‘मॉमस्टोरी प्रेग्नन्सी कार्निवल’मध्ये साजरा करा शिल्पा शेट्टीसोबत एक अविस्मरणीय दिवस

Admin

मॉमस्टोरी Celebrate an Unforgettable Day with Shilpa Shetty at the 'Momstory Pregnancy Carnival'

पुण्यातील आघाडीचे प्रसूती आणि बालसंगोपन प्रदाते सह्याद्री हॉस्पिटल्स तर्फे आयोजित केलेल्या ‘मॉमस्टोरी प्रेग्नन्सी कार्निव्हल’मध्ये या शनिवारी सामील होण्याची एक अनोखी संधी आहे. बॉलीवूडच्या ख्यातनाम अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असणार आहेत. सदर कार्यक्रम शनिवार, 08 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 पर्यंत वेस्टिन पुणे, कोरेगाव पार्क येथे संपन्न होणार आहे.

उत्साह, शिक्षण आणि आनंदाने भरलेल्या या कार्यक्रमात गरोदर स्त्रियांना शिल्पा शेट्टी यांच्या सोबत संवादात्मक सत्रांमध्ये सहभागी होता येणार आहे. तसेच त्यांच्या बरोबर संस्मरणीय फोटो देखील घेता येणार आहेत. या कार्यक्रमात जोडप्यांना एकत्र आनंद घेण्यासाठी डिझाइन केलेल्या अनेक आकर्षक संत्रांमध्ये सहभागी होता येणार आहे.

याखेरीज विविध लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देखील मिळणार आहे. त्याशिवाय मॉमस्टोरीच्या आलिशान बर्थिंग सुइट्स आणि सर्वसमावेशक प्रसूती सेवांसाठी खास ऑन-द-स्पॉट बुकिंग ऑफरचा लाभ देखील त्यांना घेता येणार आहे.

मर्यादित स्पॉट्स उपलब्ध असल्याने नोंदणी करणे अनिवार्य आहे. तुमची जागा सुरक्षित करण्यासाठी कृपया 88888 22222 वर कॉल करा.

Leave a Comment