युवकांसाठी फॅशनेबल आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त उत्पादने बनवणारा, भारतातील आघाडीचा ब्रँड फास्ट्रॅक स्मार्टने मेटॅलिक, स्टायलिश आणि तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत स्मार्टवॉचेसची नवी मेटल सीरिज बाजारपेठेत दाखल केली आहे.
युवा भारतासाठी खास म्हणून तयार करण्यात आलेल्या या नवीन कलेक्शनमध्ये दर्जेदार डिझाईन, परवडण्याजोगी किंमत, आधुनिक वैशिष्ट्ये यांचा उत्कृष्ट मिलाप घडवून आणण्यात आला आहे, त्यामुळे हे कलेक्शन म्हणजे या विभागासाठी नवा मापदंड निर्माण करेल.
टायटन परिवारातील एक सदस्य, फास्ट्रॅकने भारतातील युवकांसाठी एकापेक्षा एक फॅशनेबल घड्याळे सातत्याने तयार केली आहेत. सर्वोत्तम मेटॅलिक सौंदर्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा मिलाप असलेली मेटल सीरिजने हा वारसा पुढे सुरु ठेवला आहे. स्टाईल आणि मूल्य यांचा सर्वोत्तम समन्वय घडवून आणण्याच्या फास्ट्रॅकच्या डीएनएचे मूर्त स्वरूप म्हणजे हे नवे कलेक्शन आहे.
फास्ट्रॅकच्या स्टेनलेस स्टील वॉचेसपासून प्रेरणा घेऊन तयार केलेले हे स्मार्टवॉच कलेक्शन सर्वोत्कृष्ट दर्जाच्या धातूपासून तयार करण्यात आले आहे. स्टेनलेस स्टील स्ट्रॅप हे या स्मार्टवॉचेसचे खास वैशिष्ट्य आहे. स्टील उत्तम दर्जाचे, टिकाऊ आणि दीर्घकाळपर्यंत चांगले राहील याची खात्री करून घेण्यासाठी या सर्व घड्याळांवर अनेक काटेकोर परीक्षण प्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
टायटन कंपनी लिमिटेडचे सेल्स आणि मार्केटिंग – वेयरेबल्स विभागाचे प्रमुख श्री आदित्य राज यांनी मेटल सीरिजच्या अनावरण प्रसंगी सांगितले, “फास्ट्रॅक स्मार्टने स्टाईल आणि तंत्रज्ञान यांचा अनोखा मिलाप घडवून आणून युवकांच्या फॅशनची नवी व्याख्या रचली आहे. जेन झी च्या इच्छा, आवडीनिवडींना अनुरूप, नवे ट्रेंड्स स्थापन करणारी उत्पादने प्रस्तुत करण्याची आमची बांधिलकी मेटल सीरिजमधून दिसून येते.
आम्ही असे मानतो की, हे कलेक्शन स्मार्टवॉच विभागाचा दर्जा उंचावेल, इतकेच नव्हे तर, आधुनिक युवकांसाठी एक प्रतिष्ठित ऍक्सेसरी बनेल. फास्ट्रॅक स्मार्टमध्ये आम्ही वेयरेबल तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर राहण्यासाठी, सर्वात स्मार्ट वैशिष्ट्यांनी सुसज्ज, सर्वात जास्त ट्रेंडी डिझाईन्स सहज परवडण्याजोग्या किमतींना उपलब्ध करवून देण्यासाठी बांधील आहोत. मेटल सीरिज पाहून युवकांमध्ये जो उत्साह आणि आनंद संचारणार आहे तो पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.”
फास्ट्रॅकची स्मार्ट मेटल सीरिज हे आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पॉवरहाऊस तुमच्या वेगवान, आधुनिक जीवनशैलीला साजेसे ठरावे यादृष्टीने डिझाईन करण्यात आले आहे.
- सर्वोत्कृष्ट डिझाईन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा मिलाप: उत्तम दर्जाची मेटॅलिक बांधणी आणि टिकाऊ स्टेनलेस स्टील स्ट्रॅप्स यांच्यासह अतिशय अचूकपणे तयार करण्यात आलेल्या मेटल सीरिजमध्ये स्टाईलबरोबरीनेच टिकाऊपणा देखील आहे. प्रगत चिपसेटचा वापर करण्यात आल्यामुळे ही स्मार्टवॉचेस अतुलनीय कामगिरी बजावतात, यांची कार्यक्षमता व ऊर्जा व्यवस्थापन लक्षणीय आहे.
- तुम्हाला जसे हवे तसे कनेक्टेड राहा: सिंगलसिंक बीटी कॉलिंग असल्यामुळे या स्मार्टवॉचेसमध्ये तुम्हाला अतुलनीय सुविधा अनुभवता येते, फोन हातात न घेता कॉल्स व मेसेजेस करता व घेता येतात.
- आकर्षक डिस्प्ले: शानदार अमोल्ड डिस्प्ले, अतिशय अनोखा युआय अनुभव आणि युजर्सना सुधारित अनुभव मिळवून देण्यासाठी अधिक चांगली सुस्पष्टता असलेल्या फास्ट्रॅक स्मार्टवॉचेसमध्ये त्यांच्यासाठी खास कस्टमाइज करण्यात आलेले आधुनिक सेन्सर आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेल्या सुविधाजनक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेले हे स्मार्टवॉच दिसायला तर खूप आकर्षक आहेच, शिवाय याची कामगिरी देखील अतिशय दमदार आहे. म्हणूनच फास्ट्रॅक स्मार्ट मेटल सीरिज सर्वोत्तम ऍक्सेसरी आहे.
आपल्या देशातील युवा पिढीच्या नव्या स्टाईल आवडीनिवडींना अनुरूप फॅशन व सुविधा ठळकपणे दर्शवणारे ‘डिझाईन्ड टू फ्लेक्स’ कॅम्पेन तयार करण्यात आले आहे. टायटन वर्ल्ड, फास्ट्रॅक स्टोर्स, शॉपर्स स्टॉप, लाइफस्टाइल, पै इंटरनॅशनल, अधिकृत मल्टी-ब्रँड रिटेल आउटलेट्स आणि मोबाईल डोअर्समध्ये तसेच fastrack.in, ऍमेझॉन व फ्लिपकार्टवर फास्ट्रॅक स्मार्ट मेटल सीरिज खरेदी करता येईल.