हिमालया वेलनेसच्या ‘जरा मुस्कुरदे’ म्युझिक व्हिडीओचे अनावरण

Admin

Zara Muskurade जरा मुस्कुरदे

आरोग्य, सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी यातील विश्वासू ब्रँड असलेल्या ‘हिमालया वेलनेस’ने आज त्यांच्या हृदयस्पर्शी नवीन संगीत व्हिडीओ ‘जरा मुस्कुरादे’चे अनावरण केले. याद्वारे सणासुदीच्या काळात आनंद, दयाळूपणा आणि आत्मविश्वासाचा उत्सव साजरा करता येणार आहे.

प्रसिद्ध बॉलीवूड गायिका मोनाली ठाकूर आणि लोकप्रिय अभिनेता-प्रभावकार (इन्फ्लूएन्सर) अनेरी वजानी यांचा सुरेख आवाज असलेली ही चित्रफीत दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या शुक्रवारी साजरा होणाऱ्या ‘जागतिक हास्य दिना’साठी ब्रँडच्या मोहिमेचा एक भाग आहे.

हसणे, माणुसकीचे दर्शन, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात हास्य फुलवणे आदी साध्या हावभावांद्वारेही हा प्रसंग लोकांना सकारात्मकता पसरवण्यासाठी प्रोत्साहित करतो. ‘जरा मुस्कुरादे’ हे जोषपूर्ण आणि एकप्रकारे प्रेरणादायी स्मीतहास्य फुलवणारे गाणे असून, जे माणुसकीच्या छोट्या कृतींतील शक्तीची आठवण करून देते.

हे गाणे नैसर्गिक स्मीतहास्यातील सौंदर्य उजाळते आणि नैसर्गिक सौंदर्यातून वैयक्तिक काळजी आणि आत्मविश्वासाच्या महत्त्वावर भर देतो. नैसर्गिक सौंदर्य वाढवणे हे हिमालया वेलनेस स्ट्रॉबेरी शाइन लिप बामचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच ओठांना मऊ बनवून त्यांचे पोषण करणे, इतरांमध्ये आनंद पसरवून ओठांची १०० टक्के नैसर्गिकरित्या काळजीही याद्वारे घेतली जाते.

आपण सणासुदीच्या हंगामात प्रवेश करत आहोत, त्यामुळे प्रेमळपणा आणि आनंद पसरवण्याची ही खरी वेळ आहे. आम्हाला विश्वास आहे की हास्य हे संसर्गजन्य आहे आणि ते कोणाचाही दिवस उजळू शकतो, असे ‘हिमालया वेलनेस’च्या सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी विभागाच्या विपणन संचालक रागिणी हरिहरन यांनी सांगितले. ‘हिमालया वेलनेस’मध्ये आम्ही आरोग्य आणि सौंदर्यासाठी आमच्या समग्र दृष्टीकोनाला मूर्त स्वरुप देणाऱ्या नावीन्यपूर्ण, नैसर्गिक उपायांद्वारे

हिमालया वेलनेसच्या ‘जरा मुस्कुरदे’ म्युझिक व्हिडीओला तिचा आवाज देणारी मोनाली ठाकूर म्हणाली, ‘हास्य हा एक साधा पण शक्तिशाली कायिक अभिनय आहे आणि ‘जरा मुस्कुरादे’ हा आनंद आणि प्रेमळपणा सुंदरपणे टिपतो. ‘हिमालया वेलनेस’बरोबर अशा प्रकल्पावर काम करण्याचा अनुभव अद्भूत असा होता, जो आंतरिक निरोगापणा चमकवतो, प्रत्येक वादळाचा प्रतिकार करतो आणि ऐक्याचा मार्ग प्रकाशात आणतो.

‘जरा मुस्कुरादे’ ही एक उत्साहवर्धक धून आहे, जी चैतन्य वाढवते आणि शांततेची भावना आणते, तसेच खरा निरोगीपणा आतून सुरू होते याची आठवण करून देते. या ३६९-डिग्री संगीत मोहिमेची संकल्पना ‘हूप्र ब्रँड सोल्युशन्स’ने, ‘मोटिवेटर’ या कल्पक संस्थेच्या सहकार्याने तयार केली आहे.’

‘आम्ही हिमालया आणि त्यांच्या ग्राहकांवा केंद्रस्थानी ठेवून ही संगीत मोहीम तयार केली आहे. ज्यांच्यासाठी संगीत हे सर्वोच्च आणि सर्वांत आकर्षक स्वरूप आहे, अशा लक्ष्यित प्रेक्षकांशी जोडण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम म्हणून संगीताचा वापर केला आहे,’ असे ‘हूप्र’च्या सह. संस्थापक आणि सीआरओ मेघना मित्तल म्हणाल्या.

हिमालया स्ट्रॉबेरी लिप बामची विक्री करून मिळालेल्या रकमेचा एक भाग ‘स्माईल ट्रेन’ला दान केला जाणार आहे. ‘स्माईल ट्रेन’ ही जागतिक धर्मादाय संस्था असून जी क्लीफ्ट शस्त्रक्रिया आणि संबंधित आजारांवर उपचार करते. ‘जरा मुस्कुरादे’ आता यू-ट्युबवर उपलब्ध असून तिला आकर्षक प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Comment