फोर्स मोटर्सने बीएमडब्‍ल्‍यू ग्रुप इंडियासोबत चेन्‍नई प्‍लांटमधून १००,०००व्‍या इंजिनच्‍या रोल-आऊटचा क्षण साजरा केला

Admin

फोर्स मोटर्स Force Motors

हा टप्‍पा दशकभराचा इंडो-जर्मन सहयोग आणि ‘मेक इन इंडिया’प्रती समान कटिबद्धतेचे प्रतीक आहे

नवीन मैलाचा दगड स्‍थापित करत आणि बीएमडब्‍ल्‍यू ग्रुप इंडियासोबतच्‍या प्रबळ सहयोगाला अधिक चालना देत फोर्स मोटर्सने आज चेन्‍नईमधील त्‍यांच्‍या अत्‍याधुनिक इंजिन असेम्‍ब्‍ली प्‍लांटमधून १००,०००व्‍या इंजिनच्‍या रोल-आऊटची घोषणा केली. बीएमडब्‍ल्‍यू एक्‍स५ मध्‍ये या स्‍पेशल १००,००० इंजिनला असेम्‍बल करण्‍यात आले आहे.

हा उल्‍लेखनीय टप्‍पा आकारमानामधील मोठ्या उपलब्‍धीला सादर करतो, तसेच इंजिनीअरिंग सर्वोत्तमता, समान मूल्‍ये आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाप्रती दृढ कटिबद्धतेवर करण्‍यात आलेल्‍या दशकभराच्‍या सहयोगाच्‍या यशाला देखील प्रकाशझोतात आणतो.

फोर्स मोटर्स लिमिटेड, तसेच बीएमडब्ल्यू ग्रुपमधील मान्यवरांच्या उपस्थितीत हा संस्‍मरणीय रोल-आउट पार पडला, जेथे बीएमडब्ल्यू एजीच्‍या बीएमडब्ल्यू-प्रॉडक्शन नेटवर्क २ चे उपाध्यक्ष श्री. मार्कस वोलेन्स, बीएमडब्ल्यू ग्रुप प्लांट चेन्‍नईचे व्यवस्थापकीय संचालक श्री. थॉमस डोस आणि फोर्स मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसन फिरोदिया उपस्थित होते.

२०१५ मध्ये स्‍थापना करण्‍यात आलेला चेन्‍नईमधील प्‍लांट भारतात उत्पादित होणाऱ्या बीएमडब्ल्यू कारच्या संपूर्ण श्रेणीकरिता इंजिन उत्‍पादित करण्यासाठी स्थापन करण्यात आला होता. प्रगत ऑटोमेटेड लाइन्‍स, सर्वोत्तम गुणवत्ता नियंत्रण, डिजिटली एकीकृत ऑपरेशन्स आणि अत्यंत कुशल कर्मचाऱ्यांसह चेन्‍नईमधील प्‍लांट बीएमडब्ल्यू ग्रुपच्या जागतिक उत्पादन मानकांची पूर्तता करतो आणि भारतातील ऑपरेशन्समध्ये महत्त्वपूर्ण योगदान देखील देतो. गेल्या काही वर्षांत हा प्‍लांट बीएमडब्ल्यू ग्रुपच्या स्थानिकीकरण धोरणाचा महत्त्वाचा भाग बनला आहे, ज्यामुळे स्थानिक क्षमतांसह जागतिक उत्कृष्टतेच्या विनासायास एकीकरणाची खात्री मिळते.

बीएमडब्ल्यू एजीच्‍या बीएमडब्ल्यू-प्रॉडक्शन नेटवर्क २ चे उपाध्यक्ष श्री. मार्कस वोलेन्स म्‍हणाले, “आम्‍हाला फोर्स मोटर्स चेन्‍नई प्‍लांटमधून १००,०००व्‍या बीएमडब्‍ल्‍यू इंजिनच्‍या रोल-आऊटला साजरे करण्‍याचा आनंद होत आहे. दशकभराचा उल्‍लेखनीय सहयोग आणि समर्पिततेमधून हे यश मिळाले आहे.

आमचे इंजिन्‍स सर्वोत्तम अभियांत्रिकी, नाविन्‍यपूर्ण तंत्रज्ञान आणि उच्‍च कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात. हा सहयोग भारतात जागतिक दर्जाची उत्‍पादने वितरित करण्‍याप्रती बीएमडब्‍ल्‍यू ग्रुपच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो. १००,०००व्‍या इंजिन टप्‍प्‍यामधून आमचा समान दृष्टिकोन दिसून येतो, तसेच प्रबळ इंडो-जर्मन भागीदारीला सादर करतो, जी अधिकाधिक दृढ होत आहे.”

बीएमडब्ल्यू ग्रुप प्लांट चेन्‍नईचे व्यवस्थापकीय संचालक श्री. थॉमस डोस म्‍हणाले, “बीएमडब्‍ल्‍यू ग्रुप प्‍लांट चेन्‍नईला जगभरातील कोणत्‍याही बीएमडब्‍ल्‍यू ग्रुप उत्‍पादन व असेम्‍बली केंद्रांप्रमाणे तोच आंतरराष्‍ट्रीय दर्जा असलेल्‍या कार्स उत्‍पादित करण्‍याचा अभिमान वाटतो. फोर्स मोटर्ससोबतचा आमचा बहुमूल्‍य सहयोग दर्जा मानकांमध्‍ये, तसेच ‘मेक इन इंडिया’ आणि स्‍थानिकीकरणाप्रती आमच्‍या स्थिर कटिबद्धतेमध्‍ये देखील उच्‍च मापदंड स्‍थापित करतो. १००,०००व्‍या इंजिनचे रोल-आऊट अभिमानास्‍पद क्षण आहे, ज्‍यामधून फोर्स मोटर्ससोबत आमच्‍या प्रबळ सहकार्याची क्षमता दिसून येते.”

याप्रसंगी आपले मत व्‍यक्‍त करत फोर्स मोटर्स लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. प्रसन फिरोदिया म्हणाले, “या वर्षी चेन्‍नईमधील फोर्स मोटर्सच्‍या अत्‍याधुनिक इंजिन असेम्‍बली प्‍लांटच्‍या कार्यसंचालनाला

सुरूवात होऊन दशक पूर्ण झाले आहे. आम्‍हाला १००,०००व्‍या इंजिनच्‍या या महत्त्वपूर्ण रोल-आऊटला साजरे करण्‍याचा अत्‍यंत आनंद होत आहे. आम्‍हाला भारतातील बीएमडब्‍ल्‍यू ग्रुपसाठी विश्‍वसनीय व धोरणात्‍मक सहयोगी असण्‍याने सन्‍माननीय वाटते आणि या टप्‍प्‍यामधून या सहयोगाची कटिबद्धता, अचूकता आणि दर्जा दिसून येतो.”  

ते पुढे म्‍हणाले, “बीएमडब्‍ल्‍यू ग्रुप इंडिया आपली उपस्थिती विस्‍तारित करत असताना फोर्स मोटर्स दर्जात्‍मक उत्‍पादन, ऑपरेशनल सर्वोत्तमतेच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या विकासाला पाठिंबा देण्‍याप्रती कटिबद्ध आहे, तसेच भारतात जागतिक दर्जाचे ऑटोमोटिव्‍ह कम्‍पोनण्‍ट्स उत्‍पादित करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.”

बीएमडब्‍ल्‍यू इंडिया आणि फोर्स मोटर्स यांच्‍यामधील सहयोग इंडो-जर्मन औद्योगिक भागीदारी संपादित करू शकणाऱ्या यशाचे उल्‍लेखनीय उदाहरण आहे. दोन्‍ही कंपन्‍यांनी भारतातील बीएमडब्‍ल्‍यूच्‍या काही सर्वात लोकप्रिय मॉडेल्‍समध्‍ये उच्‍च कार्यक्षम पॉवरट्रेन्‍स वितरित करण्‍यासाठी सहयोगाने काम केले आहे. तसेच देशामध्‍ये जागतिक दर्जाची उत्‍पादने निर्माण करण्‍याच्‍या व्‍यापक ध्‍येयाला पाठिंबा देत आहे. १००,०००व्‍या इंजिनच्‍या यशस्‍वी रोल-आऊटमधून उत्‍पादनाच्‍या यशासोबत मोठ्या प्रमाणात दृष्टिकोन, सहयोग आणि अंमलबजावणी देखील दिसून येते.

Leave a Comment