ब्रँडकडून तीन नवी उत्पादने – हेरिटेज डिव्हाईन धूप शक्ती कलेक्शन, नैवेद्य सांबरानी गोल्ड सिरीज आणि एअरकर्पूर वेलबींग कलेक्शन – सादर
भारतातील उदबत्तींचे अग्रगण्य उत्पादक सायकल प्युअर अगरबत्ती आध्यात्मिक प्रथा आणि कल्याणाला उन्नत करण्यासाठीच्या आपल्या नवीनतम उत्पादनांच्या श्रेणीसह दिवाळी मोसमात रौनक आणत आहेत. यंदाच्या दिवाळीत ब्रँडकडून नवीनतम उत्पादनासह घरात शांती आणि उत्पादकता यांचे स्वागत करा.
यात गुलाब, चंदन आणि मोगरा यांच्या सुगंधाचे आकर्षण असलेल्या हेरिटेज धूप शक्ती कलेक्शन, नैवेद्य सांबरानी गोल्ड सीरीज कलेक्शन आणि एअरकर्पूर वेलबींग कलेक्शन यांचा समावेश आहे. प्रार्थना आणि भक्ती यांचे वातावरण घेऊन प्रकाशाचे हे पर्व साजरे करा तसेच प्रयोजनासाठी विशेष अनुभव निर्माण करा.
यात हेरिटेज धूप शक्ती कलेक्शन हे पारंपरिक विधींनी प्रेरित असून भक्तीचा अनुभव उन्नत करण्यासाठी त्याचे निर्मिती करण्यात आली आहे. यातील प्रत्येक बॉक्समध्ये १२ सांबरानी कप आणि एक पितळी धुनी यांचा समावेश आहे. आसमंतात मातीचा सुगंध पसरविण्यासाठी तसेच पूजेच्या वेळेस कालातीत आणि पवित्र वातावरण तयार करण्यासाठी ते सर्वथा योग्य आहे.
या नवीन उत्पादनाविषयी बोलताना सायकल प्युअर अगरबत्तीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अर्जुन रंगा म्हणाले, “ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर उत्पादनांची ही मालिका सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. हा सण म्हणजे एकत्र येण्याचा आणि प्रार्थनेचा काळ असतो, त्यामुळे भक्तांना पूजेचा आनंददायक अनुभव मिळावा, ही सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम दर्जाचे उत्पादने पुरविण्यासाठी आमचे प्रयत्न असतात.”
ब्रँड च्या वतीने नैवेद्य सांबरानी गोल्ड सीरीज कलेक्शन हेही सादर करण्यात आले आहे. यात नैसर्गिक सुगंधांची एक विस्तृत श्रेणी आहे. सांबरानी कप तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत – गुलाब, चंदन आणि मोगरा. ते कोळशापासून मुक्त आहेत आणि दिवाळीच्या वेळेस घरात प्रकाश आणि सुगंधाचे स्वागत करण्यासाठी ते उत्तम आहेत. याचा १८ सांबरानी कप आणि एक होल्डर असलेला संच दिवाळीनिमित्त भेट देण्यासाठी आदर्श आहे. आपल्या सुगंधाने हा परिसर भरून टाकतो आणि सण साजरा करण्यासाठी किंवा दैनंदिन विधींसाठी तो आदर्श आहे.
याशिवाय, कापूर हा त्याच्या शुद्धीकरण आणि आराम पुरविण्याच्या गुणधर्मासाठी सुप्रसिद्ध आहे. नवीन सादर करण्यात आलेले एअरकर्पूर वेलबींग कलेक्शन ही एक विशिष्ट मालिका असून ती सर्वांगीण कल्याणावर केंद्रित आहे. यातील प्रत्येक उत्पादन माईंडफुलनेस आणि रिलॅक्सेशन यांना मदत करण्यासाठी घडविण्यात आले आहे.
या किटमध्ये आपले कपडे, ड्रॉवर आणि स्टोरेज युनिटला ताजेतवाने ठेवण्यासाठी एक कापराचे पाकीट, कपडे, स्टोरेजची जागा आणि नाजूक वस्तूंना ताजेतवाने करण्यासाठी कापराचा सुवास सोडणारे कापराचे सॅशे, डोकेदुखी, नाकचंदने, स्नायूदुखी आणि सर्दी यांपासून आराम देण्यासाठी कॅम्फर रोल-ऑन, कॅम्फर व्हेपरायझर आणि डासांना हाकलण्यासाठी लिक्विड, तसेच कापराच्या सुगंधाने आसमंत भरून टाकणारे एअर फ्रेशनर यांचा समावेश आहे.
प्रत्येक भक्ताच्या उत्सवाच्या गरजांसाठी खास तयार केलेल्या नवीन मालिकांसह दिवाळीचे सार अनुभवा. हेरिटेज डिव्हाईन धूप शक्ती कलेक्शनची किंमत २,९९९ रुपये असून ते सायकल डॉट इन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. नैवेद्य सांबरानी गोल्ड सिरीज कलेक्शन ३७५ रुपयांना फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर उपलब्ध आहे, तर एअरकर्पूर वेलबींग कलेक्शन १,२९० रुपयांना फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर उपलब्ध आहे.