाठी (43%) वित्तीय सेवा क्षेत्रातील एस.एम.ई म्हणण्याची शक्यता आहे. या क्षेत्राची शाश्वततेच्या पद्धतींसाठी कार्यवाहक अर्थसंकल्प (ऑपरेटिंग बजेट) वाटप करण्याची जास्त इच्छा पहायला मिळते आणि 88%) आणि शाश्वत वितरण पर्याय उपलब्ध करून दिल्याने व्यावसायिक यश (47% “मोठ्या प्रमाणात / खूप मोठ्या प्रमाणात” प्रमाणात) वाढू शकते असे वाटण्याची शक्यता आहे.
डी.एच.एल एक्सप्रेस एस.एम.ई शाश्वततेला समर्थन देण्यासाठी निभावत असलेली भूमिका
डी.एच.एल एक्सप्रेस गोग्रीन प्लस सेवा पुरवित आहे आणि ग्राहकांना पावले उचलून डी.एच.एल च्या एअर कार्गो ताफ्यात एस.ए.एफ (सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल) वापरून त्यांचे स्कोप 3 उत्सर्जन कमी करता येईल. साध्य झालेली उत्सर्जन बचत (स्कोप 3) प्रमाणपत्रांच्या स्वरूपात ग्राहकांना दिली जाते.
याखेरीज, डी.एच.एल एक्सप्रेस आपल्या कामकाजांची (ऑपरेशन्सची) आणि सेवांची शाश्वतता वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करीत असून त्याद्वारे वार्षिक जी.एच.जी (ग्रीन-हाऊस गॅस) उत्सर्जन 29 मिलियन मेट्रिक टनांपेक्षा कमी करण्यात; त्याच्या शेवटच्या टप्प्यातील वितरण वाहनांपैकी 66% चे विद्युतीकरण करण्यात आणि 2030 पर्यंत शाश्वत इंधनाचा वाटा 30% पर्यंत वाढविण्यात डी.एच.एल ग्रुपच्या शाश्वततेच्या उद्दिष्टांना हातभार लावत आहे.
शाश्वततेमुळे पुढील दहा वर्षांत या उद्योगाचा कायापालट केला जाणार आहे. एसएमईंना त्यांच्या लॉजिस्टिक्सची शाश्वतता सुधारता यावी आणि त्यांच्या ग्राहकांनी त्यांच्याकडून केलेल्या अपेक्षांच्या माध्यमातून समोर उभ्या असलेल्या कोणत्याही आव्हानांवर विजय मिळविता यावा म्हणून कृतीयोग्य पावले उचलण्यास मदत करण्यासाठी हे व्यापक ईबुक डिझाइन केले गेले आहे.
लॉजिस्टिक्स उद्योगातील जागतिक नेत्याच्या रूपात उद्योगांच्या विस्तृत व्याप्तीमध्ये डी.एच.एल एक्सप्रेस जगभरातील हजारो एसएमईंना समर्थन पुरवित असून एसएमईंना योग्य साधने, धोरणे आणि माहिती प्रदान करण्याचा प्रयत्न करते. यामुळे त्यांच्या शाश्वत पद्धतींमध्ये श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यात त्यांना मदत मिळेल. सस्टेनेबल लॉजिस्टिक्स: डी.एच.एल एक्सप्रेस ग्लोबल सर्व्हे | डी.एच.एल ग्लोबल – येथे आपल्याला ईबुक डाउनलोड करता येईल.