हॅवर्थने आपले भारतातील अस्तित्व मजबूत करत; केले आपल्या पुण्यातील पहिल्या डिलर शोरूमचे उद्घाटन

Admin

हॅवर्थने आपले भारतातील अस्तित्व मजबूत करत; केले आपल्या पुण्यातील पहिल्या डिलर शोरूमचे उद्घाटन
  • हॅवर्थचा पश्चिम भारतातील आपल्या पहिल्या शोरूमचे उद्घाटन ; २०२६ पर्यंत भारतभरातील शोरूम्सची संख्या १० च्यावर जाणार
  • आपल्या ५,००० चौ.फ़ूट शोरूममध्ये एक्झिकिटिव आणि प्रिमियम दर्जाचे फ़र्निचर असणार आहे.
  • भारतातील आपली व्याप्ती वाढविण्याचा हेतूने २०२४ मधील वाढ ही दोन अंकी असण्याचे ध्येय

हॅवर्थ ही २.५७ दशलक्ष युएस डॉलरची कंपनी असून, प्रामुख्याने कामाचा ठिकाणी लागणाऱ्या सोयी सुविधांकरिताचा उपाययोजना प्रदान करते, आज कंपनीने पुण्यातील आपल्या पहिल्या डिलर शोरूमचे उद्घाटन मॅट्रिक्स वर्कप्लेस सोल्युशनसह भागीदारी करत जाहिर केले.

हॅवर्थ

मॅटिक्स ही आर्किटेचर मधील कल्पकतांना वाव देणारी कंपनी असून, डिझाईन, फ़ॅब्रिकेशन आणि इन्स्टॉलेशनचे विविध पर्याय प्रदान करते. हॅवर्थने आपली पुण्यामधील पहिलीच डिलरशिप जाहिर केली असून त्यांना आपले भारतातील अस्तित्व अधिक मजबूत करत एशीया पॅसिफ़िक विभागामध्ये आपले स्थान निर्माण करायचे आहे.

५,००० चौ.फ़ूटाचा या शोरूममध्ये आंतरराष्ट्रीय डिझाईन्स, गुणवत्ता आणि कामाकरिता लागणाऱ्या हॅवर्थचा एक्झिकिटिव आणि प्रिमियम रेंजचे फ़र्निचर असणार आहे. शोरूममध्ये पॅट्रिका युरिक्विओला आणि मॅक स्टोपा सारख्या डिझायनर्सची निवडक उत्पादने देखील असाणार आहेत.

शोरूम ही आर्किटेक्चर चा दृष्टीकोनातून एक कल्पक उदाहरण असेल ज्यामुळे क्लाएंट्सला एकूण अंदाज येईल आणि पुढचा पिढीचा कामाचा ठिकाणाची एक ब्लूप्रिन्ट नजरे समोर दिसेल. शोरूमचा माध्यमाने भविष्यातील “ऑफ़िस स्पेस” चा एक देखावा निर्माण केला जाईल ज्यामुळे चालू ट्रेन्ड आणि उत्पादनास प्रोत्साहन देणारे  वातावरण कसे निर्माण करायचे हे समजू शकेल.

गेल्या काही वर्षांमध्ये हॅवर्थने भारतात चांगलाच जम बसविला असून, त्यांना देशभरात कंपनीला मजबूत करायचे आहे. हॅवर्थ आपली जागतिक गुणवत्ता असलेली फ़ॅक्ट्री श्रीपरुम्बुदुर येथे उभी करणार असून, एशीया-पॅसिफ़िक भागामध्ये आपली प्रगती अजून होण्याचा दृष्टीने उचललेले हे पाऊल आहे.

हॅवर्थ

हॅवर्थ ही चेन्नईमधील फ़ॅक्ट्री तयार व्हावी म्हणून $८ – $१० कोटींची गुंतवणूक करणार असून , अस्तित्वात असलेल्या जागेचा दुप्पट म्हणजे ११३.००० चौ.फ़ूट एवढा विस्तार करणार आहे. काही दिवसांपुर्वीच , हॅवर्थने आपल्या चेन्नई मधील २६,००० चौ.फ़ू एवढ्या मोठ्या शोरूमचे उद्घाटन केले.

हॅवर्थला आपला व्यवसाय इतर मोठ्या शहरांमधून देखील वाढवाचा असून दिल्ली एनसीआर आणि अहमदाबाद करिता नवीन डिलर्स देखील मिळाले आहे. कंपनी विविध क्षेत्रांमधील कंपन्या तसे, अग्रगण्य संस्था , शासकिय संस्था, शिक्षण विभागाला आपली उत्पादने प्रदान करते, आणि अधिकाधिक उत्तम कामाकरिताचा उपाययोजना देण्याचा कंपनीचा मानस आहे.

हॅवर्थ इंटरनॅशनलचे अध्यक्ष, श्री. हेनिंग फ़िग्गी म्हणाले, “ भारतात आमची वाढ होणे हे आमचे ध्येय असून त्याकरिता आणखीन एक पाऊल आम्ही टाकले आहे. पश्चिम भागातील पुण्यामध्ये आमचा शोरूमचे उद्घाटन होणे ही फ़ार आनंदाची बातमी आहे. पुण्यामध्ये आमचे काम वाढविणे आमचा ग्राहकांचा वाढत्या मागण्या पूर्ण करण्याप्रती असलेली आमची बांधिलकी दर्शविते त्या सह या भागातील नवीन संधींचा लाभ घेण्याची आमची मानसिकता देखील दर्शविते.

आम्ही भारतात १९९७ पासून आहोत आणि उच्च प्रतीचे ऑफ़िस फ़र्निचर निर्माण करण्यामध्ये आमचा मोलाचा वाटा आहे. आता ग्रेड ए चा स्थळांवरती भारतात आमचा उद्योग वाढत असताना , आमची अशी आशा आहे की देशातील इतरही नव्या बाजारपेठांमध्ये आमचे स्थान निर्माण व्हावे. भारतातील महत्वाची उत्पादने, सप्लाय चेन निर्मीती, त्यांचे सबळीकरण आणि नवीन ईआरपी प्रणाली लागू करणे, तसेच नव्या डिलर्सला समावून घेणे आणि बाजारपेठांमध्ये आमची व्याप्ती आणि गुंतवणूक ही नव्या शोरूमसचा माध्यमाने  धोरणात्मक पद्धतीने वाढविणे आवश्यक आहे.”

 “धोरणात्मक पद्धतीने महत्वाचा उत्पादनांकरिता स्थानिक बाबींचा विचार केल्याने आम्हाला वाढत्या बाजारपेठेचा अंदाज येईल आणि आमचा डिलिवरीज देखील वेळेत होऊ शकतील. आमचे प्रमुख लक्ष्य हे प्रिमियम सिटींग वर असणार आहे, ज्याकरिता प्रणाली मध्ये उपलब्ध असलेल्या संधींचा विचारकरूनच निर्णय घेतले जातील. आम्ही तंत्रज्ञानावर देखील भर देतो आहोत, कारण तंत्रज्ञान आता कामाचा ठिकाणचा एक महत्वाचा भाग बनले आहे.

हॅवर्थ

असे फ़र्निचर ज्यामध्येच वीजेचे कनेक्शन असेल, युएसबी पोर्ट असेल आणि वायरलेस चार्जिंगची सुविधा असेल, आमचा पुण्यातील शोरूमचे आकर्षण ठरणार असून यामुळे कामाची ठिकाणं ही अधिक गतीशल बनणार आहेत. मॅट्रिक्स शोरूम आमचा बांधिलकी आणि कामाप्रती संलग्न असल्याने आम्हाला विविध क्षेत्रांमध्ये उत्तम सेवा प्रदान करता येतील आणि आमचा दीर्घकालीन ठसा ग्राहकांचा मनावर उमटविता येईल.” श्री. प्रवीण रावल, उपाध्यक्ष सेल्स हॅवर्थ एपीएसी.

“आम्हाला पुणे बाजारपेठेमध्ये आमची जागा निर्माण करताना अतीशय आनंद होतो आहे आणि याकरिता आम्हाला हॅवर्थ सारखा जागतिक भागीदार मिळणे हे त्याहून आनंद देणारे आहे. पुण्यामध्ये चालू ट्रेन्डनुसार कामाचा ठिकाणाकरिता लागणारी डिझाईन्स घेऊन येणे हे खरेच फ़ार लाभदायी ठरणार आहे कारण, ही भारतातील व्यावसायिक कामांकरिताची एक उत्तम बाजारपेठ आहे, आमचा मानस हा कामाचे ठिकाण आणि निवासी ठिकाण दोन्हींचे वातावरण सुधारण्याचा असणार आहे. मॅट्रिक्स येथे आम्ही प्रवेशा पासून निकासापर्यंतचा सगळ्याच बाबींकरिता व्यापक उपाय योजना प्रदान करतो. हॅवर्थसह, आम्हाला उत्तम सोयीसुविधा आणि आकर्षक , कल्पक आणि उत्पादकता वाढविणाऱ्या रचना देता येणार आहेत.” असे मॅट्रिक्स आर्किटेक्चरल सोल्युशन्स चे व्यवस्थापकिय संचालक श्री. केवल ठक्कर म्हणाले.

हॅवर्थ भारतासह १५० देशांमधून कार्यरत असून जगभरात आमचे ८,००० पेक्षा अधिक व्यवसायिक आहेत. भारतात, हॅवर्थ ५ शोरूम्स आणि दोन डिलर शोरूम्सचा माध्यमाने ३०० पेक्षा अधिक कर्मचारी घेऊन काम करते. याशिवाय, कंपनीने आपल्या उत्तम सुविधा प्रदान करण्याचा उपक्रमांतर्गत ग्लोबल शेअर्ड सर्व्हिस सेंटर (एसएससी) चेन्नईमध्ये सुरू केले आहे.

हॅवर्थ

Leave a Comment