घरातील फर्निचर अत्याधुनिक रंगसंगती आणि नव्या रचनेत उपलब्ध होणार!

Admin

Godrej फर्निचर

गोदरेज एन्टरप्राइजेस ग्रुपच्या ‘इंटेरियो’ फर्निचर ब्रॅण्ड देशभरात आपल्या उत्कृष्ट फर्निचर उत्पादनांसाठी ओळखला जातो. ग्राहकांची आवड लक्षात घेत इंटेरियोकडून आता नव्या फर्निचर रेंज बाजारात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ‘अपमोड्स’ या नावाने ही फर्निचरची नवी रेंज मॉडर्न भारतीय ग्राहकांसाठी खास डिझाइन करण्यात आली आहे.

फर्निचरच्या डिझाइन्समध्ये अत्याधुनिकता आणि नावीन्यतेचा आकार देत, अपमोड्स प्रत्येक घरकुलांतील सदस्यांची आवड, तसेच पसंतीची रचना जपतो.

अपमोड्सचे नव्या डिझाइन्सचे फर्निचर घेताना जुने फर्निचर फेकून देण्याची गरज नाही. तुम्हाला जुने फर्निचर बदलून अपमोड्सचे नवे फर्निचर घेता येईल. हा पर्याय ग्राहकांना शाश्वत जीवनशैली जगण्यास प्रवृत्त करतो.

ग्राहकांना घराच्या रचनेत नवा बदल घडवायचा असेल, तर नव्या जीवनशैलीला साजेसे आणि प्रत्येकाची अत्याधुनिक फर्निचरची आवड लक्षात घेत, अपमोड्सने तब्बल २ हजार ४५० नव्या रचनेत आकारलेले फर्निचर बाजारात आणले आहे. या असंख्य पर्यायातून ग्राहक त्यांचे आवडते फर्निचर निवडून घरातल्या इंटेरियरचा चेहरामोहरा सहज बदलू शकतात.

या नव्या रेंजच्या अनावरणाप्रसंगी इंटेरियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ग्राहक व्यवहार विभागाचे प्रमुख डॉ. देव नारायण सरकार यांनी सांगितले की, ‘‘प्रत्येक माणसाच्या जीवनशैलीशी निगडीत घरकुलातील डिझाइन्समधील वाढत्या मागण्या लक्षात घेत, या भविष्यातील आगामी इंटेरियर डिझाइन्स साकारल्या जातात.

फर्निचरच्या रचनेत ग्राहकांची स्वतःची आवडनिवड आणि गरज लक्षात घेतली आहे. ग्राहकांचा नवा ट्रॅण्ड लक्षात घेत, आम्ही अपमोड्स हा ब्रॅण्ड तयार केला आहे. या ब्रॅण्डच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनाचे कौशल्य साधता येते. ग्राहकांना फर्निचर सतत बदलण्याचीही गरज भासणार नाही.’’

अपमोड्स रेंजच्या फर्निचरची वैशिष्ट्ये –

० सोफा प्लॅटफॉर्म – (७५ हजार ते १ लाख ५० हजार) –

अनेक कॉन्फिगरेशनची रचना या सोफ्यात पाहता येईल. हा सोफा तीन आसनांपासून सुरु होतो. ग्राहकांना आपल्या गरजेनुसार त्याला विस्तारता येईल. या आरामदायी सोफ्यातील मऊदार गाद्या सहज बदलता येणे शक्य आहे. आसनावरील हाताचे दंड ठेवला जाणारा भाग प्रत्येकाला आपल्या सोयीनुसार बाजूला सारुन वापरता येईल. हा सोफा वेगवेगळ्या रंग आणि कपड्यांच्या शैलीत उपलब्ध आहे.

० डायनिंग टेबल – ( ४५ हजार – १ लाख)

डायनिंग टेबल आणि सोबतच्या खुर्चीच्या रचनेची रंगसंगती हे आकर्षक डिझाइन्सने गुंफण्यात आले आहे. अगदी छोट्या डायनिंग टेबलपासून ४, ६ किंवा ८ आसनी डायनिंग टेबलपर्यंत ही रचना उपलब्ध आहे.

० विश्रांतीकरिता बेड – (५० हजार ते १ लाख ५० हजार)

प्रत्येकाला या बेडवर सहज विश्रांती घेता येईल, अशी आरामदायी रचना करण्यात आली आहे. यात नव्या डिझाइन्सच्या असंख्य रेंज पाहता येतील. बेडवरील आसनरचनेचा भाग सहज बदलता येणे शक्य आहे. बेडची साठवणूक क्षमताही चांगली आहे. बेडरुमला साजेसा बेडचा आवश्यक आकार आणि रंगसंगतीच्या डिझाइन्सही उपलब्ध आहेत.

पारंपरिक फर्निचरच्या डिझाइन्सला छेद देत, अपमोड्स शाश्वत आणि नावीन्यपूर्ण डिझाइन्समध्ये ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतो. ग्राहकांच्या आवडीनुसार, तसेच बजेटनुसार घराला घरपण आणणारे फर्निचर वापरणे आता सोपे झाले आहे. या फर्निचरच्या वापराने नवनवे ट्रेण्डही आत्मसात करता येतील, शिवाय पर्यावरणालाही हानी पोहोचणार नाही.

घरगुती सजावटीच्या ट्रेण्डमधील भविष्यातील मागण्यांनुसार अपमोड्समध्ये अनेकानेक पर्यायही पाहायला मिळतील. यात ग्राहकांच्या जीवनशैलीला साजेसे आरामदायी, शाश्वत आणि अत्याधुनिक भारतीय घरगुती सजावट साधता येईल.

Leave a Comment