भारत फोर्ज लिमिटेडतर्फे क्यूआयपीच्या माध्यमातून १६५० कोटी रुपये निधीची उभारणी

Admin

Bharat Forge भारत फोर्ज

भारत फोर्ज लिमिटेडला कळवण्यास आनंद होत आहे, की ९ डिसेंबर २०२४ रोजी क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (क्यूआयपी) क्लोजरमधून कंपनीने यशस्वीपणे १६५० कोटी रुपयांची उभारणी केली आहे. या विक्रीला देशांतर्गत आणि परकीय संस्थात्मक गुंतवणुकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून इश्यूच्या आकाराच्या १० पट मागणी आली.

९० टक्क्यांपेक्षा जास्त विभाजन प्रतिष्ठित देशांतर्गत आणि फॉरिन लाँग ओन्ली फंड्स व विमा कंपन्यात करण्यात आले. क्यूआयपीची विक्री प्रती शेयर १३२० रुपयांनुसार करण्यात आली, तर सेबी आयसीडीआरनुसार फ्लोअर प्राइस प्रती शेयर १३२३.५४ रुपये आहे. क्यूआयपीतून मिळालेला निधी डेट परतफेडीसाठी आणि यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या इनऑरगॅनिक विकास उपक्रमांसाठी वापरला जाणार आहे. 

उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अमित कल्याणी म्हणाले, आम्ही सद्य आणि नव्या गुंतवणुकदारांचे त्यांनी भांडवल उभारणीसाठी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. यावरून त्यांचा आमच्या कंपनीत घडून येत असलेल्या स्थित्यंतरावरचा विश्वास दिसून येतो. आम्ही त्यांना चांगला विकास तसेच भागधारकांना चांगले मूल्य मिळवून देण्यासाठी बांधील आहोत.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड आणि मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेडने या विक्रीसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम) म्हणून काम केले. खेतान अँड कं. ने भारत फोर्डसाठी कायदेशीर सल्लागाराचे काम केले, तर शार्दूल अमरचंद मंगळदास अँड कं. आणि फ्रेशफील्ड्स ब्रुकहाउस डेरिंजर बीआरएलएमचे कायदेशीर सल्लागार होते.

Leave a Comment