डिलिव्हरिंग सेफली: स्विगीकडून पुणे वाहतूक पोलिसांच्या सहयोगाने डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी रस्ता सुरक्षा जागरूकता सत्राचे केले आयोजन

Admin

स्विगी Swiggy

स्विगी या भारताच्या आघाडीच्या ऑन डिमांड सुलभता प्लॅटफॉर्मने पुणे वाहतूक पोलिसांच्या सहयोगाने आपल्या रस्ता सुरक्षा सनद असलेल्या डिलिव्हरिंग सेफली अंतर्गत पुण्यातील तील डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी रस्ता सुरक्षा जागरूकता सत्राचे आयोजन केले.

हा कार्यक्रम शहरातील १३० पेक्षा अधिक डिलिव्हरी भागीदारांना शिक्षित आणि सबल करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आला होता. या सत्राची रचना सुरक्षित, सकारात्मक वाहनचालनाच्या सवयी लावणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि वेळेचे व मार्गाचे योग्य नियोजन करून धोकादायक वर्तन टाळणे यांच्यासाठी करण्यात आले होते.

पुण्याचे पोलिस उपायुक्त श्री. अमोल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. सुनील गवळी, आरएसपी वाहतूक श्री. हनीफ शेख आणि आरएसपी वाहतूक श्री. देवीदास पाटील या पुणे वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी हे सत्र चालवले आणि डिलिव्हरी भागीदारांना मोलाचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले.

“भारतात मागील दोन वर्षांत रस्त्यांवरील अपघात आणि मृतांची संख्या वाढली आहे. जगभरातील सर्वाधिक रस्त्यांवरील अपघात भारतात होता. डिलिव्हरिंग सेफली या सनदेअंतर्गत स्विगी आपल्या डिलिव्हरी भागीदारांचे कल्याण व सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे. ती पोलिस अधिकाऱ्यांच्या सहयोगाने देशभरात विविध रस्ता सुरक्षा जागरूकता उपक्रमांचे आयोजन करते. त्याचे उद्दिष्ट रस्ता सुरक्षा वाढीस लावणे आणि डिलिव्हरी पार्टनर्स कायम वाहतुकीच्या नियमांचे पालन करतील याची काळजी घेण्याचे आहे.

आम्हाला मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभारी आहोत आणि आमच्या व्यवसायाचे प्रमुख स्तंभ असलेल्या डिलिव्हरी भागीदारांमध्ये वाहतुकीबाबत जागरूकता निर्माण करून त्यांची सुरक्षितता वाढेल अशी आम्हाला आशा वाटते” असे मत स्विगी ड्रायव्हर्स ऑर्गनायझेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शलभ श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.

मागील काही वर्षांत स्विगीने आपल्या डिलिव्हरी भागीदारांसाठी सुरक्षित कार्यस्थळ निर्माण करण्याच्या कटिबद्धतेचा भाग म्हणून भारतभरातील विविध शहरांमध्ये मोहिमा आयोजित केल्या आहेत. स्विगीमधील डिलिव्हरी भागीदारांना रस्त्यांवर त्यांचे रक्षण करणारा विमा दिला जातो.

मागील वर्षी एप्रिल महिन्यात स्विगीने रस्ता सुरक्षा आणि वाहतूक जागरूकता कार्यशाळेसाठी गुरूग्राम वाहतूक पोलिसांसोबत भागीदारी केली होती. या प्रशिक्षण कार्यशाळेत १०० पेक्षा जास्त डिलिव्हरी भागीदार उपस्थित होते. २०२३ मध्ये उद्योगातील पहिलाच उपक्रम म्हणून स्विगीने आपल्या डिलिव्हरी भागीदारांना मागणीवर, मोफत आणि वेगवान रूग्णवाहिका सेवा देण्यासाठी डायल ४२४२ सोबत भागीदारी केली होती.

स्विगीकडे इमर्जिन्सी सपोर्ट सर्व्हिसेस (ईएसएस) आहेत. त्यात आपत्कालीन परिस्थितीत किंवा रस्त्यावरील अपघातात डिलिव्हरी भागीदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध पर्यायांचा समावेश आहे. ईएसएसमध्ये २४*७ हॉटलाइन नंबर, डिलिव्हरी भागीदारांसाठी इमर्जन्सी कार्ड्स आणि डिलिव्हरी पार्टनर अॅपमध्ये एसओएस बटणाद्वारे स्थानिक पोलिस व रूग्णवाहिका सेवेशी थेट संपर्क साधण्याची सोय आहे.

स्विगीसाठी आपल्या डिलिव्हरी भागीदार व संपूर्ण समाजाची सुरक्षा आणि कल्याण यांना सर्वाधिक महत्त्व आहे. स्विगीच्या सर्व डिलिव्हरी भागीदारांना नेमणुकीच्या वेळी सुरक्षा मार्गदर्शन मोड्यूल शिकवले जाते. या प्लॅटफॉर्मवर संपूर्ण वर्षभर मदत आणि मार्गदर्शनासाठी सुरक्षा मोहिमांचेही आयोजन केले जाते.

Leave a Comment