गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुण्यात; सुनिल कांबळे यांच्या प्रचारासाठी डॉक्टरांशी विशेष संवाद

Admin

सुनिल कांबळे

पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सुनिल कांबळे यांच्या प्रचारार्थ गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डॉक्टरांशी संवाद साधण्यासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन केले. डॉक्टरांच्या समस्यांवर मोकळेपणाने चर्चा करत, आरोग्य क्षेत्रातील विकासासाठी ठोस उपाययोजनांची आश्वासने त्यांनी दिली.

डॉ. सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले, “सामान्य जनतेपर्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचवणे ही आमची प्राथमिकता आहे. सुनिल कांबळे यांच्यासारख्या लोकाभिमुख नेत्यांच्या मदतीने, पुण्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होईल.”

या संवादादरम्यान डॉक्टरांनी आरोग्य सेवा सुधारण्यासाठीच्या आपल्या अपेक्षा मांडल्या. या चर्चेत तातडीच्या समस्या आणि स्थानिक पातळीवर डॉक्टरांना भेडसावणाऱ्या अडचणींवरही चर्चा झाली. यावर डॉ. सावंत यांनी जलदगतीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टरांनी, “सुनिल कांबळे हे सामान्य जनतेसाठी काम करणारे खरे नेता आहेत. त्यांचं नेतृत्व वैद्यकीय क्षेत्राच्या समस्यांवर ठोस पावलं उचलायला मदत करेल,” अशा भावना व्यक्त केल्या.

डॉ. सावंत यांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या प्रेरणादायी भाषणामुळे प्रचार मोहिमेला नवा जोम मिळाला आहे. पुण्यातील मतदारांमध्येही सुनिल कांबळे यांच्याविषयी सकारात्मकता वाढली असून, आगामी निवडणुकीत त्यांच्या विजयाची शक्यता बळकट झाली आहे.

Leave a Comment