- भारतीय चलनानुसार रू. 26,90,000 एक्स-शोरूम एवढ्या किंमतीने सुरवात (भारतभरात)
- दोन पर्यायांमध्ये उपलब्ध सुपिरियर आणि प्रिमियम ७१.८ किलोवॅट आणि ५५.४ किलोवॅट बॅटरीसह आणि एनईडीसी चाचणीनुसार ५३० किलोमीटर आणि ४२० किलोमीटरचा प्रत्येकाचा प्रवास असणार आहे
- आराम, सुखकर आणि वैविध्यतेसह ६- आणि ७ सिटर पर्यायांमध्ये उपलब्ध
- बीवायडी इमॅक्स ७ ही भारतातील बीवायडी इ६- कंपनीचा – पहिल्या प्रवासी वाहनाचे पुढील मॉडेल आहे
बीवायडी इंडिया, ही जगातील न्यु एनर्जी वेहिकल्स (एनइव्ही) उत्पादनकर्त्यांची एक सबसिडी असून, बीवायडीने आज भारतातील पहिल्या ६-आणि ७ सिटर प्रवासी इलेक्ट्रिक एमपीव्ही- बीवायडी इमॅक्स७ ची घोषणा केली. हे उच्च गुणवत्ता असलेले बहुआयामी इलेक्ट्रिक वाहन (एमपीव्ही) असून याचा कल्पक रचनेमुळे प्रगतीशील आणि पर्यावरण प्रेमी अशा कुटुंवांना क्रांतीकारक अशी कौटुंबिक गतीशीलता उपलब्ध होणार आहे.
बीवायडी इमॅक्स७ ही मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरलेल्या बीवायडी इ६ चे पुढचे मॉडेल असून, या मध्ये अजून आधुनिक वैशिष्ठ्ये आणि प्रगतीशीलतेचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही मधील महत्वाचा फ़रक असा की आत्ताचा मॉडेलमध्ये ८-इन-१ इलेक्ट्रिक पावरट्रेनचा म्हणजेच बीवायडीचा इ- व्यासपिठावरील ३.० वर्जनचा समावेश केला गेला असून याची बसायची पद्धती (सिटिंग ऑपशन्स) देखील वेगळी आहे.बीवायडी इमॅक्स ७ आता बीवायडीचा शोरूम्समध्ये उपलब्ध असून याची सुरवातीची एक्स-शोरूम किंमत ही भारतीय चलनामध्ये 26,90,000 (भारतभरात) असणार आहे.
बीवायडी इमॅक्स७ दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, सुपिरियर आणि प्रिमियम, ज्यामध्ये दोन्हीसाठी, ६- आणि ७ सिटरचे पर्याय आहेत. सुपिरियरकरिता ७१.८ किलोवॅटची बॅटरी, प्रिमियमकरिता ५५.४ किलोवॅटची बॅटरी तर ५३० किलोमीटर आणि ४२० किलोमीटर प्रवास हा एनईडीसीचा तपासण्यांनुसार या दोन्ही वाहनांनी करता येणार आहे.
सुपिरियर प्रकारामध्ये ०-१००किलो/ताशी ८.६ सेकंदात जाण्याची तर प्रिमियम प्रकारामध्ये एवढेच अंतर १०.१ सेकंदात जाण्याची क्षमता आहे. वाहनांचा चाकांचा व्हीलबेस हा २,८०० एमएम असून, हा एमपीव्ही श्रेणीमधील सर्वात उत्तम व्हीलबेस आहे.दीर्घकाळ चालणाऱ्या आणि मोठा व्हीलबेस असलेल्या या वाहनामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आरामात प्रवास करण्याचा आनंद घेता येऊ शकतो. यामुळेच शांत प्रवासाचा आनंद मिळतो, कंपनीद्वारे गाडी आणि त्याचा पार्ट्सवरती व्यापक अशी वॉरंटी देखील दिली जाते आहे, जसे:
बीवायडी, भारताचा इलेक्ट्रिक पॅसेंजर वेहिकल्स (ईपीव्ही) व्यवसायाचे प्रमुख, श्री. राजीव चौहाण यावेळी बोलताना म्हणाले, “ बीवायडीचा इमॅक्स ७ चा लॉन्चमुळे आमची कल्पकता आणि टिकाऊपणा प्रती असलेली बांधिलकी स्पष्ट दिसून येते. इलेक्ट्रिक एमपीव्ही हे फ़क्त वाहन नसून, एक क्रांती आहे जी प्रगतीशील कुटुंबांचा प्रवासाचा अनुभव दर्शविणार आहे. या आत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्तम आराम आणि पर्यावरणपूरक अशा प्रगतीसह, बीवायडी इमॅक्स ७ भारतीय इलेक्ट्रिक वाहनांचा दर्जा उंचावणार आहे. या आधुनिक, दिमाखदार इएमपीव्हीला आमचा ग्राहकांपर्यंत घेऊन येताना आम्हाला अतीशय आनंद होत असून यामुळे त्यांचा गाडी चालविण्याचा, प्रवास आणि मालकी हक्काचा अनुभव हा नक्कीच सुखकर होईल अशी आमची आशा आहे. आम्ही नेहमीच भारतीय ग्राहकांना जागतिक स्तरावरील आत्याधुनिक कल्पकता देण्यास बांधिल असू.”
डिझाईन आणि इंटिरियर:
बीवायडी इमॅक्स ७ ही दिमाखदार आणि प्रभावी असून बाहेरून अगदी आखीव रेखीव आहे. मोकळी आणि दमदार अशी ही गाडी, समोरचा बाजूने ड्रॅगन-फ़ेस फ़ेशीया घेऊन तयार करण्यात आलेली आहे. क्रिस्टल डायमंड फ़्लोटिंग एलईडी हेडलाईटमुळे भविष्यातील गती आणि ऊर्जेचा अंदाज येतो तर त्यांच्या निमुळत्या आणि खोलवर डिझाईनमुळे त्यांचा प्रभाव समजतो. गतीचा अंदाज हा १७ इंच अलॉय व्हील हबमुळे वाहनाचा धमाकेदार अस्तित्वाची जाणीव करून देतो.
बीवायडी इमॅक्स ७ चे केबिन हे आधुनिक पद्धतीचे असून सगळीच आधुनिक वैशिष्ठ्ये यामध्ये आहेत. सुंदर डिझाईन केलेला डॅशबोर्ड आणि आतल्या गाडीचा काळ्या आणि करड्या रंगामुळे आरामदायी आणि मोकळ्या अशा इंटिरियरचा अंदाज येतो. बीवायडी इमॅक्स ७ तुम्हाला आरामदायी अनुभवासह मानवी शरीराकरिता असलेल्या त्याच्या कार्यानुरूपणशास्त्राचे म्हत्व देखील पटवून देते. रूंद आणि लांब कुशन्समुळे आरामदायी ड्रायविंगचा अनुभव मिळतो. वाहनामध्ये सुविधांनी युक्त आणि भविष्याला अनुरूप ठरेल असा केबिन अनुभव मिळतो आणि भरपूर जागा तसेच समोरचा सीट्सचा वेन्टि्लेशनचा खास काळजी मुळे १२.८ इंच (३२.५ सेंमी) रोटेटेबल डिस्प्ले तसेच ५ इंच (१२.७ सेंमी) आधुनिक इन्स्ट्रुमेंट क्लटर, वायरलेस फ़ोन चार्जर आणि उत्तम गेअर शिफ़्टची सुविधा देखील मिळते. १.४२ चौ.मीटरचा ग्लास रूफ़मुळे केबिनची जागा अधिक भक्कम असल्याची जाणवते आणि म्हणून प्रवाशांचा मार्ग हा अधिक आरामदायी होतो. वाहनाचा तीसऱ्या ओळीमध्ये ५८० एल बूट स्पेस दिलेली असून, सामान ठेवण्याचा गरजा नक्कीच पूर्ण होऊ शकतील. मधल्या भागातील सीट्स हा ६०:४० अशा हलवता येऊ शकतील ज्यामुळे अधिक बूट स्पेस मिळू शकेल.
बीवायडी इमॅक्स ७ ही बाहेरून चार रंगाचा पर्यायांमध्ये उपलब्ध आहे- क्वार्ट्स ब्लू, कॉस्मॉस ब्लॅक, क्रिस्टल व्हाईट आणि हार्बर ग्रे आधुनिक तंत्रज्ञान:
बीवायडी इमॅक्स ७ मध्ये जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरले असून, ब्लेड बॅटरी आणि बीवायडीचा इ-व्यासपिठातील ३.० वर्जनमधील ८ इन १ इलेक्ट्रिक पावरट्रेनचा वापर याकरिता केला गेला आहे. कंपनीची ब्लेड बॅटरी चे तंत्रज्ञान सर्वात आधुनिक असून याचा विकास हा विशेषत: जागतिक दर्जाचा इलेक्ट्रिक वाहनांकरिताच करण्यात आलेला आहे. बीवायडी ब्लेड बॅटरीचा या वैशिष्ठ्यामुळे बॅटरीचा सेल्सची रचना ही ब्लेडचा आकारात केली जाते ज्यामुळे सेल्स आणि इलेक्ट्रिकमार्गामध्ये अधिक चांगला संपर्क होऊ शकेल आणि अधिक उष्णतेचे हस्तांतरण करता येऊ शकेल. याशिवाय आगळ्या वेगळ्या रचनेमुळे, वाहन आपटण्याचा धोका देखील कमी होतो. बीवायडी इमॅक्स ७ मधील ब्लेड बॅटरी ही ०% ते ८०% पर्यंत ११५ किलोवॅट डीसी चार्जरचा मदतीने ३७ मिनिटात चार्ज होऊ शकते.
दुसरीकडे, बीवायडीचा ८-इन १ इलेक्ट्रिक पावरट्रेन प्रणाली मुळे आठ जटील घटक एकाच ठिकाणी एकत्रित केले जातात ज्यामध्ये मोटर, मोटर कंट्रोलर, रिड्युसर, ऑन-बोर्ड चार्जर, डीसी कन्वर्टर, हाय-व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन बॉक्स, वाहन कंट्रोलर आणि बीएमएसचा (बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम) समावेश होतो. या प्रणालीमुळे डिझाईनमध्ये जास्तीत जास्त जागेचा वापर आणि त्या अनुषंगाने ऊर्जेची परिणाकारकता सुधारते.
बीवायडी इमॅक्स ७ ग्राहकांना आराम आणि ड्रायवर असिस्टन्स वैशिष्ठ्यांचा देखील फ़ायदा मिळवून देते ज्यामुळे हे वाहन सुरक्षित आणि आरामदायी असे कौटुंबिक वाहन ठरते. वाहनामध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ठ्ये देखील आहे, ज्यात ६ एअर बॅग्ज, एबीएस, ईपीएफ़, ईबीडी आणि एडीएएस सुटचा नावांचा उल्लेख महत्वाचा ठरतो.
बीवायडी इमॅक्स ७ ही ग्राहकांचा न्यु एनर्जीचा देखील विचार करते आणि म्हणूनच यामध्ये व्हीटीओएल आणि रिजनरेटिव ब्रेकिंग सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर केला गेला आहे. कुटुंबाला बाहेर जाऊन कॅम्पिंग करता येऊ शकणार आहे किंवा इतर इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करता येणार आहे, व्हीटीओएल (वेहिकल टू लोड) तंत्रज्ञानामुळे वाहनाचा कमाल वापर केला जाण्याची हमी मिळते.
सहजता:
बीवायडी इमॅक्स ७ ची रचना ही प्रत्येक कुटुंबाला आरामदायी आणि मनोरंजक असा प्रवास घडविण्यासाठीच करण्यात आलेली आहे. तीनही रांगांमध्ये प्रवाशांना वेगळा एसी वेंट आणि पहिल्या दोन रांगांकरिता टाईप ए आणि सी प्रकारचे चार्जिंग उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, १२.८ इंच(३२.५ सेंमी) रोटेटिंग टच स्कीन, आधुनिक तंत्रज्ञान, ॲन्ड्रॉईंड ऑटो आणि ॲपल कार्प्लेमुळे ग्राहकांचा फ़ोनकरता देखील उत्तम कनेक्टिवीटीचा आनंद मिळू शकतो. ६-स्पिकरची साऊंड सिस्टीम प्रवासाला अधिक मनोरंज बनविते. याशिवाय वाहनामध्ये आधुनिक सहजतेचे घटक जसे व्हॉईस असिस्टन्स, कीलेस एन्ट्री, एनएफ़सी कार्ड की, इलेक्ट्रिक ट्रंक ओपनिंग, पीएम २.५ फ़िल्ट्रेशन सिस्टीम, ४-दरवाजांकरिता टच अप-डाऊन सह ॲन्टी-पिंचची सोय आणि आपोआप सुरू होणारा एसीचा परिणाम देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे.
बीवायडीने ईव्ही बाजारपेठेमध्ये आपली स्थिती बळकट केली असून, गेल्या २.३ दशलक्ष न्यु एनर्जी वाहनांची विक्री जगभरात २०२४ या वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे. आपल्या संशोधन आणि विकासाचा क्षमतांवर भरवसा ठेऊन, बीवायडीने ड्रायविंगचा क्षेत्रामध्ये एनइव्हीचा दिशेने पाऊल टाकले आहे, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये भव्य अशी श्रेणी उपलब्ध करून देत आम्ही प्रवासी कार, बस, ट्रक आणि इतर वाहनांची निर्मीती यशस्वी पद्धतीने केली आहे. ९४ देशांमधील आपल्या अस्तित्वासह बीवायडी अजूनही टिकाऊपणा, कल्पकता आणि गुणवत्तेमध्ये नवीन पाऊल खूणा उमटविण्याचा प्रयत्न करते आहे.
बीवायडीने काही दिवसांपुर्वीच आपल्या ९ दशलक्ष एनइव्ही ची घोषणा केली असून आम्ही आता १० दशलक्ष वाहनांकडे झपाट्याने वटचाल करतो आहोत. ही उपलब्धी बीवायडीचा ८ दशलक्ष एनइव्हीचा पुर्ततेनंतर अवघ्या २ महिन्यात दिसून आलेली आहे. यॅंगवॅंग यु९ निवडीमुळे बीवायडीची आरामदायी आणि प्रगतीकडे असलेली वाटचाल दिसून येते. प्रत्येक पाऊलखूण ही बीवायडीकरिता एक झेप असून, कंपनी जागतिक दर्जाचा न्यु एनर्जी वेहिकल्सचा या मार्गावर झपाट्याने मार्गक्रमण करणार आहे.
बीवायडीची ओळख ही फ़ॉर्च्युन ग्लोबल ५०० एन्टरप्राईजमध्ये झालेली असून अधिक चांगल्या जगाचा निर्मीतीकरिता कल्पकतेचा वापरावर या एन्टरप्राईज द्वारे भर दिला जातो. कंपनीने आपली बाजारातील ताकद आणि उत्तमतेशी असलेली बांधिलकी नेहमीच दर्शविली आहे. यावर्षी बीवायडी भारतातील इलेक्ट्रिक प्रणालीमध्ये आपले ११ वे वर्ष साजरे करणार असून, याकालावाधीमध्ये आम्ही भरपूर यश बघितले आहे आणि आता “ बॉर्न इव्ही” पोर्टफ़ोलियोची निर्मीती करण्यावर आमचा भर आहे. बीवायडी नेहमीच अधिक चांगले भविष्य देण्याकरिता गतीशील पद्धतीने प्रवास करत राहिल आणि “कूल द अर्थ बाय १°सी” या ब्रीदवाक्यावर खरे उतरण्याचा प्रयत्न करेल.
माहिती, तपशील आणि उत्पादनाचा अटी आणि नियम (https://bydautoindia.com) वर उपलब्ध आहेत.