आयकॉनिक ‘चाय-पकोडा’ राइडसह गल्फ ऑइल दुसऱ्या वर्षी पुन्हा पुण्यात…

Admin

गल्फ

इंडिया बाइक वीक 2024 ने आखाती देशांसोबतची भागीदारी मजबूत केली असून, 20+ शहरांमध्ये या राइड्स आयोजित करण्याची योजना आहे

गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेड ही ल्युब्रिकंट्स उद्योगातील अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीने इंडिया बाइक वीक (IBW) 2024 सोबतच्या भागीदारीचा भाग म्हणून पुण्यात दुसऱ्या वार्षिक ‘चाय-पकोडा’ राइडची अभिमानाने घोषणा केली. गेल्या वर्षीच्या या राइडला जबरदस्त यश मिळाले होते.

त्यानंतर, आशियातील प्रमुख मोटारसायकल महोत्सव IBW साठी गल्फ ऑइल सलग दुसऱ्या वर्षी मुख्य प्रायोजक राहिले आहे. या वर्षीची ही राइड मोटारसायकल प्रेम, साहस आणि सामुदायिक भावनेच्या रोमांचक उत्सवासाठी मार्ग निर्माण करत आहे.

2024 च्या पर्वाच्या उद्घाटनाच्या राइडमध्ये विविध प्रदेश आणि पार्श्वभूमी असलेल्यी 1000+ पेक्षा जास्त बायकर्सनी प्रभावी सहभाग घेतला. बायकिंग सुपरस्टोर, बालेवाडी, पुणे येथे रायडर्स एकत्र जमले आणि मॉन्टेरिया रिसॉर्ट, विनेगाव असा 79 किलोमीटरचा रोमहर्षक प्रवास सुरू केला.

निसर्गरम्य मार्गांचा आणि मोकळ्या रस्त्यांचा आनंद सर्व बायकर्स लुटत होते. सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रवासापूर्वी ‘सेफ्टी रायडिंग’ सत्रात सर्व रायडर्स सहभागी झाले. IBW मार्शल्सने रायडर्सच्या गटांचे नेतृत्व करून चांगल्या समन्वयासह सुरक्षित राइड केले.

गल्फ ऑइलने सर्व रायडर्सना फ्लोरोसेंट सेफ्टी जॅकेट्सही पुरविले. त्यातून रस्ता सुरक्षेसाठीची आपली बांधिलकी आणखी मजबूत केली. या कार्यक्रमाची सांगता एका मजेदार पुश-अप आणि बर्पी चॅलेंजने एंडपॉइंटवर झाली, ज्यामुळे बायकिंग समुदायाला आणखी ऊर्जा मिळाली.

गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवी चावला यांनी इंडिया बाइक वीकसह गल्फच्या निरंतर भागीदारीबद्दल त्यांचे विचार मांडले. ते म्हणाले की, “इंडिया बाइक वीकसोबतची आमची भागीदारी सलग दुसऱ्या वर्षी सुरू ठेवताना आणि 2024 मध्ये पुन्हा प्रतिष्ठित चाय-पकोडा राइड सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.

या राइड्स भारताच्या मोटारसायकल समुदायाच्या साहस, बंधुता या भावनांचा सन्मान करतात. गल्फमध्ये आम्ही उच्च श्रेणीतील ल्युब्रिकंट्स आणि उत्पादने ऑफर करण्यासाठी समर्पित आहोत. देशभरातील बायकर्सना चालविण्याचा अनुभव वाढविताना मोटारसायकल चालविण्याची संस्कृती पुढे नेत आहोत.”

इंडिया बाइक वीक, आता त्याच्या 11व्या आवृत्तीत, बायकर्सना कनेक्ट होण्यासाठी, अनुभव शेअर करण्यासाठी आणि मोटारसायकलबद्दलचे त्यांचे प्रेम व्यक्त करता यावे, यासाठी व्यासपीठ म्हणून काम करत आहे.

चाय-पकोडा राइड्स ही एक प्रचलित परंपरा आहे, बायकर्सना भारतीय चहा आणि पकोड्यांचा आनंद घेताना निसर्गरम्य मार्ग एक्सप्लोर करण्याची संधी यातून मिळते. राइड्ससाठी गल्फ ऑइलची उपस्थिती आणि समर्थन, यामुळे रायडर्सचा अनुभव अधिक समृद्ध होतो. देशभरातील रायडर्ससाठी अविस्मरणीय आठवणी यातून तयार होतात.

इंडिया बाइक वीकमध्ये गल्फ ऑइलचा सतत सहभाग या ब्रँडचे मोटारसायकल समुदायाप्रति दीर्घकाळचे समर्पण अधोरेखित करते. कंपनीची उच्च-गुणवत्तेच्या ल्युब्रिकंट्सची श्रेणी बायकर्सची मागणी पूर्ण करण्यासाठी तयार केली गेली आहे, ज्यामुळे सर्व ठिकाणी नितळ, अधिक कार्यक्षम राइड्सची खात्री यातून मिळते. विश्वासार्हता आणि नावीन्यपूर्ण प्रतिष्ठेसह, गल्फ मोटारसायकलच्या जगात आघाडीवर असून, उत्साही लोकांना प्रत्येक राइडचा जास्तीतजास्त फायदा घेण्यास मदत करते.

Leave a Comment